सुभेदार मल्हारराव होळकर यांना साथ देणारी प्रमुख धनगर घराणी

सुप्रसिद्ध अश्या इंदोरच्या होळकर घराण्याचे संस्थापक आणि मराठा स्वराज्याचे साम्राज्यात रूपांतर करणारे तसेच अटकेपार झेंडे रोवणारे सुभेदार मल्हारराव होळकर यांची आज जयंती. महाराष्ट्रा बाहेर मराठा साम्राज्याचा वेगाने विस्तार होत असताना त्यांना जहागीरीत मिळालेल्या माळवा प्रांतात त्यांनी १७३२ साली इंदोर शहराची स्थापना केली आणि आपली राजधानी नेमली. इंदोर शहर वसवताना त्यांनी टोलेजंग राजवाडे बांधायला घेतले. तसेच आपले भाईबंद आणि जातवाले महाराष्ट्रातून इंदुरात आणि माळवा प्रांतात आणले आणि स्थायिक केले. अनेक धनगर घराण्यांच्या उत्कर्षास मल्हारराव होळकर जबाबदार आहेत. मल्हारराव उत्तरेकडे मोहीम आखताना तसेच इंदोरला स्थिरस्थावर होत असताना धनगर समाजातील शिवपूर्व कालीन, होळकरांची पराक्रमी आप्तेष्टमंडळी जशे की लांभाते, बूळे, बारगळ, वाघ, फणसे, वाघमारे ही घराणी मल्हारबांना येऊन मिळली. या पराक्रमी घरण्यांसोबत अनेक असंख्य अशी धनगर घराणी होळकरशाहीत मल्हारबांना आणून वसवली. इंदोरला आलेल्या अनेक घराण्यांनी होळकर घराण्याच्या नेतृत्वाखाली पराक्रम दाखवून होळकरशाही पर्यायाने मराठा साम्राज्य मजबूत करण्यात हातभार लावला. त्या बदल्यात त्यांना मराठा साम्राज्यातील उत्तर हिंदुस्थानात माळवा प्रांत, राजपुताना या ठिकाणी सरंजामी जहागिरी मिळाल्या. महाराष्ट्रातील धनगर समाज उत्तर हिंदुस्थानात तसेच महाराष्ट्र मध्ये एका स्थिर पातळीवर आला त्यात होळकर घरण्याचा सिंहाचा वाटा आहे.
मराठा साम्राज्याचे सुभेदार असलेले होळकर घराण्याचे संस्थापक "श्रीमंत सुभेदार राजश्री मल्हारराव होळकर" यांना साम्राज्य विस्ताराच्या आणि तब्बल २२० वर्षे होळकरशाही टिकवण्यासाठी मोलाची साथ देणाऱ्या होळकरशाहीतील धनगर सरदार, जहागिरदार आणि इतर घराण्यांची नावे पुढील प्रमाणे :-
प्रमुख धनगर सरदार मंडळी :-
१) सरकार बुळे सरदार :-
सरदार वीठोजीराव बुळे
सरदार गंगोजीराव बुळे
सरदार म्हाकोजीराव बुळे
सरदार गोविंदाराव बुळे (प्रथम)
सरदार चिमजीराव बुळे (प्रथम)
सरदार सुभानराव बुळे
सरदार गोविंदाराव बुळे (दुसरे)
सरदार नारायणराव बुळे
सरदार बळवंतराव बुळे
सरदार चमनाजीअप्पा बुळे (दुसरे)
सरदार गोविंदाराव बुळे (तिसरे)
सरदार भीमाबाई बुळे
२) सरदार राजेवाघ :-
सरदार संताजी राजेवाघ
सरदार उदाजी वाघ
सरदार तुळसाजी राजेवाघ
सरदार माधवराव राजेवाघ
३) सरदार बारगळ जहागिरदार :-
भोजराज बारगळ जहागिरदार
सरदार नारायणराव बारगळ
३) सरदार लांभाते जहागिरदार :-
सरदार विसाजी लांभाते
सरदार सुल्तानजी लांभाते
सरदार उदाजी लांभाते
सरदार भिवाजी लांभाते
४) सरदार फणसे पाटील जहागिरदार :-
सरदार यशवंतराव फणसे
सरदार राजारामभाऊ फणसे
सरदार गणपतराव रेवजी फणसे
५) सरदार वाघमारे पाटील :-
सरदार मानाजी वाघमारे
सरदार बाबुराव वाघमारे
सरदार अवचितराव वाघमारे
६) सरदार मतकर पाटील :-
बजाजी मतकर पाटील
सरदार माधवराव मतकर
सरदार कोंडाजीराव मतकर
सरदार गोविंदराव मतकर
सरदार चंद्रसेनराव मतकर
सरदार मधुसूदनराव मतकर
सरदार रणजीतसिंह मतकर
सरदार फत्तेसिंह मतकर
७) सरदार पिसे पाटील :-
पिराजी पिसे पाटील
८) सरदार गावडे जहागिरदार :-
सरदार रघुनाथराव गावडे
सरदार कृष्णराव गावडे
९) सरदार झनाने पाटील :-
सरदार रामचंद्रराव झनानेसाहेब
१०) सरदार चांगण :-
सरदार शंकरराव चांगण
सरदार आप्पा साहेब चांगण
सरदार राजाराम चांगण
११) सरदार भांड :-
सरदार आनंदराव भांड
इतर धनगर सरदार घराणी :-
सरदार भागवत
सरदार खटके
सरदार शिंदे चौंडीकर
सरदार पिंगळे
सरदार बोराडे
सरदार कलगावडे
सरदार गाढवे
सरदार कोकरे
सरदार काळे
सरदार बहाड
सरदार डोईफोडे
सरदार फत्तेपुरकर
सरदार धायगुडे
(सदरील यादीत होळकरांच्या मुख्य घराण्यातील पुरुषांची नावे दिली नाही याची नोंद घ्यावी)
होळकरशाहीतील धनगर स्त्री खासगी जहागिरदार :-
(मराठा साम्राज्यात खासगी बाळगण्याचा अधिकार फक्त होळकर घराण्याकडे होता, त्यामुळे हे शक्य झाले)
१) श्रीमंत गौतमाबाई साहेब होळकर
२) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर
३) श्रीमंत कृष्णाबाई साहेब होळकर
४) गेहणाबाई भांड
५) वाघमारे
६) जीऊबाई वाघ
७) बारगळ
८) चौंडीकर शिंदे
९) राधाबाई भागवत
१०) मुक्ताबाई फणसे
११) मथुराबाई होळकर
१२) रखमाबाई मतकर
१३) नानुबाई बुळे
१४) हरकुबई मावशी
१५) सौभाग्यवती बाळाबाई
१६) श्रीमंत उदाबाई वाघमारे
१७) श्रीमंत मुक्ताबाई फणसे सरकार
१८) श्रीमंत सिताबाई लांभाते
१९) श्रीमंत भिमाबाई होळकर
२०) श्रीमंत तुळसाराणी होळकर
२१) श्रीमंत लाडाबाई होळकर
(सदरील यादीत होळकर घराण्याती मुख्य गादीवरील स्त्रियांची नावे पूर्ण नाहीत याची नोंद घ्यावी, आणि ह्या सर्व खासगी जहागिरदार होत्या.)
होळकरशाहीच्या काळातील काही अपरिचित धनगर घराणी :-
१) भोजने २) नाचणं ३) वीरकर ४) लाळगे ५) लांडे ६) तोंडे ७) लेंडे ८) नाचणं ९) नजन १०) देडगे ११) बनसोडे १२) सरोदे १३) बिंगळे १४) गंधारे १५) गाढवे १६) दातीर १७) पोंडे १८) बुधे १९) गुंड २०) घुने २१) गवते २२) मैंदाड (पहिलवान) २३) बूटे २४) धामोरे २५) कुचेकर २६) वारे २७) राहिंज २८) राशींनकर २९) भोंडवे. अशी असंख्य घराणी आहेत...
(ही सर्व समस्त धनगर समाज घराणी आजही होळकर साम्राज्याचा भाग असलेल्या मध्यप्रदेश, राजस्थान आणि उत्तर हिंदुस्थान याठिकाणी स्थायिक आहेत)
अटकेपार झेंडे लावणाऱ्या धनगर घरण्यांचा क्षत्रियांच्या वंशावळी उल्लेख संस्कृत श्लोक पुढीलप्रमाणे :-
अथ तेषा ज्ञाती भेडा विज्ञेया: पूर्वकल्पिता: !
तिलोलाश्चां जनेयाश्च महाराष्ट्राश्च रुद्राका !!
रथवाहाश्च पंचाशत्यंख्याका बालघाटका: !
वैदेशिका विनसूर्या: कटुकाश्चेती वैदेशी: !!
मालाकार व्दिघा प्रोक्त: पुष्यधासम्मितो बुधै: !
धनगरोपि व्दिघा पोक्तस्तत्र खुटोहिचोन्तम: !!
सुभेदारांवर रचलेली काव्य :-
वीरो महान योध गणेपु मुख्यो
बलाधिपः शास्त्रविधान सुज्ञ:|
सदा यशस्वी सतंतं समर्थो
मल्लारिरावो विदितः पृथिव्याम |
अर्थ - अत्यंत शुर, महान योध्यांच्या समुहातील प्रमुख ; युद्ध शास्त्रांची उत्तम जाण असणारे , नेहमी यशस्वी होणारे , सदैव सामर्थ्यशाली असे मल्हारराव या पृथ्वीतलावर माहित आहे.

लेखक: अवधूत लाळगे 

संदर्भ 📚 :- १) इंदोर का क्षत्रिय धनगर समाज
२) होळकरांची कैफियत
३) शिखर शिंगणापूरचा शंभू महादेव
४) क्षत्रिय धनगर समाज संघ इंदूर ची वार्षिक स्मरणिका
५) होळकरशाही भाग १
६) धनगर समाज
७) सुभेदार मल्हारराव होळकर एक राष्ट्र पुरुष
🙏जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन🙏
पराक्रमाच्या अखंड परंपरेला मानाचा मुजरा...🗡🇮🇩

Comments

  1. खूप सुंदर माहिती पण श्रीमंत तुकोजीराव होलकर यांचा नाव पण लिहा। ते मल्हार राव यांचे दत्तक पुत्र होत्या आणि मल्हार राव याँन्ना साथ दिला आणि मातोश्री अहिल्यादेवी सोबत ही खूप योगदान दिले म्हणून मातोश्री ने मलेराव यांचा निधनान्तर त्यांना उत्तराधिकारी घोषित केला होता।

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

धनगर समाजातील आडनावे-

List of Hatkar clans

About 108 clans(108 कुळ/कुल) of Dhangars and 22 sub castes (22 पोट जाती).