मराठा-ब्राम्हण संघर्षाचे मूळ कशात?
अनेकांना मराठा व ब्राम्हण या दोन समाजात एवढा पराकोटीचा संघर्ष का अस प्रश्न पडला असेल. त्याचे उत्तर असे आहे की हा संघर्ष नवीन नाही व त्याला हजारो वर्षांची परंपरा आहे. तसेच हा संघर्ष केवळ मराठा-ब्राम्हण असा नसून जाट विरुद्ध ब्राम्हण, बहुजन विरुद्ध ब्राम्हण, जैन विरुद्ध ब्राम्हण, बौद्ध विरुद्ध ब्राम्हण, शीख विरुद्ध ब्राम्हण असा अनेक पदरी आहे. यातील महत्वाची गोष्ट अशी की येथे सगळीकडे समान शत्रू ब्राम्हण हाच आहे. असे का याचे ब्राम्हणांनी आत्म परीक्षण करायला पाहिजे!
या संघर्षाचे मूळ ब्राम्हणांनी आपल्या धार्मिक सत्तेच्या बळावर आपले वर्चस्व राज्यकर्त्या जमातींसह सगळ्यांवर लादण्याचे जे खटाटोप केले त्याच्यात आहे. प्राचीन काळी समणांनी (जैन व बौद्धांनी) ब्राम्हणांशी यशस्वी लढा देवून त्यांची धार्मिक सत्ता संपवली. (समण या मागधी शब्दाचा संबंध समतेशी आहे. पण ब्राम्हणांनी समण या शब्दाचे रुपांतर श्रमण या संस्कृत शब्दात करून त्याचा मूळ अर्थ नाहीसा केला).
पतंजलीने आपल्या योग सूत्रात श्रमण आणि ब्राम्हण यांचे वैर साप आणि मुंगसाप्रमाणे शाश्वत (कधी न संपणारे) असते असे म्हंटले आहे. येथे हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे की त्यावेळचे हे समण आजच्या मराठ्यांचे, जाटांचे, राजपुतांचे पूर्वज होते.
जाटांनी ब्राम्हणांचे वर्चस्व कधीच मान्य केले नाही. एकतर जाट स्वत:ला हिंदू मानत नाहीत, व त्या समाजातील बहुतांश लोक शीख, जैन आणि इस्लाम या धर्मांच्या प्रभावाखाली आहेत. त्यामुळे जाटबहुल प्रदेशांमध्ये (पंजाब, हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेश, उत्तर राजस्थान वगैरे) ब्राम्हणांचा वर्चस्ववाद अजिबात चालत नाही. पण इतिहासातील ब्राम्हणी कारस्थानांची जाट समाजाला आठवण असल्याने की ते लोक ब्राम्हणांना शिव्या घातल्याशिवाय जेवतही नाहीत!
पण दुसरीकडे राजपूत आणि मराठा लोकांचा ब्राम्हणांशी संघर्ष असला तरी ते आजही स्वत:ला हिंदू समजतात व धार्मिक बाबतीत पूर्णपणे ब्राम्हणांच्यावर अवलंबून आहेत.
ब्राम्हणांचा वर्चस्ववाद मोडून काढायचा असेल तर मराठ्यांनी सर्वात अगोदर तथाकथित हिंदू धर्म सोडून द्यायला पाहिजे. कारण ब्राम्हणांची दादागिरी हिंदू धर्माच्या आधारे चालते. न रहेगा बांस तो न रहेगी बांसरी. जाटांनी हे करून दाखवले आहे.
मराठ्यांनी शिवधर्म स्वीकरणे यासाठीच महत्वाचे आहे.
हिंदू धर्माच्या आधारे ब्राम्हणांची चालणारी रोजी रोटी बंद पडली, की तेही देव आणि देवळे यापासून मुक्त होतील.
https://www.facebook.com/vinaykumar.madane/posts/679942508804834
Comments
Post a Comment