भारतात वैदिक पुरोहितांचे महत्त्व कमी होण्याची कारणं
जैन आणि बौद्ध या अवैदिक धर्मांच्या वाढत्या प्रभावांमुळे भारतात शाकाहाराचे महत्त्व वाढू लागले. त्यामुळे यज्ञ आणि पशुबळींचे प्रमाण फार कमी झाले. हिंदू पुरोहित पण जैन आणि बौद्ध या अवैदिक परंपरेतील भिक्षुंप्रमाणे डोक्याचे मुंढन करू लागले.फक्त शेंडी किंवा शिखा हा प्रकार ठेवून त्यांच्यापेक्षा थोडेसे वेगळेपण निर्माण करण्यात आले. यज्ञ आणि पशुबळींपेक्षा तत्वज्ञान आणि गणिताचा अभ्यास या विद्वत्ता मानल्या जाणाऱ्या बाबींवर जास्त भर देण्यात आला. असे असली तरी ग्रामीण भागात मात्र पशुबळी सुरूच होते मात्र यज्ञात दिल्या जाणाऱ्या पशूंच्या अगणित बळीपेक्षा हि संख्या फार कमी झाली. एका घरात एकाच पशुची बळी देण्याची प्रथा सुरु झाली आणि यज्ञ बंद झाले.
Comments
Post a Comment