चाणक्य कोण होता?


चाणक्य ही व्यक्ती खरेच होऊन गेली का? चाणक्य आणि कौटिल्य हे एकच होते की वेगवेगळ्या व्यक्ती होत्या? चाणक्याने चंद्रगुप्ताला राज्य स्थापन करण्यासाठी मदत केली हे कितपत खरे आहे? या सगळ्या प्रश्नांवर इतिहास संशोधकांमध्ये प्रचंड मतभेद आहेत.
आज आपणास जो चाणक्य विविध प्रसारमाध्यमांतून सांगितला जातो तो मुद्राराक्षस या संस्कृत नाटकातील प्रमुख पात्र आहे. विशाखादत्त या नाटककाराने हे नाटक इसवी सनाच्या आठव्या शतकात लिहिले. म्हणजे सम्राट चंद्रगुप्ताच्या नंतर सुमारे बाराशे वर्षांनंतर. त्यामुळे या नाटकातील घटना कितपत ख-या मानायच्या हा एक प्रश्नच आहे. आपण पाहतोच की केवळ साडेतीनशे वर्षांपूर्वीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास कांही इतिहासकारांनी किती विकृत करून टाकला आहे. मग सुमारे तेवीसशे वर्षे जुन्या काळातील घटनांचे किती विकृतीकरण झाले असेल?
चाणक्य आणि कौटिल्य यांना एकच मानले जाते आणि कौटिल्याच्या अनेक गोष्टी चाणक्यनीतीच्या नावावर खपवल्या जातात. पण कौटिल्याच्या अर्थशास्त्र या ग्रंथाची भाषा आणि त्यातील वर्णने चंद्रगुप्त मौर्याच्या काळाशी जुळत नाहीत, तर नंतर झालेल्या गुप्त घराण्याच्या काळाशी जुळतात. याचाच अर्थ कौटिल्य ही व्यक्ति गुप्त घराण्याच्या काळात होवून गेली असा होतो. त्यामुळे चाणक्य आणि कौटिल्य या दोन वेग-वेगळ्या व्यक्ती आहेत, असे बहुतांश निरपेक्ष इतिहास संशोधक मानतात.
वैदिक परंपरेत चंद्रगुप्ताला शूद्र म्हंटले आहे. चाणक्य जर वैदिक ब्राम्हण असता तर त्याने शुद्र चंद्रगुप्ताला राज्य स्थापन करण्यासाठी मुळीच मदत केली नसती. उलट विरोध केला असता. पण असे घडले नाही, याचा अर्थच चाणक्य वैदिक नव्हता हा आहे.
वैदिक ब्राम्हणांच्या आवडत्या व्यक्तींमध्ये चाणक्य ही एक महत्वाची व्यक्ती आहे. पण चाणक्य वैदिक नव्हता हे निश्चितपणे सांगता येते. कारण वैदिक परंपरेतील ग्रंथात चाणक्याच्या केवळ राजकीय जीवनाची माहिती आहे, तेथे चाणक्याचे आई-वडील, त्याचा जन्म, लहानपण, शिक्षण, लग्न आणि शेवटी मरण या बाबींची कांहीच माहिती नाही.
वैदिक चाणक्याचा मूळ आधार तिलोयपन्नती हा जैन ग्रंथ व महानामथेरो हा बौद्ध ग्रंथ आहे. तेथे मुख्य नायक चंद्रगुप्त हा आहे. चाणक्याला तेथे फारसे महत्व नाही. पण पुढे वैदिकांनी चंद्रगुप्तापेक्षा चाणक्याला अवास्तव महत्व दिले.
अवैदिक मग ब्राम्हण
मग/मागी ब्राह्मण हे मुळचे प्राचीन ईरान मधील मदन आर्यांच्या सहा जाती पैकी असतात.
प्राचीन भारतात बिहारमध्ये मग नावाचे ब्राम्हण होते. चाणक्य हाही मग ब्राम्हण होता. हे मग ब्राम्हण अवैदिक ब्राम्हण होते. त्यांना व्रात्य ब्राम्हण असेही म्हणत. या मग ब्राम्हणांचा त्या भागात इतका प्रभाव होता की त्या भागाला मगध या नावाने ओळखले जावू लागले. (बिहार हे नाव अलीकडचे आहे.) चंद्रगुप्ताचे धर्मगुरू आचार्य भद्रबाहू, पुढील काळात झालेले चरक, आर्यभट्ट, वराहमिहिर, बाणभट्ट, वाग्भट्ट हेही मग ब्राम्हण होते.
चाणक्याचे पुढील काळात वैदिकीकरण झाले असे दिसते, तेही चाणक्याच्या काळानंतर शेकडो वर्षांनी. चंद्रगुप्ताच्या गुरुपदी कोणीतरी वैदिक ब्राम्हण दाखवण्याच्या वर्चस्ववादी हव्यासातून त्या अवैदिक ब्राम्हणाला वैदिक करून टाकण्यात आले. केवळ चाणक्यच नव्हे तर जैन, बौद्ध, शैव आदी परंपरांतील अनेक व्यक्तीना पुढे वैदिकांनी 'वैदिक ब्राम्हण' करून टाकले आहे. वैदिकमहात्म्य वाढवण्याचा हा एक प्रकार.

Comments

Popular posts from this blog

धनगर समाजातील आडनावे-

List of Hatkar clans

About 108 clans(108 कुळ/कुल) of Dhangars and 22 sub castes (22 पोट जाती).