भारतीय आणि पाश्चिमात्य राशीचक्रातील मूलभूत फरक

भारतीय आणि पाश्चिमात्य राशीचक्रातील मूलभूत फरक
पृथ्वीच्या स्वतः भोवती फिरण्यामुळे दिवस तयार होतो आणि सूर्याभोवती फिरण्यामुळे ऋतू तयार होतात. २१ मार्चला सूर्य बरोबर डोक्यावरती असतो. एका काल्पनिक चक्रावरती( क्रांतिवृत्त) या दिवशी सूर्य दक्षिण गोलार्धातून उत्तर गोलार्धात प्रवेश करताना विषुवृत्ताला ज्या बिंदूत छेदतो तो बिंदू म्हणजे वसंतसंपात बिंदू होय. या दिवशी सूर्याची किरणे पृथ्वीवरती बरोबर लंबरूप पडतात.
पृथ्वीचा अक्ष स्थिर नाही. तो दर २६ हजार वर्षांनी एक प्रदक्षिणा पूर्ण करतो. त्यामुळे जसा जसा पृथ्वीचा अक्ष फिरतो, तस तसा वसंतसंपात बिंदू पश्चिमेकडे सरकत जातो.प्रत्येक वर्षी तो ०.०१४ अंशांनी (५०.४ विकला) सरकतो. ग्रेगरियन दिनदर्शिकेनुसार वसंतसंपात दर वर्षी १९ ते २१ मार्च यापैकी एका दिवशी येतो.
इथे एक लक्षात घ्या कि राशीचक्रातील सूर्य हा स्थिर आहे. इतर ग्रह आणि पृथ्वी मात्र सूर्याभोवती फिरत आहेत. तसेच तारकापुंज हा स्थिर असतो. हे तारकापुंज म्हणजे राशींचा आकार होय. पृथ्वी फिरत असल्यामुळे आपल्याला वाटते कि या तारकापुंजांचे सूर्यापासूनचे अंतर बदलत आहे. त्यामुळे आपणाला भास होतो कि सूर्य हा राशी बदलत आहे.
पृथ्वीचा अक्ष स्थिर नसल्यामुळे आपणाला भास होतो कि वसंतसंपांत बिंदू हा पश्चिमेकडे थोडा थोडा सरकत आहे. आता तुमच्या मनात हा प्रश्न पडला असेल कि एवढ पूर्वीच्या खगोल अभ्यासकांना कस काय माहित झालं बरं ? सुरुवातीला बाबिलोनियाच्या खगोल अभ्यासकांनी राशींचा वर्तुळ कागदावरती जेव्हा रेखाटला तेव्हा वसंतसंपांत बिंदू हा सरकतो हे त्यांच्या लक्षात आले नव्हते. परंतू नंतर जेव्हा ग्रीक खगोलतज्ञ आकाशात दुर्बिणीच्या साहाय्याने निरीक्षण करू लागले तेव्हा त्यांच्या हे लक्षात आले कि मेष राशीचा कोण कमी होत आहे. नंतर जेव्हा राशींची कल्पना भारतात आली तेव्हा भारतीय खगोलतज्ञांनी हा मुद्दा लक्षात ठेवला.
आधुनिक तारकासमूहांनुसार वसंतसंपात बिंदूने इ.स.पू. १८६६ साली वृषभ तारकासमूहातून मेष तारकासमूहामध्ये प्रवेश केला, इ.स.पू. ६८ साली मीन मध्ये प्रवेश केला. इ.स. २५९७ मध्ये हा बिंदू कुंभमध्ये प्रवेश करेल आणि इ.स. ४३१२ साली मकर तारकासमूहात.मेष हि राशीचक्रातील प्रथम राशी आहे. राशीचक्र काढताना मेषपासून घड्याळाच्या फिरण्याच्या दिशेने क्रमाने बाकी राशी काढल्या जातात. इसवी. पूर्व. ८०० मध्ये मेषराशीचा काळ हा २१ मार्च ते २१ एप्रिल होता. दर २००० वर्षांनंतर संपातबिंदू हा घड्याळाच्या फिरण्याच्या उलटया दिशेने म्हणजे कागदावरती पश्चिम दिशेला एक एक घर पुढे सरकतो. म्हणून आज संपातबिंदू हा मीन राशीत आहे. या कारणामुळे आज मेषराशीचा काळ हा १५ एप्रिल ते १५ मे म्हणजे २७०० वर्षांत मेष राशी हि एक घर पुढे सरकली आहे आणि तिचे स्थान आज मीन राशीने घेतले आहे. मीन राशीचा आजचा काळ हा १५ मार्च ते १४ एप्रिल हा आहे. इंग्लिश कॅलेंडरप्रमाणे हा काळ १९ फेब्रुवारी ते २१ मार्च हा आहे. राशीचा पहिला दिवस हा फार शुभ मानला जातो. माझी रास वृषभ आहे आणि तिचा काळ हा १६ मे ते १५ जून हा आहे. माझा जन्म हा १६ मेला झाला आहे.
याचा अर्थ मेष राशीचे गुण मीन राशीने घेतले असा होत नाही तर आज जो मेष राशीचा काळ एप्रिल-मे हा आहे तो २० हजार वर्षांनी नोव्हेंबर-डिसेंबर होणार आहे म्हणजे त्यावेळेस या काळात जे लोक जन्माला येतील त्यांची रास हि मेष असणार आहे.
पाश्चिमात्य राशीचक्रात वसंतसंपात बिंदूचा स्थानबद्दल लक्षात घेत नाहीत. त्यामुळे राशींचा काळ बदलत नाही. तसेच पाश्चिमात्य राशिचक्रात चंद्र, राहू, केतू आणि इतर ग्रहांचा मनुष्यावरती काहीही परिणाम मानला जात नाही किंवा त्या लोकांनी ज्योतिषशास्त्रात या ग्रहांना काहीही महत्त्व दिलेले नाही.

Comments

Popular posts from this blog

धनगर समाजातील आडनावे-

About 108 clans(108 कुळ/कुल) of Dhangars and 22 sub castes (22 पोट जाती).

List of Hatkar clans