पंढरपूरचा विठ्ठल देव नव्हे धनगर महापुरूष

जय मल्हार सेवा संघ
पंढरपूरचा विठ्ठल देव नव्हे धनगर महापुरूष
-----------------------
पंढरपूरचा विठोबा वा विठ्ठल हा देव नसून पशुपालन करणा-या धनगरातील तो शूरवीर पुरूष आहे. शिळावर कोरलेल्या पूज्य वीरांच्या मुर्तींना वीरगळ असे म्हणतात. वीरगळ
या शब्दाचा अर्थ वीरगती प्राप्त झालेला असा होतो. पशुंची चोरी करणारे दरोडेखोर ,हिंसक प्राणी, पशुपालक समुहांवर हल्ले करणारे शत्रू यांच्यापासून पशुंचे ,कुटूंबाचे तथा समाजाचे रक्षण करत असतांना वीरगतीस प्राप्त
झालेल्यांची विरगळ बनविण्याची परंपरा धनगरात होती. अशी अनेक विरगळ महाराष्ट्र व
कर्नाटकात मिळालेली आहे. विरगळ या शब्दाचा अपभ्रंश होऊन बिट्टिग झाला व बिट्टिग या शब्दाचा विठ्ठल हा शब्द झाला. सनातनी वैदिक
ब्राम्हणांनी स्वस्वार्थासाठी महात्म्य, पोथी पुरणांची रचना करून धनगराच्या या वीर महापुरूषाला कृष्णाचा अवतार ठरवून हायजँक
केलेले आहे. असे मत दुर्गा भागवत , डाँ. जी . ए. दलरी, डाँ. ग्युंथर सोनथायमर, डाँ. शं. गो. तुळपुळे,
डाँ. माणिकराव धनपलवार, डाँ. रा. ची. ढेरे यांनी नोंदवलेले आहे. आतातरी धनगरांनी विठ्ठलाला देव न बनवता वीर पुरूष म्हणून स्वीकारले
पाहिजे . देव म्हटले तर मिथक व दंतकथा जुडतात तर महापरूष - वीरपुरूष म्हटले तर दैदिप्यमान इतिहास पुढे येतो. हे धनगर जेवढ्या लवकर समाजातील तेवढेच त्यांच्या हिताचे आहे.
सुप्रसिद्ध साहित्यिक संजय सोनवणी यांचा विठ्ठला बद्दलचा लेख वाचकांसाठी मुद्दामहून येथे देत आहे. कृपया प्रत्येक धनगरांनी त्याचे सखोल वाचन करावे.
सुप्रसिद्ध साहित्यिक व संशोधक संजय सोनवणी सरांचा लेख
महाराष्ट्राचे आराध्य श्री विठ्ठल म्हणजे कोण
महाराष्ट्राचे आराध्य श्री विठ्ठल हे एक रहस्यच बनुन बसले होते. विष्णुच्या 24
अवतारांत आणि विष्णु सहस्त्रनामांतही न सापडणारा आणि तरीही एवढे माहात्म्य
पावलेला देव कोणता? कोठुन आला? पुराणांतरीही त्याचे कोठे चरित्र का येत नाही? असे असंख्य प्रश्न घेवून संशोधकांनी श्री विट्ठलाचा शोध
घेण्याचा प्रयत्न केला. लोकदेव इटल-
ब्रमल पासून ते विष्णू शब्दाच्या अपभ्रंशित रूपातही तो शोध घेतला गेला. खरे तर पांडुरंग,
पुंडरिक, पंढरपुर आणि पौंड्रिक क्षेत्र या व्यक्ती/स्थलनामांतच श्री विट्ठलाचे मुळ चरित्र दडलेले आहे याकडे दुर्दैवाने संशोधकांचे लक्ष गेले नाही. परंतु श्री विठ्ठल म्हणजे अन्य दुसरे कोणी नसुन पौंड्र या प्राचीन पशुपालक समाजातीलच एक महान शिवभक्त होता व
त्यालाच आज आपण पांडुरंग विट्ठल म्हणुन पुजतो आहोत.भजतो आहोत, हे वास्तव अनेक
पुराव्यांच्या प्रकाशात दिसते.
श्री विट्ठलाची सर्वमान्य उपाधी आहे ती म्हणजे पांडुरंग. पांडुरंग या शब्दाने कर्पुरगौर
शिवाचा निर्देश होत असला तरी विट्ठल हा गौर नसून काळासावळा आहे, त्यामुळे
ही उपाधी का, हे कोडेही संशोधकांना पडले होते.
विठ्ठलाला आता विष्णु वा कृष्णाचे चरित्र बहाल केले गेले असले तरी ते त्याच्या मुळच्या शैव रुपाचे वैष्णव उन्नयन आहे असे मत
माणिकराव धनपलवार व डा. रा.चिं.ढेरे यांनी सिद्ध केलेले आहे. तो गोपवेषातील
रुसलेल्या रुक्मीणीची समजुत काढायला गोपवेषात आलेला कृष्णच आहे अशी संत-
भक्तांची श्रद्धा आहे. ज्या पुंडरिकासाठी म्हणुन विट्ठलाचे आगमण झाले
अशा कथा स्थलमाहात्म्यात येतात, त्या पुंडरिकाची म्हणुन जी समाधी आज आहे ते
प्रत्यक्षात शिवालय आहे हेही डा. ढेरेंनी सिद्ध करुन दिले आहे.
स्थलपुराणात पंढरपुरचा निर्देश पौन्ड्रिक क्षेत्र म्हणुन येतो. एवढेच नव्हे तर या स्थलपुराणांचे नाव "पांडुरग माहात्म्य" असे आहे, "विट्ठल माहात्म्य" नव्हे हेही येथे लक्षात घेणे आवश्यक आहे.
पौंड्रिक क्षेत्र म्हणुन पुरातन काळापासुन प्रसिद्ध असलेले हे स्थान. पुंडरिक हे शिवालय.
पांडुरंग ही विट्ठलाची विशेष उपाधी आणि पंढरपुर हे स्थलनाम यावरुन मी शोध
घेतला असता एक वेगळेच रहस्य उलगडले गेले, आणि ते असंख्य पुराव्यांवरून सिद्धही होते.
"पांडुरंग" ही उपाधी नसून ते श्री विट्ठलाचे कुलनाम आहे आणि हे क्षेत्र त्याच्याच कुळाने
स्थापन केले असल्याने त्याला पौंड्रिक क्षेत्र हे नाव लाभले, एवढेच नव्हे तर पंढरपुर या शब्दाची व्युत्पत्ती पंडरंगे वा पांडरंगपल्ली या कानडी नावात शोधण्याची गरज नसून
ते पौंड्रिक...या शब्दातच दडली आहे. पुंडरिक हा शब्द पौंड्रिक या शब्दाचे सुलभीकरण आहे हे उघड आहे. त्यामुळे मुळ "पौंड्र" कोण
होते या प्रश्नाचा शोध घेणे आवश्यक होते. आणि पौंड्र या एकेकाळच्या पशुपालक, शुद्र
समाजाचे मुळ सापडते ते इसपु. आठव्या शतकातील ऐतरेय ब्राह्मण व महाभारतात.विश्वामित्राच्या 100 मुलांपैकी मधुच्छंदापेक्षा लहान पौंड्र,
औंड्र, शबर, मुतीब ई. ५० मुलांनी विश्वामित्राने दिलेल्या शापामुळे दक्षीणेत येवुन
राज्ये वसवली असे ऐतरेय ब्राह्मणावरुन दिसते. विश्वामित्राच्या शापामुळे ते शूद्र झाले असेही ऐतरेय ब्राह्मण सांगते. महाभारतानुसार पौंड्र, औंड्रादि हे बळीराजाचे पुत्र होते व त्यांनी बंगाल, आंध्र, ओडिसा (आंध्र व ओडीसा ही औंड्र या शब्दांचे अपभ्रंश आहेत.)
येथे सत्ता स्थापन केल्या. हे वैदिक परंपरेने शुद्र मानले गेलेले अवैदिक समाज असून मुळचे
पशुपालक होत. पौंड्रांनी दक्षीण
भारतातही आपल्या वसाहती केल्या याचे पुरावे आता स्पष्ट होत आहेत. महाभारत युद्धात
पौंड्र हे दुर्योधनाच्या बाजुने लढले होते.
पंढरपुर हे पौंड्रपुरचे ९अथवा पुंड्रपूरचे) सुलभीकरण आहे हे तर स्पष्टच
आहे. दक्षीणेतील
तिरुवारुर, चिदंबरम या शहरांची पर्यायनामे पुंड्रपुर अशी आहेत.
महत्वाची बाब म्हणजे
या शहरांत विठ्ठल मंदिरेही आहेत. बंगालमधील पौंड्रांनी
तेथील पुंड्रपुर
नावाच्या शहरातुनच राज्यकारभार चालवला होता असे ह्यु-
एन-त्संगने नोंदुन ठेवले आहे व
महास्थानगढ येथे या नगराचे आता अवशेषही सापडले आहेत.
महाभारतात विदर्भाबरोबरच
पांडुराष्ट्राचाही उल्लेख आहे. हे पांडुराष्ट्र पौंड्रांशी
निगडीत असणार. पौंड्र समाजाने
सर्वप्रथम दक्षीण भारतात वसाहती केल्या हे यावरुन सिद्ध
होते आणि हा काळ
औंड्रांच्या (आंध्र सातवाहनांच्याही) पुर्वीचा, म्हनजे किमान
इसपु
पाचव्या शतकापुर्वीचा असावा. म्हणजे महाराष्ट्रातील,
पंढरपुर (मूळ पौंड्रपुर
वा पुंड्रपूर) ही प्राचीन काळातील पौंड्रांची राजधानी
होती हे यावरुन स्पष्ट होईल व
या क्षेत्राला पौंड्रिक क्षेत्र का म्हटले गेले असावे हे आता
सहज लक्षात येईल.
पौंड्रांच्या स्वामित्वाखालील प्रदेश ते पौंड्रिकक्षेत्र आणि
ही पुरातन आठवण
स्थलमाहात्म्यांनी स्पष्टपणे जपलेली आहे.
श्री विट्ठलाची विशेष उपाधी आहे...पांडुरंग. या शब्दाने
विद्वानांना चकवा दिला होता.
पांडुरंग हे नाव मुळात विट्ठलाची शिव-निदर्शक उपाधी आहे
असाच समज
जोपासला गेला असला तरी ते तसे नसून ते त्याचे कुळनाम आहे,
हे आता स्पष्ट आहे..
महाभारतात पौंड्रवंशीय वासुदेव म्हणुन राजा होता. तो
"पौंड्रंक वासुदेव" या नावाने
ओळखला जात होता. तो कृष्णाचा प्रतिस्पर्धी असून
त्याला पुढे कृष्णाने ठार मारले. म्हणजे
पौंड्रवंशीय राजे स्वत:ला "पौंड्रंक" अशी उपाधी लावत होते
हे यावरुन स्पष्ट होते.
"पौंड्रंक" या शब्दाचे मराठी सुलभीकरण म्हणजे "पांडुरंग" होय.
"पौंड्रंक" विट्ठलाचेच पुढे
"पांडुरंग विट्ठल" असे सुलभ रूप बनले, कारण तोही पौंड्रवंशीय
होता.
याचा साधा सरळ अर्थ असा कि पौंड्र समाजातील, जे
पशुपालक, धनगर, कुरुब होते,
त्या समाजातील विट्ठल नामक आद्य वसाहतकार वा
शिवभक्त सम्राटाची पशुपालक
वेशातील ही मुर्ती आहे. तो स्वता: विष्णुही नाही कि
कृष्णही नाही, पण त्याचे हे
गोपध्यान पाहून यादव काळात विट्ठलाचे वैष्णवीकरण
करतांना त्याचे
गोपवेषधारी कृष्णाशी तादात्म्य साधले गेले असे स्पष्ट होते.
(प्रत्यक्षात पौंड्रवंशीयांचे
कृष्णाच्या यदूवंशाशी हाडवैर होते. महाभारत युद्धात पौंड्र हे
दुर्योधनाच्या बाजुने लढले
हे मी वर लिहिलेच आहे.) मुळच्या अवैदिक पण देवतास्वरुप
मानल्या गेलेल्या शुद्रवंशीयाचे हे
वैदिकीकरण अक्षरश: स्तीमित करणारे आहे. असे असले तरी
पांडुरंगाचे मुळ अवैदिक स्वरुप
त्यांना बदलता आले नाही म्हणुन आपण आज सत्यापर्यंत पोहोचु
तरी शकतो.
पौंड्र, औंड्रादि मंडळी हे शिवभक्त होते. आंध्रात असंख्य
शिवमंदिरे आहेतच.
महाराष्ट्रही त्याला अपवाद नाही कारण येथील मुळ
वसाहतकार पौंड्रच होते. पौंड्र
राजांनी आपली राजधानी पंढरपुर (पौंड्रपुर) येथे शिवालय
स्थापन करणे स्वाभाविकच
होते. या मंदिराला पुंड्रिकेश/ पुंडरिक असे संबोधले जाते.
पौंड्रांचे जे आराध्य तो पुंड्रिकेश/
पौंड्रिकेश म्हणुनच संबोधला जाणार हे उघड आहे, आणि तो
तसा केला गेलेलाही आहे. भक्त
पुंडरिकाची कथा कोणाही विद्वानाने मान्य केलेली नाही.
विट्ठलाच्या पंढरपुरातील
प्रकटीकरणाच्या ज्या वेगवेगळ्या कथा सांगितल्या जातात
त्या एकमेकांशी विसंगत आहेत.
त्र्यंबकेश्वरचे लघुरुप त्र्यंबक जसे होते तसेच पौंड्रिकेशाचे
संक्षिप्तीकरण पुंडरिक झाले हे
स्पष्ट आहे. ते नाम कधीही "विट्ठलेश्वर" नव्हते, याचा दुसरा
अर्थ असा कि तो शिव केवळ
"विट्ठल" या व्यक्तीचा इष्ट देव नव्हता तर त्याच्या संपुर्ण
पौंड्र समाजाचा अधिदेव
होता. स्वत: श्री विट्ठलही अनन्य शिवभक्त असून त्याच्या
माथ्यावर शिवलिंग आहे
अशी संतांची श्रद्धा आहे, हेही येथे उल्लेखनीय आहे.
विट्ठल या नावाच्या व्युत्पत्तीबद्दल विद्वानांनी अनेक तर्क
केले आहेत. बिट्टीदेव
या राजाच्या नावापासुन वा इटल-ब्रमल या जोडदेवतांतुन
इटल-विट्ठल
नावाची व्युत्पत्ती सांगितली जाते. पण आठव्या शतकातील
राष्ट्रकुट
राजांच्या कारकिर्दीत पंढरपुरच्या एका "जयद्विठ्ठ" नामक
ब्राह्मणाला जमीन दान
केल्याचा ताम्रपट उपलब्ध आहे. म्हनजे तोवर विठ्ठ-विट्ठल हे
सामान्य नाम बनावे
एवढी त्या नामाची प्रसिद्धी आठव्या शतकापर्यंत
झालेलीच होती. म्हनजे विट्ठल
हा त्याहीपेक्षा पुरातन असुन दैवत प्रतिष्ठा प्राप्त करून
बसला होता. इटल-ब्रमल हे
नंतर कधीतरी त्याच पशुपालक समुदायातुन आलेले वीरदेव
असावेत.
पंढरपुरच्या विट्ठलाशी त्याचा संबंध दिसत नाही, कारण
विठ्ठल पुरातन आहे.
विट्ठलमुर्ती अनादि आहे अशी संतांची श्रद्धा आहे,
आणि ही पुरानता पहाता ती योग्यही आहे. विट्ठल
नावाची व्युत्पत्ती अन्यत्र
शोधण्यापेक्षा ते आहे तसेच व्यक्तिनाम म्हणुन स्वीकारावे
लागते. (हे नाव विष्णुच्या 24
अवतारांतही नाही वा विष्णु सहस्त्रनामातही नाही हेही
येथे लक्षात घ्यावे लागते.
किंबहुना अन्यत्र कोठेही हे नाव सापडत नाही, पण जेथे जेथे
पौंड्रांच्या राजधान्या होत्या तेथे मात्र विट्ठलाच्या
मुर्ती मिळालेल्या आहेत. यावरुन
विट्ठल या पुराणपुरुषाची महत्ता सिद्ध होते.)
थोडक्यात पौंड्र या महाराष्ट्रातील आद्य पशुपालक
समाजाने जी राजधानी केली ती पौंड्रपुर (पुंड्रपूर) तथा आजचे पंढरपुर. या
पौंड्रांचा, जे अवैदिक
असल्याने पुराणांतरीही शुद्र मानले गेले, त्या पशुपालक/धनगर/
कुरुबांचा सम्राट
वा कोणी महान शिवभक्त विट्ठल हा पौंड्रंक (पांडुरंग)
विट्ठल. या पौंड्रांचे आराध्य
शिवाचे मंदिर ते पौंड्रिकेश तथा पुंडरिक. त्यामुळे पुंडरिक हे शिवालयच पंढरपुरचे मुख्य स्थान
असून 11 व्या शतकापर्यंत उघड्यावर असलेली विट्ठलाची मुर्ती हे दुय्यम स्थान होते हे
आता लक्षात येईल. शके 1111 च्या लेखात विट्ठलदेव नायक या देवगिरीच्या पंढरपुरच्या सामंताने तेथे लहानसे मंदिर बांधले
असे नोंदले आहे. पुंडरिकेश
शिवाचे मंदिर त्यापेक्षा पुरातन आहे हे स्पष्ट आहे. आपल्या विस्म्रुतीत
गेलेल्या महानायकाची पुजा तत्पुर्वीही उघड्यावर होतच होती.
त्याच्या मुर्तीसाठी मंदिर बनवणारा सुद्धा विट्ठलदेवच होता, हेही येथे उल्लेखनीय आहे.
दिवंगत महापुरुषांच्या मुर्ती/प्रतिमा बनवण्याची प्रथा औंड्र सातवाहनांनीही पाळली असे दिसते. (नाणेघाटचे
प्रतिमाग्रुह) विठ्ठलमंदिर मुळचे बौद्धधर्मीय स्थान असावे असे मानण्याचा एक प्रघात आहे.
प्रत्यक्षात सन ११८९ पर्यंत
मुळात विठ्ठलाचे मंदिरही अस्तित्वात नव्हते, त्यामुळे या तर्कात काहीही अर्थ नाही.
भगवान बुद्धाचेही वैदिकीकरण करण्याच्या नादात
त्यांनाही विष्णुचा अवतार घोषित
केल्याने आणि श्री विठ्ठल विष्णुचेच रूप आहे अशी मान्यता पसरल्याने विठ्ठल हा
बुद्धरुपातही पाहिला जाणे स्वाभाविक होते, एवढेच!
थोडक्यात विट्ठलाला वैष्णव मानने व विट्ठलाला विष्णू/
कृष्णरुपी मानने हे अनैतिहासिक
आहे हे यावरुन सिद्ध होते. तो पशुपालक समाजाचा
पौंड्रवंशीय श्रेष्ठ पुरुष
होता आणि महान शिवभक्त होता हेच काय ते सत्य आहे. परंतु
विट्ठलाचे वैदिकीकरण/
वैष्णवीकरण करण्याच्या नादात ज्या भाकडकथा निर्माण
केल्या गेल्या त्यामुळे मुळ सत्यावर
जळमटे पडली होती...पण आता तरी नवीन दृष्टीकोनातुन त्याकडे पहावे
संकलन :
होमेश भुजाडे
@[UzpfSTg2OTI3ODQwMzExNTAwNDo5MzUwNDY5MDMyMDQ4MjA6MA==:@[UzpfSTg2OTI3ODQwMzExNTAwNDo5MzUwNDY5MDMyMDQ4MjA6MA==:https://m.facebook.com/permalink.php?story_fbid=935046903204820&id=869278403115004&substory_index=0]]

Comments

Popular posts from this blog

धनगर समाजातील आडनावे-

About 108 clans(108 कुळ/कुल) of Dhangars and 22 sub castes (22 पोट जाती).

List of Hatkar clans