धनगर समाजाची सभ्यता हि मानवतेवर आधारित सभ्यता आहे.

धनगर समाजाची सभ्यता हि मानवतेवर आधारित सभ्यता आहे.वैभवशाली, गौरवशाली इतिहासाचा वारसा लाभणा-या या समाजाला आज वर्तमानात फारच अवकळा आली असुन हा समाज आपल्याच पराक्रमी इतिहासाशी अपरीचित झाला आहे.
होळकर शाहीमध्ये संपर्ण भारतभर गौरव प्राप्त करणारा हा समाज आज (ST) आरक्षण अंमलबजावणीसाठी वणवण फिरतो आहे.एकेकाळी राज्यात रयतेला पदे देणारा हा समाज आज हतबल झालेला आहे.का हि परीस्थिती या सभ्य समाजावर ओढवलेली असेल ? कारण हा वर्तमानकालीन धनगर समाज आपलाच इतिहास विसरला .
मित्रांनो जोपर्यंत आम्ही होळकर शाहीचा इतिहास समजून घेवून वर्तमानात प्रवास करत नाही तोपर्यंत (ST) आरक्षण हा फक्त आमचा भ्रम आहे. कारण इतिहास ने आमच्या मनात क्रान्तीच्या ज्वाला तयार होतात आणि या ज्वालांच्या आगीत आमच्या समोर या भट-भिक्षुकाची, प्रस्थापित राज्यकर्त्याची गुलामी टिकूच शकणार नाही.
आज पर्यंत या समाजाला पदोपदी अवमानीतच करण्यात आले. पण लक्षात असु द्या. अपमानाचा एक सिद्धांत आहे. ज्यांना स्वाभीमान कळतो त्यांनाच अपमान समजतो.आणि आज जर आम्हाला आमच्या समाजाचा आम्हाला अपमान समजला नाही तर आम्ही स्वाभीमानाची लढाई लढुच शकणार नाही.
मित्रांनो आपल्या महापुरूषांना आपण देव करणे आता थांबवावे.कारण एकदा कोणत्याही महामानवाला दैवी पुरूष केले की त्या महामानवाचे सदविचार संपत असतात आणी मग वैचारिक अनुयायी नष्ट होवुन तिथे अंध भक्त निर्माण होतात. हा आजवरचा इतिहास आहे. आपल्या सर्व होळकरी राष्ट्रपुरूषाना आपण देवाच्या पंगतीत बसवु नये.
धनगर युवकांनी फिल्म मधल्या काल्पनिक नायकापेक्शा राजे यशवंतराव होळकर यांचे जिवन चरीत्र अभ्यासावे म्हणजे आमच्या आतला सुद्धा खरा बाहुबली,आर्यन मॅन जागृत होईल.
जय मल्हार
जय यशवंत
श्रीकांत एस.बरींगे
अकोला
मो.9766594325
shrikantbaringe@gmail.com
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

https://www.facebook.com/vinaykumar.madane/posts/696447923820959

Comments

Popular posts from this blog

धनगर समाजातील आडनावे-

List of Hatkar clans

About 108 clans(108 कुळ/कुल) of Dhangars and 22 sub castes (22 पोट जाती).