सर्पाची चाहूल*


*आप्पाचीवाडी , ता . चिकोडी , जि . बेळगाव येथील बळवंत कोडिबा गोते यांना देखील सद्गुरू बाळूमामा आपले सच्चे अनुयायी मानीत होते . पशुपक्ष्यांना देखील मामांच्या अवतारीपणाची जाणीव होती , असे गोते सांगतात . मामांची बकरी त्यांच्या वास्तव्यापासून चतुर्दिशांना जवळजवळ १५० - २०० किलोमीटरच्या अंतरात चारावयास जात असत . असेच एकदा सद्गुरू बाळूमामा कोकणात बकरी चारावयास घेऊन गेले होते . बळवंत गोतेसह अनेक माणसे मामांच्या सान्निध्यात कोकण दौ - यावर होती . शुक्ल पक्ष असल्याने चंद्राची प्रसन्नता सर्वांना मोहवत होती . भूतलावर शुभ्र चांदणे विखुरले होते . संध्या प्रेमाने खुलली होती . कौमुदी हसत असल्याचा भास होत होता . मामांची बकरी पोटभर चरून शांतचित्ताने रस्त्याने मुक्कामाच्या होती . स्थळी निघाली होती . सर्व मंडळी बक - यांपुढे गप्पागोष्टीत गढून गेली रस्त्याने चालत असता एक घोणस सर्प ( फुरसे ) रस्त्याच्या* *मध्यभागी माती चाटत आडवा पडला होता . त्याची जाणीव सर्वप्रथम बाळूमामांना झाली . नंतर सर्व मंडळींचे लक्ष त्या सर्पाकडे जाताच सर्वांचे पाय जागच्या जागी खिळून राहिले . जर त्या प्राण्याच्या शरीरावर पाय पडला असता , तर अशा नाना त - हेच्या भीतीयुक्त विचारात सर्वांची मती गुंग झाली . सर्वांची चाहूल लागून देखील सपने सूतभरही जागा सोडली नाही . सद्गुरू बाळूमामा सर्वांच्यापुढे चार पाऊल सरसावले . सर्व जण एक वेळ मामांकडे तर एक वेळ सर्पाकडे असे आलटून पालटून पाहू लागले . मामा धीरगंभीर स्वरात म्हणाले , ' अरे , रस्त्यावर येणे बरे नाही . एखाद्याच्या मनात भीती निर्माण होईल , अगर तुझ्यावर नजरचुकीने पाय पडल्यास त्याला त्रास देशील , तेव्हा तू बाजूला हो पाहू . ' असे म्हणताच तो सर्प बाजूला झाला . नंतर त्या मुक्या प्राण्याच्या शरीराची नकळत थोडीशी वळवळ झाली . आपल्या तोंडाचा दोन इंच भाग उंच करून तो परत जमिनीला टेकला . जणू काय ही सर्पाची भूमिका , त्याची हालचाल म्हणजे या मुक्या सरपटणाच्या प्राण्याने मामांना नतमस्तक होऊन केलेला नमस्कार असावा . मामांनी त्या सर्पाभोवती एक रिंगण काढले व ‘ इथेच थांब ' अशी मर्यादा घालून दिली . शरीराचे वेटोळे करून तो सर्प रिंगणाच्या आत राहिला . सद्गुरू बाळूमामा मुक्कामाचे स्थळी पोहोचले . सर्वांचे जेवण झाले . मामांनी पण दहीभात ग्रहण केला . दिवसभर वणवण भटकणारे सर्व जीव विश्रांतीसाठी झोपी गेले . जणू निद्रेच्या आधीन झाले . पहाटे सूर्यदेवाच्या भालदार चोपदारांची चाहूल लागते न लागते तोच सर्व जण उठून आपल्या कर्तव्यात गढून जाऊ लागले . नित्याप्रमाणे मामांनी बकरी चरावयास बाहेर काढली . रात्रीच्याच रस्त्याने मामा चालले* *होते . मामांनी आखलेल्या रिंगणाची लक्ष्मणरेषा न ओलांडता रात्रीचा तो सर्प वेटोळे करून आहे त्या स्थितीत पडून होता . मामांची दृष्टी त्याच्यावर गेली . मामा आत्मीयतेने त्याला म्हणाले , “ अरेरे ! आपण जेवलो , पण हा उपाशी आहे . आखलेले रिंगण त्यांनी पायाने पुसले व म्हणाले , चल , जा , त्या बघ समोर बेडक्या आहेत , त्या खा जा . ' मामांनी असे म्हणताच तो सर्प तत्काळ झेपावला व आपले भक्ष्य पकडले . क्षणाचाही विलंब न लावता त्याने आपले भक्ष्य गट्ट केले . सर्व जण थक्क झाले . मामांच्या असामान्यतेची जाणीव सर्व मंडळींना झाली .*

https://www.facebook.com/vinaykumar.madane/posts/1780514418747632?__xts__%5B0%5D=68.ARBFX9qieRfrDodBdk2gAS2PEjQRmcCSmBrBjmEtFYm-gv0SRklHC36WwK9Dar70J4ZDWibuF1_SkJjJUCRH8HyIrvRazZ5fN1NtadUb4CnnblpfeeMH2dlMQmAqXlXx3PP9aiWwgdTwMY4oyB4kWiKhIqKtTePTxnuhoytybwH15UjSdkC07tlvvrHHZmHm0aejp9SALfoAR6sow_I8jqSV2JyU8mt9J1Xyl4Tx5zRQpyKOLMU10E5UEsdJLIbbsBDOCK4fchcmiRILxZx8IYJxVqcYYXNcO7F1IcOdsH6yGpBlICXPy-sxzO4PfDqA5ltoByDB3hXpdWdimEAU&__tn__=-R

Comments

Popular posts from this blog

धनगर समाजातील आडनावे-

About 108 clans(108 कुळ/कुल) of Dhangars and 22 sub castes (22 पोट जाती).

List of Hatkar clans