सांस्कृतिक भुगोल राजकीय भुगोलावर नेहमीच मात करुन उरतो.

राजकीय सीमा या बदलू शकतात. इतिहासकाळात तर त्या असंख्यवेळा बदललेल्या आहेत. पण आजच्या राजकीय सीमा लक्षात घेत सांस्कृतिक इतिहासाची मांडणी करायला निघत जे संस्कृतीचा उगम आमच्याच प्रदेशातून झाला हे सांगण्याची व तसे पुरातत्वीय पुरावेही (?) जमवण्याची शिकस्त करु लागतात तेंव्हा हे सांस्कृतिक लबाड आहेत हे समजावे लागते. पाकिस्तानी संशोधक मोहेंजोदरो हरप्पालाच सिंधू संस्कृतीचे मुल उगमस्थान कसे आहे हे सिद्ध करायच्या मागे लागलेत तर तेवढ्याच मुर्खपणाने भारतीय संशोधक घग्गर (ज्याला ते अतीव अज्ञानापोटी सरस्वती म्हणतात.) नदीच्या काठीच्या राखीगढीला सिंधू संस्कृतीचे उगमस्थान सिद्ध करायच्या पाठी आहेत.
संस्कृतीचे उगमस्थान अशी एक जागा नसते. ती तुमच्या आजच्या राजकीय/सांस्कृतीक वर्चस्वतावादासाठी नसते. कोणतीही संस्कृती त्या त्या काळच्या मानवी समुदायाची सामुहिक उत्पत्ती असते.
आजचा राजकीय भुगोल शे-पाचशे वर्षांनी कसा असेल याचे भाकीत मांडायला कोणाकडेही कसलेही साधन नाही. संस्कृत्या आजच्या राजकीय सीमांचा विचार करून जन्माला आलेल्या नव्हत्या. सांस्कृतिक भुगोल राजकीय भुगोलावर नेहमीच मात करुन उरतो.
लबाडांच्या संस्कृत्या खोट्या असतात म्हनून त्यांचा अभिमानही वृथा होउन जातो!

Comments

Popular posts from this blog

धनगर समाजातील आडनावे-

List of Hatkar clans

About 108 clans(108 कुळ/कुल) of Dhangars and 22 sub castes (22 पोट जाती).