मोहेंजोदारो असा बनविला असता तर


मोहेंजोदारो हा आशुतोष गोवारीकरचा "ड्रीम प्रोजेक्ट" होता परंतू हा सिनेमा सुपरफ्लॉप झाला . आधुनिक भारतीय संस्कृती घडविण्यात आपल्या पूर्वजांच्या योगदानाला न्याय देण्यासाठी त्याने हा प्रोजेक्ट केला होता. परंतू या फिल्म मध्ये त्याचा मूळ हेतू बाजूला राहून हि एक निव्वळ प्रेमकथा बनली. या सिनेमातील हिरोईन "पूजा हेगडे" फारच ग्लॅमरस वाटते.कुठेही ती प्राचीन सिंधू संस्कृतीतील महिला वाटत नाही. कदाचित ती कर्नाटकातील ज्या समाजाचे प्रतिनिधित्व करते त्या समाजातून आल्यामुळे तशी वाटत असावी. तिला मेकअप ने काळीसावळी दाखविता आली असती.पूजा हेगडेच नव्हे तर सिनेमातील जवळजवळ सगळेच कलाकार गोरे दाखविले आहेत. सिनेमाचा सेट सुद्धा प्राचीन न वाटता मध्ययुगीन वाटतो.
आपल्याला "स्विमिंग टॅंक" चे पाणी निळे दिसते कारण त्यात निळ्या रंगाच्या फरश्या बसविलेल्या असतात. आता एवढ्या प्राचीन काळी लोक निळ्या रंगाच्या फरश्या वापरत असतील काय?
सिनेमातील खलनायक कबीर बेदी आणि त्याचा मुलगा अरुणयोदय सिंह हे जाणीवपूर्वक गोरे कलाकार घेतले आहेत. सिनेमात अरुणयोदय सिंह तर दिसण्यात आणि वागणुकीत एखादा राजपूत राजपुत्र शोभावा असाच दाखविला आहे. सिंधू संस्कृतीतील लोक एवढे तर माजोर्डे नसणारच. त्यामुळे हा सिनेमा प्राचीन "टच" हरवून बसलेला आहे.
असे असले तरी सिनेमात काही जमेच्या बाजू आहेत.
दिग्दर्शकाचे प्रयत्न प्रामाणिक होते परंतू भावना लोकांपर्यंत ठळकपणे पोहोचल्या नाहीत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यात ह्रितिक रोशन सावळा आणि ग्रामीण दाखविला आहे. एका ग्रामीण युवकाची शक्तिशाली प्रधानाशी टक्कर दाखविली आहे.या घटनेचा इतिहासाशी संबंध जोडला तर प्राचीन आणि मध्ययुगात लोक नागरी जीवनापासून दूर काहीश्या दुर्गम भागात राहून अन्यायकारी सत्ता उलथवून टाकायचे. ह्रितिक रोशन म्हणतो जनतेचा मी सेवक आहे. त्यामुळे राजाला आपण देव न मानता सेवकच समजायला पाहिजे.
ह्रितिक रोशनला घोडा हा प्राणी अज्ञात होता असे दाखवून गोवारीकरने इतिहास तज्ञांचे मार्गदर्शन घेतले आहे असे दिसते. चित्रपटात कुठेही होम-हवन आणि वैदिक किंवा संस्कृत मंत्रांचे उच्चार दाखविले नाहीत.सिनेमात कुठेही शेंडी असलेले ब्राह्मण किंवा अमात्य बघायला मिळत नाहीत.
चित्रपटात या बाबी असत्या तर चित्रपट "ब्लॉकबस्टर" ठरला असता..
मनू हे एक महान व्यक्त्तिमत्त्व होते. परंतू नंतरच्या काळात म्हणजे सिंधू संस्कृतीनंतर २५०० वर्षांनी मनुस्मृती लिहून त्याला बदनाम करण्यात आले.तसेच सिंधू संस्कृतीनंतरच्या वैदिक सभ्यतेत स्रियांवरती बरीच बंधने घालण्यात आली जी १८ व्य शतकांपर्यंत कायम होती. ह्रितिक रोशन लोकांना आणि गाय,बैल,शेळ्या आणि मेंढ्यांना नावेतून वाचवितो असे दाखवून गोवारीकरण ने मनूची आठवण करून दिली परंतू लोकांच्या हि बाब लक्षात आलेली नाही. या चित्रपटातून राष्ट्रभावना जागरूक करता आली असती परंतू हा सिनेमा दोन व्यक्तींमधील संघर्षच राहिला. शरमन म्हणजे ह्रितिक रोशनला भारतीयांचा रक्षणकर्ता दाखविण्याचा गोवारीकरने प्रयत्न केलेला आहे परंतू त्याचा हा प्रयत्न तितकासा प्रभावी ठरला नाही कारण लोकांना तो एका ठराविक समूहाचाच रक्षणकर्ता वाटला. तानाजी सारख्या एका सर्वसामान्य योध्याचा चित्रपट यशस्वी होतो तर शरमन सारख्या आपल्या थोर पूर्वजाचा चित्रपट का यशस्वी होत नाही? कारण आपल्यात असणारा राष्ट्रभावनेचा अभाव आणि दुर्दैवाने दिग्दर्शकाला हि भावना चित्रपटातून ठळक करता आली नाही.
बाकी ह्रितिक रोशनचा अभिनय लाजवाब आणि हा चित्रपट फक्त त्याच्यासाठीच होता!!
त्या काळात असलेले महिलांचे स्थान आणि भारताचा मेसोपोटेमिया आणि इजिप्तशी असलेला व्यापार दाखविला आला असता. त्या काळात मोहेंजोदारो हे जगातील सर्वात मोठे शहर होते. त्या काळात युरोपियन लोक गुहेत भटक्या अवस्थेत जगत होते.काही मध्य-आशियातील व्यापारी घोड्यांचा व्यापार करण्यासाठी मोहेंजोदारोत येत.एवढे मोठे आणि सुसज्ज शहर बघून त्यांनाही या शहराचे कौतुक वाटे.चित्रपटात या सर्व बाबी दाखविता आल्या असत्या.
चित्रपटात ह्रितिक रोशनचे नाव भारत ठेवता आले असते आणि सिंधू संस्कृतीला आधुनिक भारताची निर्माती म्हणून दाखविता आले असते. तत्कालीन समाजव्यवस्था दाखविता आली असती. यासाठी चित्रपट दोन भागात बनवायला पाहिजे होता. पहिल्या भागात मोहेंजोदरची भव्यता,त्याचे तत्कालीन जगातील स्थान, तत्कालीन लोकजीवन या सभ्यतेतील महिलांचे स्थान या सर्व बाबी दाखविता आल्या असत्या आणि दुसऱ्या भागात प्रेमकहाणी वगैरे दाखविता आली असती तर हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला असता. अजूनही दिग्दर्शक आपली चूक सुधारू शकतो आणि एक भव्य अश्या चित्रपटाची निर्मिती करू शकतो कारण चुकांतूनच माणूस शिकत जातो.
अर्थात या सर्वांतून सावरायला निर्माता आणि दिग्दर्शकाला थोडा वेळ लागेल कारण त्याचे मोहेंजोदारो आणि पानिपत हे दोन्हीही चित्रपट सुपरफ्लॉप झाले आहेत.ह्या चित्रपटासाठी त्याचे बजेट १०० कोटी इतके होते आणि ह्रितिक एकट्या ह्रितिक रोशनलाच त्याने तब्बल ७० कोटी रुपये मोजले होते जो आतापर्यंतचा रेकॉर्ड ठरला आहे!!


Comments

Popular posts from this blog

धनगर समाजातील आडनावे-

List of Hatkar clans

About 108 clans(108 कुळ/कुल) of Dhangars and 22 sub castes (22 पोट जाती).