आपला देश मागास आहे कारण आम्ही अजुनही इतिहास-मागास आहोत.
आपला देश मागास आहे कारण आम्ही अजुनही इतिहास-मागास आहोत. आम्ही स्वजातींच्या-स्वप्रांताच्या पलिकडे जाऊन इतिहासाचा विचार करु शकत नाही. त्यामुळे खरे तर आम्हाला इतिहासच नाही. जी आहेत ती नुसती स्वभ्रम जोपासणारी मिथ्थके आहेत. त्यामुळे आम्ही आमच्याच इतिहासाबाबत नेहमीच संभ्रमात असतो.
वाचकांचाही द्रुष्टीकोन सहसा असाच जातीय परिप्रेक्षातीलच असल्याने व श्रद्धा वा समजुतींना नवीन पुराव्यांच्या परिप्रेक्षात चिकित्सकपणे व उदारपणे पाहण्याची मनोव्रुत्तीच नसल्याने इतिहासावरुन आपल्याकडे वारंवार वादंगे होत असतात.
निखळ सत्त्याचा शोध हेच इतिहासकाराचे कार्य असते, मग जे सामोरे येईल ते किती का कटु असेना, त्याची निर्भीड मांडनी केलीच पाहिजे. परंतु जातीय झुंडशाह्या मुलतत्ववादी बनत अशा मांडण्यांना अनेकदा सुरुंग लावतात. परंतु हाच छुपा का होईना, मुलतत्ववादी दुर्गुण बव्हंशी इतिहासकारांत घुसला असल्याने त्यांच्या संशोधनाला व त्याहीपेक्षा त्यांच्या मांडनीला जातीय पुर्वग्रहांची पुटे चढलेली आपल्याला दिसतात, मग ते कोणत्याही जाती/धर्माचे का असेनात.
Comments
Post a Comment