घोंगडीला राजवस्त्रचा दर्जा द्या

घोंगडीला राजवस्त्रचा दर्जा द्या
लोकर ही सर्व हिंदू मध्ये पवित्र मानली जाते .ती विधी पुर्वक शुद्ध समजतात.ब्राम्हण धार्मिक कार्य करताना लोकरीचे वस्त्र घालुन धार्मिक कार्य करतात.किंवा भोजनाच्या वेळी बसण्यासाठी घोंगड्यावर बसतात .अनेक जाती मध्ये लग्नाच्या वेळी नवरदेवाच्या मनगटात लोकरीचे कंगण बांधतात.संन्याशी किंवा गोसावी हे लोकरीच्या जटा किंवा टोप घालता�त.मंत्राच्या जप करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या रूद्राक्श् माळा देखील लोकरीच्या असतात .पुर्वीच्या काळी लोकरीचे कपडे वापरत असे,म्हणुन लोकर आणि लोकरीच्या घोंगडीला पुरातन काळा पासून विशेष महत्व आहे .त्याला राजवस्त्र किंवा देववस्त्र असे म्हणतात .घोंगडी हे पवित्र वस्त्र आहे .आणि त्याचा मान फक्त आणि फक्त धनगरानाच जातो हे कुणीही नाकारू शकत नाही क्रूगवेदात १०/२६ यात उल्लेख आढळतो की, ऋषीमणी मेंढ्यापाळीत घोंगडी व वस्त्र विणीत तो उल्लेख ऋग्वेदात असा आहे
प्रत्यधिंयद्ण्यानामश्वहयोरथानाम ।
ऋषी :स योमनुहिंतो विप्रस्य यावत्सख: ॥
आधीषमाणाया: पति:शुचायाश्च शुचस्यच ॥
वासोवायो वीनां वासांसिमम्रजत ॥
म्हणजे गाभण मेंढ्याच्या लोकरीसाठी(मादी)मेंढी आणि (नर)मेंढ्यांचे ते पालक आहेत .मेंढ्याच्या लोकरी पासुन वस्त्र विणणारे अर्थात (धनगर) आहेत विणलेले वस्त्रे ते शुद्ध करितात.
असा अर्थ होय.
घोंगडी विणण्याची कला
-------------------
ईतकी प्राचीन आहे की तीचा उगम कधी झाला हे सांगणे कठिण आहे .प्राचीन काळातील पहिला माग बहुदा झाडाच्या फांदीवर बांधलेला लाकडाचा ओंडका असावा व आदिमानवाने याच मागावर एखाद्या सुई च्या मदतीने आपले वस्त्र विणण्यास सुरवात केली असावी

Comments

Popular posts from this blog

धनगर समाजातील आडनावे-

About 108 clans(108 कुळ/कुल) of Dhangars and 22 sub castes (22 पोट जाती).

List of Hatkar clans