चिंता नव्हे चिंतन करा

चिंता नव्हे चिंतन करा
----------------------------------------
RSS पारिवारिक तसेच संघटनांशी निगडित धनगर व धनगरबाह्य समुह धनगरांना वारंवार मुस्लिमांची भीती दाखवून हिंदू खतरेमे है । हिंदू धर्म खतरेमें है । असे सतत बिंबवत असतात .
तर मराठावादी संघटना ह्या केवळ ब्राम्हणांनाच धनगर - बहूजनांचे शोषण करणारे आहेत असे सतत बिंबवत असतात .
त्यांना आपण विचारले पाहिजे. गेली 65 वर्ष धनगर जमातीच्या घटनादत्त ST आरक्षणात अडथळा आणणारे व आरक्षण लागू न करणारे मुस्लीम आहेत की प्रस्थापित ब्राम्हण -मराठे ?
धनगरांच्या नैसर्गिक चराऊ कुरणांच्या जागा हडपून शाळा -महाविद्यालय, वसाहती, बंगले ,कारखाने यांची निर्मिती करून पशुंसह धनगरांची अन्नान दशा करणारे मुस्लिम आहेत की प्रस्थापित ब्राम्हण - मराठे ?
धनगरांचा आरक्षित जागेचा राखीव कोटा जाणिवपूर्वक न भरणारे मुस्लिम आहेत की सत्ताधारी ब्राम्हण मराठे ?
धनगरांना राजकिय सत्तेपासून दूर ठेवणारे व आजपर्यंत एकही खासदार धनगरांचा न होऊ देणारे मुस्लीम आहेत की ब्राम्हण - मराठे ?
देव व धर्माची नशा पाजून अंधश्रद्धेच्या नशेत धनगरांना झिंगत ठेवणारे ब्राम्हणच आहेत.
उठ सुठ मुस्लिमांची भिती दाखवायची आणि धर्म सत्तेच्या माध्यमातून देशपातळीवर राजसत्ता राबवायची संघपरिवाराची ( RSS) ही निती ओळखा.
गावात इतर समाज समूहावर प्रचंड सामाजिक व राजकिय दहशत ठेऊन राज्य पातळीवर सतत सत्तेचे वर्चस्व कायम ठेवायचे ही मराठा निती ओळखा.
तेव्हाच धनगरांच्या शोषणाचे खरे शत्रू कोण हे आपल्या लक्षात येईल.
एक धर्म व सांस्कृतिक सत्तेतून वरपांगी हिदूत्वाचा बुराखा पांघरून ( आतून सनातनी वैदिकत्वाचा ब्राम्हणी कावा जोपासून) ब्राम्हण राजसत्ता उपभोगणारा आहे तर दुसरा सामाजिक दहशतेतून प्रसंगी वरपांगी बहुजनांच्या नावाचा बुराखा ओढून राजकिय सत्ता उपभोगणारा आहे.
पहिला राष्ट्रीय स्तरावर शोषण करणारा तर दुसरा राज्यस्तरावर शोषण करणारा आहे.
दोघेही स्वजातसत्ता टिकवण्यासाठीच अविरत झटत असतात . सत्ता कोणत्याही पक्षाची का ना असेना हे दोन्ही शत्रू आतमध्ये शिरून एकमेकांचे क्षणात मित्र बणून धनगर - बहूजनांचे शोषण करत असतात.
या दोघांचिही बलस्थाने ऐनकेन प्रकारे सत्ता प्राप्तीसाठी कार्यरत असतात. यांचे अंतिम उद्दिष्ट इतरांना वापरून, प्रसंगी आमिषे देऊन आपसात भांडत ठेवायचे आणि स्वजातीय वर्चस्वाचा झेंडा कायम फडकत ठेवायचा . शासकिय तिजोरी स्वतःसाठी , स्वकियांसाठी व स्वजातीयांसाठी रिती करायची . या साठीच हे राजकिय सत्ता हस्तगत करण्याकरिता निचतम टोकाला जाऊन मतदारांना भ्रमित करित असतात . त्यासाठी प्रत्येक जातीचे एकेक कबुत्तर पाळतात. त्याना पक्षाचे गाव , तालूका , जिल्हा यांचे अध्यक्ष - सचिव करतात . ग्रामपंचायत , पंचायत समीती, जिल्हापरिषद, नगरपरिषद , महानगर पालिका सदस्य करतात . आणि आमच्या मतांवर स्वतः आमदार - खासदार बनून मौज करतात.
खरी सत्ता गल्लीत नव्हे तर मुंबई व दिल्लीत असते . आजपर्यंत यांनी आम्हाला गल्लीतच भांडत ठेवले . ते स्वतः मुंबई - दिल्लीत राज करून राहिलेत . यांचा आँक्सिजन पूरवठा सत्ता आहे.
ब्राम्हणांची धार्मिक सांस्कृतिक दहशत संपवा आणि मराठ्यांची सामाजिक व सहकार क्षेत्रातील दहशत संपवा. पाण्याविना मासा जसा तळफळतो तशी यांची सत्ते वाचून अवकळा होईल. हे आपोआप सत्तेतून बाद होतील. शत्रूंच्या मर्म स्थळांचा शोध घेऊन ती रसद बंद करा म्हणजे शत्रू शरण येतो व सहज लढाई जिंकता येते . हे मल्हार तंत्र आम्ही अवगत केले पाहिजे. यांना सत्तेतून बाद करणे अवघड जरूर आहे पण अशक्य नाही.
धेयप्राप्तीकरिता योग्य दिशेने जाण्यासाठी कोणताही कृतीबद्ध आराखडा आज आपल्याकडे नाही. उथळ पाण्याला खळखळाट फार या उक्ती प्रमाणे 2019 ला आमचाच मुख्यमंत्री व प्रधानमंत्री असणार असे दिवास्वप्न पाहून व ठोकताळे ठोकून चालणार नाही . तर प्रचंड दिव्यातून जाण्याची तयारी ठेवावी लागते.
अर्थबल, संख्याबल, बुद्धीबल , साहित्यबल, प्रशिक्षकबल, संस्कारबल , वैचारिक स्पष्टता याची मोठ बांधावी लागते. कृती - निती ,योजना - संयम , सौजन्यशिलता - उपक्रमशिलता , एकता - नम्रता , योग्य प्रसंगी आक्रमकता तर काही प्रसंगी डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर या सर्वांचा मेळ जोडून कर्ता, करविता ,कार्यकर्ता यांना एकाच धाग्यात गुंफावे लागते .
स्वतःची मान स्वतःच्याच खांद्यावर आणि सन डोक्यावर ( मानसन्मान) कायम स्वरूपी ठेवावा लागतो . कार्य करणा-या लहानातील लहानांवर होणा-या अन्यायाचा प्रतिकार करण्याची क्षमता विकसित करावी लागते. त्यांना जपावे व जोपासावेही लागते. बेरोजगारांच्या हाताला काही अंशी तरी काम देऊन अथार्जनाचे प्रश्न सोडवावे लागतात.
वयस्क महिला वा पुरूषांजवळ बसला तर मुलासारखा आणि तरूण वा तरूणीजवळ बसला तर भावासारखा असा भाव नेता व कार्यकर्त्यांच्या सहवासाद्वारे अंतःकरणातून जाणवला पाहिजे.
जोपर्यंत स्वजातच बहूअंशी एका विचाराने व दिशेनेच संघटित नसेल तर इतर शोषित तळागळातील समाज समूह आपल्याकडे आकर्षिला जाणार नाही. आपण आपलेच अंतर्गत प्रश्न, समस्या सोडवण्यास सक्षम नसू तर दुस-यांच्या समस्या काय सोडवणार ? स्वतःच संघटित होऊन सक्षम होणार नसू तर दुस-यांना काय सक्षम व संघटित करून आपल्याबरोबर जोडणार ? आपणच परावलंबित्वाचे जीणे जगत असू तर दुस-यांना स्वावलंबित्वाचे काय धडे देणार? इतर समाजसमूह आपल्याकडे आकर्षिला जाईल अशी आपली करणी आणि कथनी असली पाहीजे.
कुंडित लावलेले झाड कधीच सावली देत नसते.इतरांना सावली देण्यासाठी झाडाच्या मुळांना खोलवर जाऊन शिरावे लागते . घट्ट रूतून बसावे लागते . तेव्हाच प्रचंड वादळ वारा पेलण्याची क्षमता विकसित होते तेव्हाच ते वृक्ष डेरेदार बनून इतरांना निरंतर सावली देत असते. कोणतेही संघटन याप्रमाणे असले पाहिजे.
एकावर विसंबून राहणे वा जाणिवपूर्वक तशी कृती करणे हे नेतृत्वाचा वनवा निर्माण करणारी बाब आहे .यामुळे नेतृत्व हरपले की चळवळ खंडित होते . कोणत्याही क्षेत्रात एकावरच विसंबून राहण्याची प्रवृत्ती घातकी असते . एका मागोमाग एक बलशाली साहित्यिक - संशोधक, नेतृत्व - वक्तृत्व हे कर्तृत्ववाना विकसित होणारी खाण आपल्याजवळ असली पाहिजे.
उथळ पाण्याला खळखळाट फार असतो म्हणून ओढे समुद्राला जाऊन मिळत नसतात. मध्येच त्यांचं प्रवाही अस्तित्व नाहीसं होत असते. पुन्हा पावसाळा आला की पुन्हा खळाळून वाहतात पुन्हा जैसे थे. काही संघटन या ओढया प्रमाणे असतात. निवडणूकांच्या काळातच वा विशिष्ट हेतू पूर्ती करिता सजीव होतात.
प्रसंगी वेगात तर प्रसंगी संथ गतीने सतत धार वाहणारी नदी ही विविध अढथळे पार करत समुद्राला जाऊन मिळण्याचे धेय गाठत असते. धनगर जमातीतचे संघटन हे सतत धार वाहणा-या नदीसारखे निर्माण होऊ शकले नाही; वा ते करू शकले नाही ; वा ते निर्माण होवूच दिले नाही; वा समाजातील वितंडवादी प्रवृतीने ते कधी फुलूच दिले नाही.
गाव खेडे किंवा तालूका जिल्हा पातळीवर अनेक संघटन स्थापन केले जाते. त्यात बहूतांशी बेरोजगारांचा व मध्यमवर्गीयांचाच उत्साह असतो.
त्यात त्यांचा दोष तरी काय ? खरा दोष आहे समाजातील उच्चभ्रू - उच्चविद्याविभूषीत - सुखवस्तू लोकांचा. यांनी आपल्या भोवती एक वर्तूळ आखलेले आहे. त्यातच जगायचं नि मरायचं. हे कधीच सामाजिक झालेले नाहीत. यांनी इतरांमध्ये सामाजिक जाणीवा निर्माण करायला हव्या होत्या . पण आज यांच्यात निर्माण करण्याची गरज उद्भवलेली आहे . यांना या गोष्टी निर्थक उठाठेवी वाटतात. हा वर्ग समाजासाठी कधी विरोध पत्करायलाही तयार नसतो. समाजासाठी ते सक्रीय होण्यापासून टाळत निष्क्रीय राहणेच पसंत करतात. समाजावर वा समाजातील व्यक्तीवर होत असलेल्या किवा झालेल्या अन्यायाविरूद्ध या वर्गाने दंड थोपाटले की सर्व सामान्यांना उर्जा मिळते. धनगर समाजातील उच्चशिक्षीत, उच्चभ्रू व सधन वर्गाने सक्रीय होणे काळाची गरज आहे.
प्रस्थापित बामची ( ब्राम्हण+ मराठा) लोअर टू अप्पर संपूर्ण सामाजिक यंत्रणाच सक्रीय आहे म्हणून ते सत्ताधिश आहेत. बलशाली आहेत. निवृत्त झालेला धनगर कर्मचारी -अधिकारी रात्रंदिवस नातवंडात रमतो. आणि बामचा आपले अबाधित वर्चस्व कायम टिकवण्यासाठी रात्रंदिवस झटतो . हा दोन मधला फरक आहे.
ज्यांना सामाजिक संघटन स्थापन करून व्यापक करण्याचा मानस असेल त्यांनी किमान दोन - चार वर्ष समाजात काम करावे. कोकण, प. महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा विदर्भ या भागात जाऊन शहरी व ग्रामिण मानसिकतेचा जवळून अभ्यास करावा.
या दोन - चार वर्षात आपण समजाला काय दिले व काय देऊ शकतो यावर चिंतन मनन करावे. अनावश्यक घाई करण्या ऐवजी नंतर अवश्य निर्णय घ्यावा.
बांधवांनो जोशात नव्हे होशात काम करा.
चिंता नव्हे चिंतन करा.
उशिरा का होईना पण यश नक्की मिळेल .
होमेश भुजाडे
नागपूर

Comments

Popular posts from this blog

धनगर समाजातील आडनावे-

About 108 clans(108 कुळ/कुल) of Dhangars and 22 sub castes (22 पोट जाती).

List of Hatkar clans