सुराष्ट्राचे सत्रप



या घराण्यांतील पहिला पुरुष चष्टन; यानेंच शककालाची स्थापना केली अशी समजूत आहे. पहिले दोन सत्रप चष्टन जयदाम यांच्या कारकीर्दीत आंध्रांच्या सार्वभौमत्वाविषयीं लढा सुरू होऊन तें सार्वभौमत्व पुन्हां प्रस्थापित झालें असावें. अगदीं पूर्वीच्या नाण्यांवरील पदव्या `महासत्रप `सत्रपया असून यांमधील भेदाची फोड पुढीलप्रमाणें करतां येईल-

नहपान आणि चष्टन त्यांच्यानंतरचे राजे यांची रुप्याचीं नाणीं ही पंजाबच्या ग्रीक राजांच्या अर्धद्रामापासून घेतलीं आहेत आणि त्यांच्या वजनाचें प्रमाणहि त्यांच्याचसारखें आहे (फारशी- हेमिद्राम= ४३२ ग्रेन किंवा २८ ग्रॅम). नाण्यांवर ग्रीक लिपीमध्यें लिहिलेली कांहीं तुटक तुटक अक्षरें दिसून येतात यावरून ही वरील गोष्ट सिद्ध होते. हीं अक्षरें पुढें केवळ शोभा म्हणून सत्रप नाण्यांच्या एका बाजूवर उठवीत असत.

चष्टनाच्या नाण्यांवर, नहपानाच्या नाण्याप्रमाणें नागरी खरोष्ठीमध्यें अक्षरें आहेत, नंतरच्या सर्व नाण्यांवर फक्त नागरी अक्षरेंच आहेत. यावेळचें नाणें बहुतेक रुप्याचें आहे. परंतु तांबे मिश्रधातु यांच्याहि नाण्यांचें मासले आहेत. राज्यावर असलेल्या सत्रपाचें त्याच्या बापाचें अशीं दोन्ही नावें त्यांच्या पदव्या या नाण्यांवर आहेत. या गोष्टी एका बाजूवर असलेल्या तारखा यांच्या साहाय्यानें या घराण्याची रूपरेषा बरीच बिनचूक रीतीनें काढतां येतें. पहिल्या दामाजदश्रीचा मुलगा सत्यदामन याच्या नाण्यांवर शुद्ध संस्कृतांतील अक्षरें आहेत. सत्रप नाण्यांवरील तारखा किंवा सन हे रुद्रदामनच्या जुनागड येथील शिलालेखांतील ७३ व्या वर्षापासून सुरू होतात. नाण्यावरील सन पांचवा सत्रप जीवदामन् याच्या कारकीर्दीतील १०० या वर्षापासून सुरू होतात घराण्याच्या शेवटापर्यंत ते आहेत. गुप्तांच्या हल्ल्यामुळें जेव्हां सत्रपांचें घराणें मोडकळीस येऊं लागलें तेव्हां कोणतींच नाणीं पाडली जाणें शक्य आहे. हिंदुस्थानांतील या भागांत प्रथम जीं गुप्तांनीं नाणीं पाडलीं त्यांचे सन नीट वाचतां येत नाहींत.


Comments

Popular posts from this blog

धनगर समाजातील आडनावे-

List of Hatkar clans

About 108 clans(108 कुळ/कुल) of Dhangars and 22 sub castes (22 पोट जाती).