कसे झाले वैदिक सन्यासी
यासंदर्भात आश्रमव्यवस्थेचाही विचार केला पाहिजे. वैदिक धर्मात मुळात, व्यक्तीनं अखेरपर्यंत यज्ञयागादी कर्म करत राहिलं पाहिजे, असा आग्रह होता. श्रमणपरंपरेला हा आग्रह मुळीच मान्य नव्हता आणि पूर्वीच स्पष्ट केल्याप्रमाणे श्रमणपरंपरेतले लोक(जैन, बौद्ध, आजीवक) या वैदिक परंपरेतल्या लोकांचे भाऊबंदच होते. ते दुसऱ्या समाजातले असते, तर त्यांना पूर्णपणे विरोध करणं किंवा त्यांच्याकडं पूर्ण दुर्लक्ष करणं शक्यो झालं असतं. इथं तसं करता येणार नव्हतं. कारण वैदिकांपैकी काही लोकांना श्रमणपरंपरेचं आकर्षण वाटून ते तिचा स्वीकार करणं अगदीच शक्यस होतं आणि ते यांना परवडलं नसतं म्हणून त्यांनी आपल्या परंपरेप्रमाणे, एखाद्यानं दोनतृतीयांश भाग व्यतीत केल्यानंतर उर्वरित भाग श्रमणांप्रमाणे संन्यस्त जीवन जगू शकेल अशी मुभा किंवा सवलत त्यांनी दिली. त्यातूनच वैदिक धर्मात आश्रमव्यवस्था विकसित झाली.
मात्र, श्रमणांची काही तत्त्वं आपल्या धर्मात सामावून घेताना वैदिकांनी वर्णविचार सोडला नव्हता.
अशा प्रकारे कर्म सोडून संन्यास घेण्याचा अधिकार चौथ्या शूद्र वर्णाला नाकारून आत्मचिंतनासाठी आवश्ययक असलेल्या या अवस्थेपासून दूर ठेवण्यात आले. क्षत्रीय आणि वैश्यक यांनाही असं काही करण्यापासून निरुत्साहित करण्यात येऊ लागलं! स्त्रियांना असा अधिकार मिळणं दुरापास्तच होतं.
https://web.facebook.com/photo.php?fbid=695449123920839&set=a.267277083404714.64323.100003672720193&type=1&theater
https://web.facebook.com/photo.php?fbid=695449123920839&set=a.267277083404714.64323.100003672720193&type=1&theater
Comments
Post a Comment