शिंदे-होळकर शाही आणि वर्तमान स्थिती

शिंदे-होळकर शाही आणि वर्तमान स्थिती
♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️
सध्या राजकारणात भूकंप ठरावी अशी घटना देशात घडली. राहुल गांधींचे जिवलग मित्र, काँग्रेसच्या यंग ब्रिगेडचे शिलेदार, पंधराव्या लोकसभेत कॅबिनेट केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री यांनी काँग्रेस पक्ष सोडला आणि 22 आमदारा सहित भाजप मध्ये प्रवेश केला. या घटनेला mp चे मुख्यमंत्री कमलनाथ आणि शिंदे यांच्यातील बेबनाव सकृत दर्शनी कारण असलं तरी, सत्ता हेच मुख्य कारण आहे. सत्तेचा लोभ हे मुख्य कारण आहे.
ज्योतिरादित्य शिंदेच्या आजी, विजयाराजे शिंदे या भाजपच्या खूप मोठ्या नेत्या होत्या. त्या सुरवातीला काँग्रेसमधेच होत्या परंतु नंतर जनसंघात गेल्या. त्या भाजपा पक्षाच्या संस्थापक सदस्य होत्या. त्या राज्यसभा सदस्यही होत्या. त्यांच्या कन्या म्हणजे ज्योतिरादित्य यांच्या आत्याबाई वसुंदराराजे शिंदे या राजस्थानच्या मुख्यमंत्री होत्या. वसुंधरा राजे यांच्या भगिनी यशोधराराजे शिंदे या सुद्धा खासदार होत्या. ज्योतिरादित्य शिंदेंचे वडील माधवराव शिंदे हे राजीव गांधींचे जिवलग मित्र होते. माधवराव शिंदे हे सुध्दा राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री होते. सर्व कुटुंब राजकारणात आहे आणि मोठं मोठया पदावर विराजमान आहेत.
कोण आहे हे कुटुंब?
थोरले सुभेदार मल्हारराव होळकर आणि बाजीराव पेशवे यांची जबरदस्त दोस्ती होती. बाजीराव पेशव्यांनी उत्तरे कडची सर्व जबाबदारी सुभेदारावर सोपवली होती. धारचे उदाजी पवार आणि बाजीराव यांच्यात वितुष्ट होते. त्यात मल्हारबानी मध्यस्ती करून पवारांना पेशव्यांच्या चाकरीत सामील करून घेतलं. त्यांना एकूण महसुलतील 9.50% महसूल दिला.
दुसरे राणोजी शिंदे हे पेशव्यांच्या दरबारात हुजऱ्या होते. मल्हारबानी बाजीराव पेशाव्या कडून राणोजीला उत्तरे साठी मागून घेतला. राणोजीला मल्हारबानी वसुलीतील बरोबरीचा हिस्सा देऊन ग्वालियरची जहागिरी मिळवून दिली. नंतर मल्हारबा राणोजीना मराठा साम्राज्याची सरदारकी मिळवून दिली. उद्देश एकच उत्तर भारतात आपली फळी भक्कम करायची राणोजीही उपकाराची फेड म्हणून मरे पर्यंत होळकरांशी निष्ठा ठेवून होते. परंतु राणोजीच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलांनी तशी निष्ठा ठेवली नाही. त्यांनी होळकरांशीच स्पर्धा सुरू केली. तरीही मल्हारबानी त्यांना सांभाळून घेतले.
पानिपताच्या युद्धात शिंद्यांचे सर्व औरस पुत्र मारले गेले राणोजींचा एक दाशी पुत्र महादजी जिवंत राहिला. पेशव्यांनी शिंद्यांची जहागिरी खालसा केली. मल्हारबानी पुन्हा मध्यस्थी करून महादजीला सरदारकी मिळवून दिली. आणि शिंदेंची जहागिरी वाचवली. नुसती जहागिरी वाचवली नाही तर अहिल्यादेवींनी त्यांना पैसे देऊन नवीन सैन्य उभे करायला मदत केली. महादजी यांनी 16 बायका केल्या होत्या तरी त्यांना मुलबाळ झालं नाही मग त्यांनी, शिंदे घराण्यातीलच दौलतराव शिंदे याला दत्तक घेतला. त्यांचे हे वंशज आहेत.
ही ताकद होती होळकरांची. आज काय अवस्था आहे होळकरांची. केंद्रात मंत्री, राजस्थानमध्ये मुख्यमंत्री आता ज्योतिरादित्य mp च्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत. भाजपने त्यांना राज्य सभेची खासदारकी दिली. उद्या कदाचित केंद्रात मंत्री सुद्धा होतील.
शिंदेही साधे कुणबी घराण्यातील. तेही बाहेरून येऊन mp चे राजे झाले. तिथे कुठे त्यांची जात आहे? तरी त्यांच्या कर्तबगारीचा दबदबा एवढा की, 22 आमदार त्यात 6 मंत्री आहेत. या सर्वांनी ज्योतिरादित्य यांच्यासाठी सत्तेचा त्याग केला. मंत्रीपद आणि आमदारकी यांचा राजीनामा दिला.
ज्या होळकरांनी शिंदेंना एवढ्या उच्च पदावर नेऊन ठेवलं ते होळकर कुठे आहेत? इंदूर आणि महेश्वर महानगर पालिकेतील नगर सेवक पदाच्या शर्यतीत सुध्दा होळकर नाहीत. राग संताप येत नाही 😭😭 ढसा ढसा रडावंवस वाटत. ज्यांनी मराठा साम्राज्य उभं केलं त्या मल्हारराव होळकरांच्या रक्ताचा एक सुद्धा धनगर साधा खासदार निवडून येत नाही. ज्या यशवंतराव होळकरांनी आख्खा भारत जिंकला त्याच्या रक्तात एक मर्द असा नाही की, जो एक जिल्हा जिंकू शकेलं?
*प्रजा तर प्रजा राजाही तसाच.*
*शेवटी ना इलाजानी म्हणावं लागत धनगरातील राजा असो की रंक असो धनगर शेवटी धनगरच.*
जात कधी सुधरणार देव जाणे?😭😭
😭😭🙏😭😭 साभार बापू हटकरजी
🤴👳🏿‍♂️🤴👳🏿‍♂️🤴👳🏿‍♂️🤴👳🏿‍♂️🤴👳🏿‍♂️🤴
लेखकाला पडलेल्या प्रश्नाला माझे उत्तर:
धनगरांच्या जीवनात अनादी काळापासून असे अनेक चढ उतार आलेले आहेत,सत्ता येत राहते जात राहते.त्यामुळे एवढे नाराज व्हायचे काही कारण नाही.नागपूरकर भोसल्यांचा वंश सुद्धा सध्या शिल्लक राहिला नाही आहे.

Comments

Popular posts from this blog

धनगर समाजातील आडनावे-

About 108 clans(108 कुळ/कुल) of Dhangars and 22 sub castes (22 पोट जाती).

List of Hatkar clans