सम्राट अशोकाचे बलशाली भारताचे स्वप्न धनगर समाज पुर्ण करेल.

सम्राट अशोकाचे बलशाली भारताचे स्वप्न धनगर समाज पुर्ण करेल.
आपल्या मुंबई महानगरीत विविध समाजगट गुण्यागोविंदाने राहत आहेत. त्यांच्या काही समस्या आहेत. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे त्यांचा एक राजकीय कल देखील आहे. मुंबईचं अस्सल सामाजिक राजकीय विश्लेषण, `धनगर सत्तेत किती?. आज मुंबईतल्या धनगर समाजाचा आमचे प्रतिनिधी "होळकर बिग्रेड" ने घेतलेला वेध.
धनगर. शेळ्या-मेंढय़ा राखणारी जमात. गोकुळ, वृंदावन आणि मथुरेहून मजल दरमजल करीत धनगर बंधू गुजरात आणि पुढे महाराष्ट्रात आले. हटकर, व्हटकर, खुटेकर, शेंगर, अहिर, कुरुबा, भारवाड, खाटिक, कोकणी धनगर यासह धनगर समाजाचे जवळपास 14 उपघटक. शंकर, विष्णू, पार्वती, महालक्ष्मी ही त्यांची कुलदैवते. बिरोबा, जानुबाई,निनाई,मायाक्का,धुळोबा,शिदोबा, खंडोबा, म्हसोबा, विठोबा,जोतिबा, तुळाई, यमाई, अंबाबाई त्यांचे देव. धनगरी ओव्या गुणगुणायला लावणार्र्या नि धनगरी नृत्य म्हणजे कुणालाही ठेका धरायला लावणारे. पावसाळ्याचे चार महिने सोडल्यास धनगरांची वर्षाचे आठ महिने भटकंती. त्यांचे मार्गही ठरलेले. घोडय़ावर संसार. शेळ्या-मेंढय़ा, कुत्रे, कोंबडय़ा त्यांचे सखेसोबती. ना घर ना दार, नाही शिक्षण, नाही नोकरी अशा बिकट अवस्थेत भटकंती करणारे धनगर बंधू. अजूनही सामाजिक, आर्थिकदृष्टय़ा मागासलेले आणि राजकीयदृष्टय़ा असंघटित.
धनगरांचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये समावेश करा, अशी शिफारस राज्य सरकारने 20 ऑगस्ट 1966 रोजी केंद्र सरकारला केलीय. मात्र, एवढी वर्षे उलटून गेली तरी अजून प्रश्नाची तड लागलेली नाही. त्यातच, जातींचे आरक्षण ठरविताना `धनगरऐवजी `धनगडअसा उल्लेख केला गेल्याने धनगर बंधूंची प्रदीर्घ काळ फरपट सुरू आहे. `भटक्या विमुक्तांऐवजी `अनुसूचित जमातीचे लाभ देण्याच्या मागणीला सातत्याने वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्यात. त्यामुळे धनगर समाजात तीव्र असंतोष खदखदतोय.
धनगर शिक्षण प्रसारकचे माधव गडदे, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष महादेव अर्जुन, तुकाराम हाके, संजय हाके ,राजू जागंळे ,यशवंतराव होळकर मंडळाचे भागवत जानकर,धनगर समाज बांधव आदींशी `होळकर बिग्रेडच्या माध्यमातून संवाद साधला असता, समाजाला भेडसावणार्र्या विविध प्रश्नांची उकल होत गेली.
ना नगरसेवक ना खासदार!
मुंबईत धनगर समाजाची लोकसंख्या कुणी चाळीस हजार म्हणतेय तर कुणी पाच लाखाच्या आसपास असल्याचे सांगतेय. मुंबईत समाजाचा एकही नगरसेवक, आमदार, खासदार वा मंत्रीदेखील नाही. मानखुर्द-शिवाजी नगर, गोवंडी, देवनार, चेंबूर-घाटला गाव, कुर्ला, विक्रोळी, घाटकोपर, मुलुंड, वांद्रे, विलेपार्ले, मालाड, कांदिवली, बोरिवलीत समाजाची प्रामुख्याने वस्ती आहे.
शिवाजी महाराजाप्रमाणेच वेदीक पद्धतीने राज्याभिषेक करणारा एकमेव राजा म्हणून यशवंतराव होळकर यांचा उल्लेख केला जातोय. समाजाच्या मान्यवरांच्या नामावळीत पद्मश्री ना.धों. महानोर, विमानांचे गिअर बनविणार्र्या अमेरिकेतील `यूएस एरोमोटिवचे डॉ. सुहास काकडे, पहिले बॅरिस्टर तुकाराम शेंडगे, जिल्हाधिकारी जराड, राजूरकर ,आयपियस अधिकारी मधूकर शिंदे, पद्मश्री डाॅ.विकास महात्मे,पहिले कृषी अधिकारी पांडुरंग लुबाळ,झुंझार व्यक्तिमत्व स्व. बी.के.कोकरे, डाॅ.शेबडे, अॅड.आण्णाराव पाटिल,समाजसेवक गुंडेराव बनसोडे , इतिहास संशोधक होमेश भुजाडे ,कोकणे सर आदींची नावे घेतली जात आहेत.
.एस.पुकळे,सातारा

Comments

Popular posts from this blog

धनगर समाजातील आडनावे-

List of Hatkar clans

About 108 clans(108 कुळ/कुल) of Dhangars and 22 sub castes (22 पोट जाती).