मराठा कोण आहेत- संजय सोनवणी


मराठा आणि कुणबी एकच आहेत काय, मराठा समाजाला आरक्षण असावे कि नको, मराठे नागवंशीय आहेत काय इ. काही सामाजिक प्रश्न सध्या चर्चेत आहेत. या प्रश्नांना लगेच न भीडता मुळात "मराठा" या संज्ञेबद्दल चर्चा करणे हा या लेखाचा हेतु आहे. तसेच या चर्चेला अनेक पैलु आहेत. प्रथम आपण "मराठा" या शब्दाचे मूळ पाहुयात.
१. रामायण-महाभारतात ते "अश्मक", "कुंतल", दंडक", :गोपराष्ट्र, पांडुराष्ट्र, मल्लराष्ट्र अशा स्वरुपात महाराष्ट्राचे उल्लेख मिळतात. अशोकाच्या शिलालेखांपर्यंत व महावंसपर्यंत महारट्ठी हा शब्द तेत्पुर्वी दिसत नाही. मराठा एक जात असा उल्लेख पुराणामद्धेही अथवा कोणत्याही (अगदी बाराव्या शतकातील सुद्धा) स्मृतीमद्धे मिळत नाही.
२. महारट्ठी हा शब्दप्रयोग आपल्याला सातवाहन काळापासुन वापरला गेलेला दिसतो. अनेक इतिहासतज्ञ "महारठ्ठी" या शब्दाचा अर्थ "रथ चालक" ते रथी (रट्ठी) आणि या रथींचा स्वामी तो महारट्ठी असा लावतात. पण ते अयोग्य आहे. रट्ठी आणि रथी हे रुप केवळ शाब्दिक साम्य दाखवतात म्हणुन ते एक अर्थी आहेत असे मानता येत नाही. ...अर्थ वेगळे आहेत. रट्ठ म्हणजे प्रदेश असा खरा अर्थ आहे. महाराष्ट्र हा शब्द अनेक रट्ठांचा समुह आहे.
३. महारट्ठी हे सातवाहनकाळात एक पद होते. प्रत्येक रट्ठाचा (आजचा कलेक्टर) करसंकलन ते रक्षणात्मक कार्य करणारे राजनियुक्त प्रतिनिधी होते त्यांना महारट्ठी म्हटले जात होते. हे पद वंशपरांगत नव्हते तसेच सातवाहन काळापर्यंत त्यांच्या इतर रट्ठांत बदल्याही होत असत. स्वत: सातवाहनांनी कनकवीर या महारठीच्या मुलीशी विवाह केल्याचे दाखले आहेत.
४. महारट्ठी हे विशिष्ट जातीतुन निवडले जात असल्याचा एकही पुरावा उपलब्ध नाही. नाग, कदंब, पौन्ड्र, औन्ड्र, (पुंडे, उंडे ही आडनावे या द्रुष्टीने तपसता येतील.) यदु, अहिर, गुजर अशा अनेक तत्कालीन विभिन्न समाजसमुहांतुन त्यांची निवड झाल्याचे दिसते.
५. इ.स. च्या २३० मद्धे सातवाहनांची सत्ता कमजोर झाल्यानंतर हे महारट्ठी स्वतंत्र सरंजामदार बनले व काहींनी स्वतंत्र सत्ताही स्थापन केल्या. यात बादामीचे चालुक्य, राष्ट्र्कुट व यादव ही घराणी मोठी साम्राज्ये उभी राहीली. याच काळात महारठ्ठी हे पद वंशपरंपरागत झाले असावे कारण त्यांनी प्राप्त केलेले सामर्थ्य व राजसत्तांची अपरिहार्य गरज.
६. राष्ट्रकुट हे घराणे मुळचे "रट्ठीकुत" असावे...राष्ट्रकुट हे कृत्रीम संस्कृतीकरण आहे हे उघड आहे.
७. राजकीय सत्ता अशा रितीने महारट्ठ्यांचा हाती गेल्याने (मग ती सरंजामदार/जहागिरदार म्हणुन का असेना) या संपुर्ण प्रदेशाला महारट्ठी असेच नाव पडले व त्याचे संस्कृतीकरण म्हणजे महाराष्ट्र. महारठ्ठी हे जसे पदनाम होते, तसेच अनेक रठ्ठांचा समूह म्हणून महारठ्ठ हे प्रदेशनाम बनल्याचे दिसते.
८. थोडक्यात इ.स.पु. ३०० मद्धेच महारट्ठी शब्द सर्वत्र प्रचलित झाला होता असे महावंस वरुनही दिसते.
९. मराठे राजपुत वंशाचे आहेत असे मानण्याचा एक प्रघात आहे. अनेक मराठा घराण्यांनी आपली वंशवेल प्रसिद्ध राजपुत घराण्याशी जुळवलेली दिसते.
१०. पण राजपुत हे मुळचे भारतीय नाहीत असे आता डा. आर. जी, भांडारकर, टोड इ. अनेक संशोधकांनी सिद्ध करुन दाखवले आहे. बव्हंशी राजपूत हे मुळचे सिथियन वंशाचे असुन ते सनपुर्व पहिल्या शतकापासुन भारतात यायला सुरुवात झाली. त्यांनी सत्ता स्थापन केल्या आणि कालौघात येथील धर्मही स्वीकारला.
११. महारट्ठी शब्द तत्पुर्वीच प्रचलीत होता हे मी स्पष्ट केले आहेच...म्हणजे राजपुतांपासुन मराठा जात बनली असे म्हणने चुकिचे व अनैतिहासिक ठरेल.
१२. तरुण संशोधिका क्रांती चमार यांचे मत आहे कि भोसले हे मुळचे सिसोदिया राजपुत आहेत व त्यासाठी त्यांनी राणा लक्ष्मणसिंहपासुन (सन १३०३ पासून) एक वंशावळ दिली आहे जी मालोजीराजे व विठोजी राजे यांच्यापर्यंत भिडते.
१३. डा. रा. चिं. ढेरे राजपुत मुळाशी सहमत नाहीत. (पहा शिखर शिंगनापुरचा शंभु महादेव.)
१४. त्यामुळे केवळ मराठ्यांत यादव, जाधव, परमार, गुजर, अहिर, साळुंखे इ. आडनावे आहेत आणि त्यातील काही राजपुत घराण्यांशी जुळतात म्हणुन मराठे हे राजपुत कुलीन ठरवता येत नाही...कारण सिथियनांचे पुर्ण हिंदुत्वीकरण होण्याच्याही खुप आधी मराठा ही एक जात/शक्ती म्हणुन उदयाला आली होती हे वरील घटनाक्रमावरुन स्पष्ट दिसते.
१५.अहिर, गुजर, औन्ड्र, पौन्ड्र, यादव, नाग अशा अनेक मानवी गटांचा वावर महाराष्ट्रात पुरातन काळापासुन (ऐतरेय ब्राह्मणात व महाभारतात औन्ड्र/पौन्ड्र/अहिरांचे स्पष्ट उल्लेख आहेत. या जमाती शुद्र (अवैदिक) होत्या असेही सा स्पष्ट निर्देश आहे.)
१६.होयसळ, (या कानडी रुपाचे "होयसळे" मराठी रुप भोसले झाले असु शकते असे अनुमान आहे.) डा रा, चिं ढेरे यांनी होयसळ घराण्याचा महाराष्ट्रात आलेल्या बलियप्पाला भोसले घराण्याचा संस्थापक मानले आहे. शिखर शिंगनापुरचे मंदिर त्यानेच स्थापन केले अशा अर्थाचा शिलालेखही आहे.
१७. थोडक्यात मराठा समाज हा विविध वंशांच्या मिश्रणातुन निर्माण झालेला समाज आहे. महारट्ठी हे पद पुढे जात बनला व त्यातुनच मुळच्या ९६ कुळ्या (ज्या मुळच्या सत्ताधारी होत्या) निर्माण झाल्या. अथवा महाराष्ट्र हा प्राचीन काळ्दी ९६ रठ्ठांत विभागला गेल्याने या कुळ्या निर्माण झाल्या. सत्तेत असल्याने इतर सत्ताधार्यांशी विवाहसंबंध जोडने स्वभाविक होते...त्यातुनच ही जात विकसीत होत गेली. अन्य वंशीयही अनेक जातींत पुढे विभक्त होत गेले. मराठ्यांची अनेक आडनावे ओ, बी.सी ते अन्य अति-वंचितांतही दिसतात ती यामुळेच, कारण वांशिक अर्थाने सर्वांचे मुळ त्या-त्या वंशाशी निगडीत आणि एकच होते.
१८. .खंडोबा, विट्ठल, रेणूका ही मुळची वैदिकांच्या दृष्टीने शूद्र स्वरुप असणारी दैवते सर्वच मराठे ते अन्यजातीयांची कुलदैवते आहेत तसेच पुरातन शैव अशी शिव, जगदम्बा हीसुद्धा कुलदैवते आहेत. राजपुत हेही शैव बनल्याने त्यांचे कुलदैवतही एकलिंगजी वा भवानी बनणे स्वाभाविक आहे. त्या आधारावर मराठ्यांना सर्वस्वी राजपुत ठरवता येत नाही. महाराष्ट्रावर काही सिथियन राजांनीही राज्य केलेले आहे, त्यामुळे काही महारठ्ठी सिथियन कुळाचे असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
१९. पुरणकारांनी महाराष्ट्रातील सर्वच समुदायांना शूद्र मानले असल्याने, ते कधीही वर्णाश्रम धर्मानुसार क्षत्रिय असु शकत नव्हते. शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकासाठी "क्षत्रिय" असल्याचे सिद्ध केले ते राजपुतांशी वंशावळ जोडुन, परंतु गागाभट्टाने प्रथम ती वंशावळ अमान्यच केली होती. नंतरही महाराजांना शुद्रच म्हटले वा समजले जात होते हे आपण महात्मा फुले यांनी रायगडावरील महाराजांची समाधी स्वच्छ करुन फुले वाहीली तेंव्हाीका ब्राह्मणाने ती फुले लाथाडुन "एका शुद्राला फुले वाहतोस..." असा कांगावा केल्याप्रकरणी पाहु शकतो. शाहु महाराजांचा वेदोक्त प्रकरणातही वैदिक धर्मियांनी त्यांना (म्हणजे पर्यायाने मराठ्यांना) क्षत्रिय मानलेच नव्हते, त्यांना अवैदिक म्हणजेच शूद्रच समजत होते हे स्पष्ट आहे.
थोडक्यात मराठा ही पुर्वी जात नव्हती. महारट्ठी पद हे कोणत्याही समाजगटातील योग्य माणसाला मिळत होते...पुढे हे पद वंशपरांगत बनल्याने तीचे जातीत रुपांतर झाले, कालौघात त्यांची संख्या वाढत गेली. म्हनजे आजचे मराठे तसे मि्श्रवंशीयच आहेत. सत्तेत असल्याने ते स्वता:ला उच्च जातीय/क्षत्रिय (म्हणजेच वैदिक) समजू लागले...पण तसे ते वास्तव नाही, कारण वैदिकांनी त्यांना कधीही आपल्या धर्मातील क्षत्रियत्व बहाल केलेले नाही.
त्यामुळे आज मराठा समाज (धनगर ते अनेक ओबीसीसुद्धा) दुर्दैवाने भ्रमित होत वैदिक अर्थाने उच्च वर्णीय स्वत:ला मानत असतील तर तो त्यांचा केवळ भ्रम आहे. त्याला कसलीही वैदिक मान्यता मुळातच नाही. वैदिक उच्च-नीचतेच्या तत्वज्ञानाच्या वृथा गारुडातून मूक्त होणे सर्वांनाच आवश्यक आहे.

https://www.facebook.com/vinaykumar.madane/posts/671360392996379

Comments

Popular posts from this blog

धनगर समाजातील आडनावे-

About 108 clans(108 कुळ/कुल) of Dhangars and 22 sub castes (22 पोट जाती).

List of Hatkar clans