हटकर म्हणजे ते धनगर आहेत जे शिवाजीच्या लष्करात सर्वप्रथम सहभागी झाले
हटकर म्हणजे ते धनगर आहेत जे शिवाजीच्या लष्करात सर्वप्रथम सहभागी झाले आणि एक वेगळीच टोळी/गट तयार केला गेला. " बेशिस्त,
अनेकदा निःशस्त्र, मावळात राहणारे हे लोक किंवा डोंगरी भागात घाटावर राहणारे अश्यांना मावळी, आणि जे घाटाखाली समुद्राच्या परिसरात राहणारे हेटकरी, सर्व तरुण मंडळी यात सामील झाली होती."
रसेलने हाटकरांना डोंगरात राहणे मावळे असे म्हटले आहे, तर समुद्र सपाटीला राहणाऱ्यांना 'हेटकरी' म्हटले आहे. 'हेटकरी' हे लोक मूळ भंडारी
जनसमूहातील असून सध्या आणि कदाचित त्या काळात सुद्धा 'हेटकरी/ हाटकर' या शब्दांवरून बराच गोंधळ होत असला पाहिजे. शिवकालीन
सैन्यांत असलेले हेटकरी भंडारी सुप्रसिद्ध होते. हेटकरी पायदळाला शिवाजीमहाराज बरेंच महत्त्व देत असत.काही अभ्यासकांच्या मते हेटकरी हा
शब्द शेतकरी या शब्दावरून आला आहे. शिवकाळ आणि त्यापूर्वीच्या काळातील हाटकर योद्धे, सरदार घराण्यांची माहिती शोधण्याचे महान काम श्री. संतोषराव पिंगळे यांनी हाती घेतले आहे, त्यामुळे अज्ञात इतिहास जगासमोर येत आहे. यासाठी त्यांनी हार्दिक शुभेच्छा आणि आभार.
Comments
Post a Comment