वाघ्या या कुत्र्याचे स्मारक
या विषयावर संजय सोनवणी साहेबानी एक माहितीपूर्ण लेख लिहला होता तो खाली देत आहे. इमानी, रक्षक मानल्या गेलेल्या एका कुत्र्याचे स्मारक हे एका संघर्षाचे कारण बनु शकेल असे कोणालाही वाटले नसते पण ते तसे झाले आहे खरे. संभाजी ब्रिगेडने ६ जुनपुर्वी शिवस्मारकासमोरील वाघ्या कुत्र्याचे स्मारक हटवले नाही तर ते आम्ही उद्द्वस्त करू असा इशारा दिला अणि एरवी राखणासाठी कुत्रे पाळण्याची सवय असलेल्या मराठी समाजाला वाघ्याच्याच स्मारकाच्या रक्षणासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवला जाण्याची घटना पहावी लागली. का तर ब्रिगेडी इतिहासकारांचे दावे! काय होते हे दावे? तर दावा १) शिवचरित्रात कोणत्याही कुत्र्याचे स्थान नाही, तसे लिखित पुरावे नाहीत. २) वाघ्या कुत्रा हा नाटककार राम गणेश गडकरींच्या कल्पनेतुन निर्माण झालेले पात्र असून त्यांनी राजसंन्यास या त्यांच्या अपुर्ण नाटकाच्या प्रस्तावनेत त्याचा प्रथम उल्लेख केला आहे. ही गडकरींची विक्रुती आहे. ३. शिवस्मारकासमोरील ज्या चौथ-यावर वाघ्याचा पुतळा बसवला गेला आहे तेथे सईबाई, पुतळाबाई वा सोयराबाईंची मुळ समाधी असली पाहिजे. त्यांचा अवमान करण्यासाठी ब्राह्मणांनी (म्हणजे श्री. न.चिं.केळकरादि) मुद्दाम तेथे कुत्र्याला आणले. ४. वाघ्या कुत्रा हा विलायती कुत्र्यासारखा दिसतो म्हणुन तो शिवकालीन असू शकत नाही. ५. वाघ्या या कुत्र्याचे स्मारक असलेच तर ते शिवरायांच्या स्मारकापेक्षा छोटे असायला हवे होते, पण प्रत्यक्षात ते शिवरायांच्या स्मारकापेक्षा उंच आहे, सबब हा जाणीवपुर्वक केला गेलेला शिवरायांचा अवमान आहे. हे सारे मुद्दे लक्षात घेता हे वाघ्याचे स्मारक हटवणे आवश्यक आहे, ते न हटवले गेल्यास संभाजी ब्रिगेड आपल्या
"पद्धतीने" ते उद्ध्वस्त करेल असा इशारा दिला गेला. त्यावरुन महाराष्ट्रात पुन्हा एक नवे वादळ उठले. येथे या वादळांत वा विवादांत न जाता, मी व माझे मित्र श्री. हरी नरके यांनी या संदर्भात सखोल संशोधन करून जे पुरावे मिळवले ते सर्वच ब्रिगेडी दाव्यांना धुडकावून लावणारे आहेत हे सिद्ध केले. शिवचरित्रात वाघ्या कुत्राचे स्थान नाही हा दावा निखालस खोटा असल्याचेही पुढे सामोरे आले. एवढेच नव्हे तर या स्मारकासाठी व शिवस्मारकासाठीसुद्धा मुळात सवाई तुकोजीमहाराज होळकर यांनी देणगी दिली असल्याने, हे स्मारक हटवणे हा होळकरांचा व पर्यायाने धनगर समाजाचा अवमान असल्याचे सत्य पुढे आल्याने धनगर समाजही अस्वस्थ झाला व श्री महादेव जानकर यांनी संभाजी ब्रिगेडला त्यांच्याच भाषेत इषारा दिला. शेवटी ब्रिगेडने आपले आंदोलन तात्पुरते स्थगित केले. कदाचित ब्रिगेडला मिळालेला हा पहिलाच घरचा आहेर असावा. पुरावे सांगतात कि, सईबाईंची समाधी ही राजगडावर आहे, म्हणजे ती रायगडावर असू शकत नाही. कारण त्यांचा म्रुत्यु सन १६५९ मद्ध्ये झाला होता. आजही त्यांचे स्मारक राजगडावर आहे. वाघ्याचे स्मारक जेथे आहे तेथे पुतळाबाईंची समाधी असू शकत नाही कारण सतीची समाधी बांधण्याचा मुळात प्रघात नाही. त्यांची सती-स्मारक शीला रायगडावर आजही अस्तित्वात आहे. सोयराबाईंचे ते स्मारक असल्याचा कसलाही पुरावा आस्तित्वात नाही. मुळात सोयराबाईंचा म्रुत्यु कसा आणि कधी झाला याबद्दल इतिहासात मतैक्य नाही.
Comments
Post a Comment