राजा कसा असावा‘ यासाठी जगभर ज्यांचे उदाहरण देण्यात येते ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज

"राजा कसा असावा‘ यासाठी जगभर ज्यांचे उदाहरण देण्यात येते ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. शत्रूंचाही यथोचित सन्मान ठेवणारे "रयतेचे राजे‘ हे नियोजन, व्यवस्थापन, अर्थकारण, संरक्षण सज्जता, युद्धकला आदी सर्व क्षेत्रांमध्ये निपुण होते. शेकडो वर्षे पुढे असणारी दृष्टी त्यांच्याकडे होती. ते शौर्याचे मूर्तिमंत प्रतीक तर होतेच, शिवाय श्रम, साधना, चातुर्य, कलाप्रेम आदी साऱ्या कलागुणांचा संगम त्यांच्या ठायी होता. म्हणून ते "जाणते राजे‘ही होते.
छत्रपती शिवाजी महाराज खऱ्या अर्थाने कर्मयोगी होते. शत्रूवर जबर धाक बसविणारा आणि सर्वसामान्य जनतेची काळजी घेणारा असा राजा विरळाच. त्यांनी दाखवलेल्या मार्गावर एक पाऊल जरी टाकण्याचा आपण संकल्प केला, तर खऱ्या अर्थाने आपण शिवजयंती साजरी केल्यासारखे होईल. तर मग करा संकल्प महाराजांचा एक तरी विचार अंगी बाणवण्याचा...
तुम्ही किशोरवयीन, वृद्ध किंवा विद्यार्थी, व्यावसायिक, नोकरदार, उद्योगपती, सैनिक, पोलिस कोणीही असा, प्रत्येकाने घ्यावा असा विचार आणि आचार महाराजांच्या जीवनचरित्रामध्ये आहे.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

धनगर समाजातील आडनावे-

About 108 clans(108 कुळ/कुल) of Dhangars and 22 sub castes (22 पोट जाती).

List of Hatkar clans