नागा साधू- अघोरी योद्धे अन आजचे कुतूहल
आदीशंकराचार्यांनी परकीय आक्रमणांपासून हिंदू धर्म, व त्यांची प्रतीके यांचे रक्षण करण्यासाठी नागा साधूंना एकत्रित करून आखाड़े तयार केले. त्या आखाड्यात शारीरिक सुदृढ़ता व लढाईकौशल्ये यांवर भर दिला जाई.
हे नागा साधू म्हणजे धर्म, देश रक्षणासाठी घरदार सोडून आलेले लोक. ब्रम्हचर्यपालन करत असताना स्वतः ला कठोर शारीरिक यातनेत ठेवणे ,स्वतःचे पिंडदान करून श्राद्ध घालणे,एकवेळ जेवणे, बिनकपड्याचे राहणे, जमिनीवर झोपणे हे त्यांचे अघोरी नियम.ह्या नागा साधूना ब्रम्हचर्याचे खडतर पालन करुन लिंगभंग करावे लागे.
तर अशा नागा साधुनी अनेक युद्धांमधे सहभागी होऊन धर्मरक्षण केल्याचे दाखले आहेत. अगदी अहमद शाह अब्दाली चा हल्ला परवतून लावण्यात सहभागी होते.
आता युद्धात सहभागी होणार म्हणजे शस्त्रे बाळगणे तर आलेच. युद्धखेरीज या लोकांना सामान्य समाजजीवनात हस्तक्षेप करण्यास परवानगी नव्हती. म्हणून सर्वसामान्य जगात काय चालले आहे याचे सोयरसुतक नसावे म्हणून हे लोक चिलीम नशेत रहायचे.
धर्मरक्षण हे ध्येय राहून नागा साधू ह्यांचे जीवन हे अघोरी साधना करणे, स्वतःच्या शरीराला वेदना देणे , प्रेतांची साधना करणे, अगदी प्रेताची हाडे भक्षण करणे, चिलीम ओढणे या धर्मआचरणाविपरीत गोष्टी करण्यात जायचे. मुळात असे जीवन जगने हे पाप भोगणे असे मानण्यात येते. (युद्धात दुसऱ्याचा जीव घेणे हे सुद्धा)
कुंभमेळा अघोरी विद्येच्या हिशोबाने शक्ती प्राप्त करण्याचे स्थान मानले जाई. अर्थात या धर्मरक्षक म्हणून मेळाव्यात मान पहिलाच अगदी मोक्षासाठीसुद्धा.
स्वातंत्र्योत्तर काळात नागा साधूनी आपले सैन्य चरित्र सोडून दिले. परंपरेचे अनुपालन करत संयमित जीवन जगणे अन स्वतःचा संस्कृतीचा वारसा जपणे इतकेच त्यांचे ध्येय.
नागा साधूंची विचित्र साधना अनेक परदेशी लोकांना आकर्षित करते. लोकांना तो पब्लिसिटी स्टंट वाटत असते पण नागा ना त्याचे काहीच देणे-घेणे नसते. पण उगाच त्याना अंगलट करणे चुकीचेच. १९७० साली तर एक फॉरेनर नागा साधू झाल्याचे ऐकिवात आहे- बाबा रामपुरी नामक.
काही फॉरेनर्स नागांबरोबर राहणे स्टंट समजतात. खालील लिंक पहाव्यात.
इन शार्ट कोणी कितीही डोकेफोड़ केली, समर्थन केले वा विरोध केला याने या नागा साधूना काहीच फरक पड़त नसतो. हे कुंभमेळाव्यात चर्चेस येतात अन इतर वेळेस गुडुप होता
Comments
Post a Comment