भारताचे राष्ट्रीय संवत्सर(शक संवत्सर) सुरु करणारे शककर्ते "महाक्षत्रप चष्टन" आणि त्यांचे वंशज

भारताचे राष्ट्रीय संवत्सर(शक संवत्सर) सुरु करणारे शककर्ते "महाक्षत्रप चष्टन" आणि त्यांचे वंशज
सातवाहन सम्राट गौतमीपुत्र सातकर्णी(शालिवाहन) ने नाशिक येथील नाणेघाट येथे क्षहारात(प्राकृत:खरात) वंशी शक क्षत्रप नहपान यांचा पराभव केल्यावरती खरात लोक साताऱ्याच्या म्हसवड भागात आले.त्यानंतर "कार्दमक" या शक वंशाने उज्जैन येथे शक साम्राज्याची पुनर्स्थापना केली. आजच्या दिवशी इसवी. ७८ साली शक क्षत्रप चष्टन यांनी राज्याभिषेक करून राजा हि उपाधी धारण केली. शक क्षत्रप चष्टन यांचा पुत्र महाक्षत्रप रुद्रदामन अतिशय विद्वान ,प्रजापालक,संस्कृत भाषेवरती प्रभुत्त्व असणारे शासक होते. त्यांनी गुजरात येथील जुनागढ येथे संस्कृत भाषेतील भारतातील सर्वात प्रथम शिलालेख लिहिला.
त्यावेळेस ब्राह्मी हि लिपी सामान्य लोकांना समजण्यासाठी अतिशय क्लीष्ट होती. रुद्रदामन यांनी लिपीच्या विकासावरती सुद्धा फार भर दिला. त्यांच्या जुनागढ येथील संस्कृत शिलालेखात सर्वात प्रथम आजच्या देवनागरीचे पुरावे मिळतात. रुद्रदामन नंतर त्यांचे पुत्र महाक्षत्रप रुद्रासिम्ह गादीवरती बसले.
जुनागढ येथील शिलालेखात रुद्रदामन यांनी शालिवाहनचा पुत्र आणि सातवाहन सम्राट वशिष्ठपुत्र सातकर्णी याच्या राज्याला भ्रष्ट राज्य असे संबोधिले आहे. त्यांनी वशिष्ठपुत्र सातकर्णी याचा संपूर्ण पराभव करून दक्षिणेकडे सातारा ते उत्तरेला सिंधपर्यन्त आपल्या साम्राज्याचा विस्तार केला. एव्हडेचं नव्हे तर वशिष्ठपुत्र सातकर्णी ला सन्मानाने साताऱ्याकडील भाग देऊन त्याला आपला जावई करून घेतले.जनतेच्या हिताची बरीच कामे केली.त्यामुळे महाक्षत्रप रुद्रदामन जनतेत फार लोकप्रिय झाले होते. गुजरातमधील गिरणार येथे चंद्रगुप्त मौर्याने बांधलेल्या सुदर्शन तलावाची दुरुस्ती केली. उजैन ला शैक्षणिक केंद्र बनविले.
सातवाहन सम्राट गौतमीपुत्र सातकर्णी(शालिवाहन) ने नाशिक येथील नाणेघाट येथे क्षहारात(प्राकृत:खरात) वंशी शक क्षत्रप नहपान यांचा पराभव केल्यावरती खरात लोक साताऱ्याच्या म्हसवड भागात आले.पुढे साताऱ्याच्या माण भागात त्यांनी सत्तेची स्थपना केली.हा माण भाग हा कुंतल देशाची राजधानी होती. मानांक हा येथील प्रथम राजा होता. दुसऱ्या शतकातील गुप्त सम्राट चंद्रगुप्त द्वितीय(विक्रमादित्य) याचा राजकवी राजशेखर यांच्या साहित्यात मानकांचा पुत्र देवराज याचे नाव होते.
शक पुरुष पूर्ण पोशाख तर महिला पूर्ण अंग साडीने झाकत होत्या. त्यावेळेस भारतातील पुरुष आणि महिला अर्धनग्न पोशाखात असायचे. त्यावेळेस महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशात "औंड्र"(वडार) आणि पंढरपूरचे "पौंड्र" या पशुपालक जमातींचे वर्चस्व होते.


Comments

Popular posts from this blog

धनगर समाजातील आडनावे-

About 108 clans(108 कुळ/कुल) of Dhangars and 22 sub castes (22 पोट जाती).

List of Hatkar clans