मेषपाल- "खरात" (संस्कृत:क्षहरात) घराणे
महाक्षत्रप नहपान:
नहपान हा इराणी शब्द असून नह म्हणजे जनता व पन म्हणजे रक्षणकर्ता. नहपान हा गौतमीपुत्र सातकर्णीच्या समकालीन.नहपान हा खरात( क्षहरात) घराण्यातील पश्चिमेवर राज्य करणारा एक क्षत्रप होता. तो अत्यंत महत्वाकांक्षी होता. मुळचे हे क्षत्रप कुशाणांचे(Khushan are Gurjars) अधिकारी, पण कुशाणांची सत्ता खिळखिळी झाल्यावर ते स्वतंत्र बनले. इ.स. ३२ मद्धे नहपान सत्तेवर आला. प्रथम हा सत्रप (गव्हर्नर) होता. पुढें यानें आपल्याला महाक्षत्रप व राजा हीं उपपदें लाविलीं. यानें आपलें राज्य दक्षिण राजपुताना ते नाशिक पुणेंपर्यंत (सुराष्ट्र काठेवाड धरून) वाढविलें होतें.
नहपानाने गौतमीपुत्राच्या पूर्वजांवर वारंवार आक्रमणे करुन माळव्यापासून दक्षिणेपर्यंत असलेली सातवाहनांची सत्ता निष्प्रभ केली इतकी की गौतमीपुत्र राजा झाला तंव्हा त्याच्या ताब्यात साताऱ्याचा काही भाग सोडला तर काहीच उरले नाही. कोकण-गोमंतकही नहपानाने हिरावून घेतला असल्याने तेथल्या बंदरांतून चालणारा व्यापारही नहपानाच्या हाती गेला.
परंतु गौतमीपुत्र हा अत्यंत पराक्रमी पुरुष होता. त्याने नहपानावर सलग आक्रमणे सुरू केली. जवळपास वीस वर्ष त्याने नहपानाशी संघर्ष केला. त्याला पूर्वजांनी उभारलेल्या गिरिदुर्गांचाही त्याला उपयोग झाला.
गौतमीपुत्राने नहपानावर विजय मिळवून सातवाहन साम्राज्याचे गतवैभव परत प्राप्त केले आणि मराठी भाषेस सुवर्णकाळ प्राप्त केला .
नाशिक जवळ अतिशय निकराचे युद्ध करुन गौतमीपुत्राने नहपानाचा समूळ पराभव केला. त्याला ठार मारले. नाशिक येथील लेण्यातील एका शिलालेखात गौतमीपुत्र अभिमानाने नोंदवतो- "खखरात (क्षहरात) वंस निर्वंस करस.
स्वतःला राजर्षिवधू म्हणवून घेणाऱ्या त्याच्या आईने-गौतमी बलश्रीने-नाशिक येथील शिलालेखात आपल्या पुत्राच्या मागे " खखरात (क्षहरात) वंस -निरवशेषकर शकपल्हवनिषूदन समुद्रतोयपीतवाहन" अशी बिरुदावली कोरवून घेतली आहे. त्याचा स्वैर अनुवाद पुढीलप्रमाणे --
"क्षत्रियांचा गर्व आणि अभिमान यांचा नि:पात करणारा, शक, यवन आणि पल्लव यांचा सर्वनाश करणारा, क्षहरात घराण्याचा पराभव करून सातवाहन घराण्याची उज्ज्वल परंपरा पुन:स्थापित करणारा....."
"क्षत्रियांचा गर्व आणि अभिमान यांचा नि:पात करणारा, शक, यवन आणि पल्लव यांचा सर्वनाश करणारा, क्षहरात घराण्याचा पराभव करून सातवाहन घराण्याची उज्ज्वल परंपरा पुन:स्थापित करणारा....."
Comments
Post a Comment