सादवाहनांचे सांगत असतांना जेजुरीच्या खंडेरायाबद्दल लिहिणे अत्त्यवश्यक आहे



सादवाहनांचे सांगत असतांना जेजुरीच्या खंडेरायाबद्दल लिहिणे अत्त्यवश्यक आहे. खंडोबा हे लोकदैवत असुन नंतर त्याचे मर्तंड-भैरव वा शिवाशी नाते जुळवले गेले असे सोंथायमर ते डा. रा, चिं. ढेरे सांगतात. पण हे वास्तव नाही. धनगर (औंड्र/पुंड्र/अहिर .) हे सारेच मुलचे शिवपुजक आहेत. सादवाहन घराण्यात स्कंद (हे संस्क्रुतीकरण आहे...मुळ नाव खंड...त्याच्या काही नाण्यांवर फक्त खद असेही लिहिलेले आहे...कदाचित अनुस्वार कालौघात अस्पष्ट झाला असेल.) हा सम्राट .. १५६ मद्धे होवुन गेला. त्याच्या अलौकिक राक्रमामुळे हाच राजा जेजुरीचा खंडेराय म्हणुन पुज्य बनला असावा एवढे पुरावे आता समोर येत आहेत. आजही धनगरांना खंडेराय हा किती पुज्य आहे हे वेगळे सांगायची गरज नाही. खरे तर ते त्याच्या रुपात आपल्या अलौकिक सामर्थ्याच्या पुर्वजाचीच पुजा करत आहेत. म्हणजेच श्री विट्ठल आणि खंडेराय, जी आजच्याही महाराष्ट्राची आराध्ये आहेत ती मुळच्या धनगर समाजातील महापुरुषांची दैवतीकरणे आहेत हे उघड आहे.

Comments

Popular posts from this blog

धनगर समाजातील आडनावे-

About 108 clans(108 कुळ/कुल) of Dhangars and 22 sub castes (22 पोट जाती).

List of Hatkar clans