छ. शिवाजी महाराजांच्या जीवनात कुत्रा होता याचा पुरावा त्यांच्याच हयातीत कोरल्या गेलेल्या एका शिल्पात उपलब्ध झाला.
छ. शिवाजी महाराजांच्या जीवनात कुत्रा होता याचा पुरावा त्यांच्याच हयातीत कोरल्या गेलेल्या एका शिल्पात उपलब्ध झाला.
त्याची हकीगत अशी: सन १६७८ मद्धे महाराजांनी दक्षीण दिग्विजय करुन परततांना कर्नाटकातील गदग प्रांतातील बेलवडी या
छोट्या गढीस वेढा घातला होता. तिथला ठाणेदार येसाजी देसाई मराठ्यांकडुन मारला गेला. पण त्याची पत्नी मल्लाबाईने हार न
मानता युद्ध सुरुच ठेवले. यात शेवटी तिला तह करावा लागला, पण शिवरायांनी तिचे राज्य तिच्या मुलाच्या दुधभातासाठी परत
दिले आणि पतीच्या म्रुत्युनंतरही ती लढली म्हणुन तिला सावित्रीबाई हा किताब दिला. ही आठवण कायमस्वरुपी रहावी म्हणुन
सावित्रीबाईंनी शिवरायांची अनेक पाषाणशिल्पे बनवली. त्यांत वरील भागात शिवराय अश्वारोही असून दोन मावळे अब्दागि-या
घेवून आहेत तर एक कुत्रा त्यांच्या बाजुनेच झेपावत निघालेला आहे. हे शिल्प बोलके आहे. शिवरायांच्या जीवनात कुत्रा होता, तो त्यांना प्रिय होता हे उघड आहे. अन्यथा त्याचे त्या छोट्या शिल्पात स्थान असण्याचे कारण नव्हते.
Comments
Post a Comment