सिंधू-संस्कृतीतील प्रमुख वंश "कस्सी",समाजव्यवस्था ,धार्मिक प्रथा आणि सिंधूच्या पतनानंतरचा इतिहास

सध्याप्रमाणे सिंधू सभ्यतेत जातव्यवस्था नव्हती. एकाच घरातील लोक वेगवेगळी कामे करत. गावातील सर्व लोक मिळून सफाईची कामे करत. शहरात सफाईची कामे करण्यासाठी पगारी कामगार असत. मात्र प्रधान आणि पुरोहितांचा वेगळा वर्ग असे. मोहेंजोदारो या सर्वात मोठ्या शहरात आदिवासींचा प्रभाव होता. नर्तकींचा एक वर्ग होता ज्या प्रधान आणि पुरोहितांचे मनोरंजन करत.इथे जी नर्तिका दिसत आहे ती आदिवासी "भिल्ल" महिला वाटते. मोहेंजोदारो येथील पुरोहितांचा आणि प्रधानांचा वर्ग होता तो "कस्सी" वंशाच्या पुरोहितांचा वर्ग होता. हे पुरोहित दाढी ठेवत मात्र मिश्या काढत असत. ऋग्वेदात वर्णन केलेले हेच ते दास होत.यातील काही दासांनी वैदिक आर्यांचे वर्चस्व मान्य केले ते नंतर भारताचे शासक झाले. कुरुवंशाचा "सुदास" हा जमातप्रमुख राजा भरताचा पूर्वज होता.
ज्यांनी आर्यांचे वर्चस्व नाकारले ते दास मात्र मेसोपोटेमियाला "मदन" लोकांच्या आश्रयाला गेले आणि त्यांचे दास बनले. हे मदन मूलतः भारतातील यमुना भागातील होते आणि श्री कृष्णाचे वंशज होते परंतू इंद्राने कृष्णाला हरविल्यानांतर हे लोक सुमेरियात पळून गेले होते. सुमेरियन सभ्यतेत भारतीय म्हशींचे पुरावे मिळतात. ऋग्वेदात कृष्ण आणि इंद्र यांच्यामधील युद्धाचे सविस्तर वर्णन आहे. पुढे मदन लोकांनी मेसोपोटेमियातील अरबांचे नेतृत्व केले. याच भागातील असेरियन लोकांचे नेतृत्व करणारे असुर लोक मूलतः भारतीयच होते."सिरिया" हा देश आज त्यांच्या नावाने ओळखला जातो. मदन लोकांनी अरबांना लिपी शिकविली आणि नंतर भारतात येताना हे लोक हीच लिपी भारतात घेऊन आले.
तर हे कस्सी लोक सुमेरियातील मदन लोकांचे दास म्हणजे पुरोहित बनले होते.यांच्यात नंतर विवाह संबंध निर्माण झाले. पिंगळे हे आमचे नातेवाईक मूलतः "कस्सी" वंशाचे दास पुरोहित आहेत. सुमेरियात राम नावाचे अनेक राजे होते. त्यांचे पुरोहित किंवा दास हे कस्सी पुरोहित असायचे. हनुमान सुद्धा आपल्याला दाढी असलेले आणि मिश्या नसलेल्या अवस्थेत पहायला मिळतात. नंतर या दासांनी तुर्क आणि मोघलांचे नेतृत्त्व केले. असो,दास कोण होते हे विस्ताराने समजण्यासाठी हि माहिती दिली आहे.
इंद्र हा वैदिकांचा मुख्य देव असला तरी सुरुवातीला असुर हा त्यांना सर्वश्रेष्ठ देव होता. परंतू नंतर असुर आणि वैदिक यांच्यात मतभेद झाले. सुरुवातीला असुरांनी वैदिकांना भरपूर त्रास दिला. परंतू नंतर मात्र वैदिकांनी असुरांना पश्चिमेकडे हाकलून लावले. पारसी लोकांना असुर हा श्रेष्ठ तर देव हे दानव होते.युरोपियन लोकांकरिता देव हा "डेव्हील" होता.
वैदिकांनी कस्सी लोकांना पश्चिमेकडे हाकलले परंतू "कस्सी" लोक इंद्राला मात्र विसरू शकले नाहीत. इंद्र हा त्यांचा मुख्य देव होता.
मौर्य काळानंतर मात्र शैव लोकांचे वर्चस्व वाढू लागले. शैव लोकांचा रुद्र हा वैदिक पुषाण म्हणजे प्रजापति (दक्ष) कढून हारला होता परंतू नंतर शैव लोकांनी शैव पुराणांत दक्ष हा शिव कढून पराजित झाला होता असे दाखविले आहे. तसेच महाभारतात इंद्र हा कृष्णाकडून पराजित झाला असे दाखविले आहे परंतू वास्तवात कृष्ण हा इंद्राकडून हारला होता. वैदिक लोकांच्या इंद्राला लोकांनी पूर्णपणे नाकारले असले तरी विष्णूला मात्र वैदिकांनी लोकांत लोकप्रिय केले आहे.
अर्थात वैदिक आणि शैव लोकांच्या परस्पर सहकार्यामुळेच विष्णू हा पुढे आलेला आहे.
मोहेंजोदारो या सर्वात मोठ्या शहरात दासांचे आणि आदिवासींचे वर्चस्व होते. बाकीच्या काही शहरांत मराठी लोकांचे,काही शहरांत बंगाली लोकांचे आणि काही शहरांत दक्षिण भारतीयांचे वर्चस्व होते.
ग्रामीण जीवन:
शेती आणि व्यापार हा या सभ्यतेतील अर्थव्यवस्थेंचा मुख्य कणा होता. शेतकरी हा गावचा प्रमुख असायचा. शेतकऱ्यांकडे गाई आणि बैलांव्यतिरिक्त शेळ्या-मेंढ्या हि भरपूर असायच्या. मराठी लोक फेटा आणि धोतर ,बंगाली लोक धोतर आणि कोट आणि दक्षिण भारतीयांचा लुंगी असा पोशाख असायचा.सर्व महिला या कमरेखाली छोटासा स्कर्ट आणि आणि कमरेच्या वरचा भाग फक्त दागिन्यांनी झाकलेला असायचा.
व्यापार:
गुजरातमधील लोथलला जगातील सर्वात प्राचीन बंदराचा मान मिळाला आहे. आता हे बंदर बंद आहे. आता हा भाग गाळाने व्याप्त आहे. येथील व्यापारी मेसोपोटेमिया आणि इजिप्तपर्यंत व्यापार करत. नंतर मौर्य काळ ते मध्य-युगापर्यंत भरूच हे विदेशी व्यापाराचे प्रवेशद्वार होते. त्यामुळेच गुजराती लोक व्यापारात पुढे आहेत.
धार्मिक विधी:
इजिप्त आणि मेसोपोटेमिया प्रमाणे या सभ्यतेत मंदिरांचा एकही पुरावा मिळत नाही. मात्र लोक सार्वजनिक ठिकाणी जमा होऊन स्नान करत. लोक पशुपतीची आणि मातृदेवतेची पूजा करत.या सभ्यतेत सात सवासनिंची सुद्धा पूजा होत असे. सात सवासनिंना आजही महाराष्ट्र आणि दक्षिण भारतात पुजले जात आहे.
भटके जीवन:
हि सभ्यता नष्ट झाल्यावरती परत लोक भटके झाले.जातिव्यवस्था नसली तरी जमातींत सुद्धा जमातप्रमुख आणि त्यांची मुले आणि बाकी सर्वसामान्य असा मूलभूत फरक राहत असे. वैदिक काळात तर लोक भटकेच होते. वैदिक काळात साम्राज्य सोडा एकही मोठे शहर असल्याचा पुरावा मिळत नाही. मौर्य काळात भारताच्या शहरीकरणाला सुरुवात झाली. व्यवसायानुसार जाति निर्माण होऊ लागल्या. नंतरच्या गुप्त काळात जातिव्यवस्था भक्कम होऊ लागली. जे पशुपालकन या आपल्या व्यवसायाला चिकटून राहिले त्यांनी अनेक मोठी साम्राज्ये निर्माण केली.हे लोक काहीश्या दुर्गम भागात राहत जेणेकरून शत्रूंच्या हाती लागणार नाहीत आणि शत्रूंचा प्रतिकार करता येईल असे या लोकांचे प्रमुख अड्डे असत. महाराष्ट्रात माळशिरस, फलटण, शिंगणापूर,आटपाडी आणि मराठवाडा या सांगली-कोल्हापूर पेक्षा तुलनेने फार दुर्गम असलेल्या भागात या लोकांच्या प्रमुख गढ्या होत्या.
नंतर जे लोक सधन भागात स्थायिक होऊन शेती आणि पशुपालन दोन्हीही करत ते लोक गावांचे नेतृत्त्व करत. अश्या रितीने भटके जीवन पूर्णपणे सोडून स्थायिक झालेला पशुपालक गावाची लोकसंख्या वाढवत असे.त्यांच्यातूनच नंतर व्यवसायानुसार वेगवेगळ्या जाति बनत.
प्राचीन काळी सध्या असलेल्या अनेक प्रमुख जातींचे अस्तित्व नसल्यामुळे आणि लोकसंख्या कमी असल्यामुळे पशुपालकाला समाजाचे नेतृत्त्व करण्याची फार संधी होती. हि परंपरा वंशपरंपरेने अगदी मध्ययुगापर्यंत सुरु होती. १३ व्या शतकानंतर मात्र अनेक समाजबाह्य आणि दुर्गम भागात राहणारे घटक नागरी भागात घुसू लागल्यामुळे पशुपालकाकडून सत्ता हळूहळू दूर जाऊ लागली.
संदर्भ :ऋग्वेदातील जमाती ,प्राचीन मेसोपोटेमिया भागातील वंश,प्राचीन अनातोलिया (तुर्की) भागातील हट्टी लोकांची सभ्यता ,ऋग्वेदातील युद्ध,सिंधूजनांच्या धार्मिक विधी,अजंठा लेण्यातील भारतीयांची वेशभूषा आणि चेहरे आणि वर्तमान ग्रामीण लोकांचे अजंता लेण्यांतील लोकांशी दिसण्यात असलेले साम्य,सिंधू वासीय महिलांचे कपडे,दागिने आणि हात भरून असणाऱ्या बांगड्या ,अजंता लेण्यांतील महिला आणि ग्रामीण भागातील महिला यांच्या दिसण्यात आणि पायांतील वाळे या दागिन्यांतील साम्य..


Comments

Popular posts from this blog

धनगर समाजातील आडनावे-

List of Hatkar clans

About 108 clans(108 कुळ/कुल) of Dhangars and 22 sub castes (22 पोट जाती).