हट्टी-हटकर( पदव्या: राजे, राव आणि नाईक)




सध्याच्या काळात हट्टी जनसमुहाला बरगे, झेंडे, मेंढे(धनगर), बंडे, खिल्लारी, तेल्लारी, डांगे, गवळी हटकर, बरगाही, लिंगायत तेलवर अशी उपनावे आहेत.
(Ain-e-Akbari) आईन-ए-अकबरी ग्रंथातील धनगर संघजनसमुहातील 'हाटकर' जमाती संबंधित उल्लेख-
* आईन-ए-अकबरी (अकबराचे अनुशासन) या ग्रंथाचा लेखक अबुल फजल (१५५१-१६०२) याने लिहिलेल्या अकबरनामा या ग्रंथाचे तीन खंड आहेत. तिसर्या खंडाला 'आईन-ए-अकबरी ' असे नाव दिले असून त्यात अकबराच्या राज्यव्यवस्थेची माहिती दिलेली आहे. मी दिलेले इंग्रजी भाषांतर हे एच. ब्लॉकमन यांनी केलेले आहे.
'ऐन-ए-अकबरी' नामक ग्रंथात हटकरांचा उल्लेख केला आहे तो असा, "हटकर हे स्वाभिमानी आहेत, ही पराक्रमी आणि घमंडी प्रकारची जमात आहे. त्यांनी बाशीम (सध्याचे वाशीम) येथे सशस्त्र सेना तयार केली आहे त्यांच्याकडे १००० घोडदळ आणि ५००० पायदळ सैन्य आहे. त्यांनी आजूबाजूचे राज्य आणि किल्ले कब्जात ठेवले आहेत. त्यांना धनगर पण म्हणतात.
१४ व्या शतकात जेव्हा निजाम दख्खनचा सुभेदार म्हणून आला होता त्याच काळात हटकरसुद्धा आले आहेत असे ते म्हणतात" सर्व हटकर हे मेंढीपालन करतात, ते जेव्हा कधी मोहिमेवर जातात तेव्हा हातात एक भाला आणि सात हात लांब घोंगडी घेऊनच निघतात.त्यामुळे त्यांना बर्गी धनगर आणि बारगीर सुद्धा म्हटले जाते.
निजामाच्या राज्यात यांचा दरारा आहे. आणि ब्रिटिशांच्या काळात त्यांना सतत युद्धाला उभे राहणारे आणि बंड करण्यात कुख्यात आहेत, असेच समजले जाते. हटकरांमध्ये युद्धात छातीवर वार घेणे आणि शहीद होणे ही अभिमानाची गोष्ट समजली जाते. हटकरांमध्ये मिश्या कधी कापत नाहीत. मिश्या ठेवणाऱ्यांना मान दिला जातो. हटकर पुरुष हे शारीरिक दृष्ट्या धष्ट-पुष्ट, स्वतंत्र राहणारे, आणि स्वाभिमानी असतात. हटकरांना भटके असेही म्हटले जाते. महाराष्ट्रात आल्यावर यांचा मुख्य व्यवसाय मेंढपाळ हा आहे. पण मुळचेच शूर असल्यामुळे यातील काही सैन्यात भरती झाले आणि काहींनी गावातील प्रशासनात सहभाग घेतला.
हटकरांचा ध्वज: हटकरांचा स्वतःचा वेगळा ध्वज असतो, निजामाच्या काळात हटकरांची संख्या अधिक होती. त्यांच्या लष्करी पेशाला शोभेल असा झेंडा त्यांच्याकडे असे, झेंड्याचा वरील भाग हा पिवळा असून खालच्या बाजूला तो लालसर रंगाचा असे. समाजातील कुठल्याही सामाजिक कार्यात, किंवा युद्धाच्या वेळ हटकर स्वतःचा झेंडा घेऊनच निघतात. इतिहासात अशाच प्रकारचे झेंडे दोन साम्राज्यांचे आहेत. एक म्हणजे दक्षिणेतील विजयनगरच्या साम्राज्यातील वडियार घराण्याचे म्हैसूरचे राज्य आणि दुसरे म्हणजे गुर्जर समाजाचा झेंडा.त्यांचा झेंडा तंतोतंत असाच आहे.
बंडे- या मुळच्या हट्टी जनसमूहातील लोकांना बंडी, पुजारी,बारभाषी असे देखील म्हटले जाते. त्यांची लोकसंख्या सोलापूर, कर्नाटक सीमा रेषा आणि मराठवाडा या भागांमध्ये अधिक आहे. 'झेंडे' समूहांप्रमाणेच 'बंडे' देखील अनेक मंदिरांचे पुजारी आहेत. ज्या हट्टी लोकांच्या समूहांनी मुघल,निजाम,इंग्रज आणि प्रस्थापितांच्या विरोधात बंड केले, त्यांच्या जनसमुहाला बंडे हे नाव पडले याचे ऐतिहासिक उल्लेख हि उपलब्ध आहेत. निजामाच्या राज्यात यांचा दरारा आहे. आणि ब्रिटीशांच्या काळात त्यांना सतत युद्धाला उभे राहणारे आणि बंड करण्यात कुख्यात आहेत, असेच समजले जाते. हटकरांमध्ये युद्धात छातीवर वार घेणे आणि शहीद होणे याला अभिमानाची गोष्ट समजली जाते.
महाराष्ट्रातील हटकरांबद्दल इ.स. १५९० साली लिहिलेल्या 'ऐन ए अकबरी' ग्रंथातील हटकर संबंधित खरा उतारा- "बासिम (आताचे वाशीम) संबंधीत खूप मोठा भाग यांचा आहे हे ,यांना हटकर असे म्हणतात. त्यांच्या जवळ एक हजार घोडेस्वार आणि पाच हजार पायदळ आहे.
हटकरांनी देशस्थ ब्राह्मणांची पुरोहित म्हणून नेमणूक केल्याचा उल्लेख आहे.

Comments

Popular posts from this blog

धनगर समाजातील आडनावे-

About 108 clans(108 कुळ/कुल) of Dhangars and 22 sub castes (22 पोट जाती).

List of Hatkar clans