समाजिक न्यायहक्काची लढाई

समाजिक न्यायहक्काची लढाई
------------------------
आज धनगर समाजाला यशवंतराव चव्हाण व त्यांचे माणसपुत्र शरदराव पवार याचं लागलेल ग्रहण अकाशतील ग्रहणाबरोबर सुटु लागलेले दिसते .शाखा भेद विसरून धनगर सारा एक झाला आहे .
आज हनुमान जयंतीच्या मुहूर्तावर मोठ्या परिवर्तनाला धनगर समाजाने लंका दहन करून हात घातला आहे .
माळेगाव सह. साखर कारखाना पंचवार्षिक निवडणुकीत आपल्या भाजप रासप शेतकरी संघटना यातील कार्यकर्ते व नेत्यांनी उभरलेल्या सहकार बचाव शेतकरी पनेलचे 21 उमेदवारापैकी 15 उमेदवार विजयी झाले. 
सत्ताधारी राष्ट्रवादीकॉंग्रेसचे पैनेलने धनगर समाजात संभ्रम निर्माण करणेसाठी राष्ट्रिय समाज पक्षाची कपबशी हे चिन्ह घेऊन देखील दारूण पराभव पतक़रला " , क्योंकि अब पब्लिक सब जानती है भाई " 
राष्ट्रवादी काँग्रेसचे 21 पैकी केवळ 6 उमेदवार विजयी झाले आहेत .
सदर निवडणुकीत प्रथमच सहकार बचाव या मित्र पक्षांचे पँनलमधून 15 पैकी 9 धनगर उमेदवार निवडून आले आहेत 
तर राष्ट्रवादी काँग्रेस कंडील . 6 पैकी 3 धनगर उमेदवार विजयी झाले आहेत .
एकूण 21 पैकी 12 धनगर उमेदवार सदर संचालक मंडळावर निवडून देउन धनगर समाजातुनच पहिला चेअरमन व्हावा असा मेसेज सर्व सभासदानी या मतदानातुन दिला आहे असी सर्वत्र चर्चा होते आहे .
जे बोलायच ते कधीच करायच नाही . जे करायच ते कधीच बोलायच् नाही अशा धूर्त धुरंदर लबाड़ राजकारणी शरदराव पवार यांचे वैचारिक पराभव करणेच्या निश्चयची सुरवात या निमित्ताने ईमानी व सत्यवचनी धनगर समजाने गरीब अन्नदाता शेतकरी मराठा समाजाच्या मदतीने केली आहे असेच म्हणावे लागेल .
आज बारामती माळेगाव कारखाना निवडणूकीत सोशल इंजीनियरिंगमधून मोठी सामाजिक क्रांती घडली आहे 
सार्वजनिक निर्णय प्रक्रियेत सतत उपेक्षित राहिलेल्या वर्गाला साखर कारखान्याच्या धोरण मंडळावर आज खरे प्रतिनिधित्व मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे .
देवकते ,तावरे ,कोकरे,जगताप ,गावडे ,कलाटे ,माळी ,वंजारी राजकीय उपेक्षित अन्नदाता गरीब शेतकरी मराठा दलित वंचित वर्गाची मोट या निवडणुकीच्या निमित्ताने यशस्वीपणे बांधली गेली .
21 पैकी 15 जागा जिंकून राष्ट्रवादी धनशक्तिचा जनशक्तिने जबरदस्त पराभव केला आहे 
चंद्ररअण्णा तावरे व रंजनकाका तावरे याना पडलेली सर्वाधिक मते व महिला गटात झालेल क्रॉस वोटिंग ही या निवडणुकीत थोडया अडचणीच झाल आहे यातून जाणारे निगेटिव्ह मेसेज विचारपूर्वक थांबवले पाहिजेत .
आगामी सोमेश्वर ,छत्रपती ,भीमा पाटस , सदाशिव असे साखर कारखाने मुठभर लोकांच्या नव्हे तर समस्त जनतेच्या हाती घेन्याच्या मोहिमेची ही यशस्वी सुरवात आज झाली . हणमंत सुळ यांचा उस घेऊन जाणेस विलंब करने या प्रवृत्तीचा ही हा निषेध आहे 
खरे तर तावरे ,जगताप ,काकड़े ही येथील पूर्वीची प्रस्थापित सत्ताधारी घराणी यांची उपेक्षित वर्गाशी नाळ तुटली होती . पूर्वीच्या काही चुकामुळे धनगर समाज सत्तापिपासु पवारांचे दावणीला बांधला गेला होता . त्यामुळे या जुन्या मंडळीना प्रदीर्घ काळ राजकीय वनवास घडला . आता पूर्वीच्या वर्तनाची पुनरावर्ती होणार येणार नाही आशा सर्वसमावेशक कारभारची आज धनगर समाजाकडून अपेक्षा व्यक्त केली जात आहे .
कृतीशून्य पवारानी उपेक्षित वंचित वर्गाला शाहु फुले आंबेडकरी विचारांची गूटी पाजुन बधीर केल होत . माझी मुलगी माझा पूतण्या माझ घर या पलीकडे न पाहणारे पवार प्रारंभी ओळखले यशवंत सेना नायक बापूसाहेब कोकरे यानी 
त्या विरुद्धचा बी के कोकरे व पुढे तोच राजकीय प्रबोधनाचा झेंडा लोकबंधू महादेव जानकर यानी आपल्या त्यागी विचारानी कालच्या लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत मोठया धीराने कोणत्याही संकटाची पर्वा न करता या एक्छत्री घराण्याचे धनगर समाजाला पंगु करणारे छल कपट परवा विधिमंडळात अजितदादा कक्ष मीटिंगचे प्रोसिडिंग पर्यन्त 
उघड पाडणेच काम केले याचा एकत्रित परिणाम म्हणजे आजचा शाखा भेद विसरून धनगर सारा एक हे सिद्ध करणारा संघटित उठाव होय .
पवारानी MPSC वा UPSC नव्हे तर कुस्ती क्षेत्रासाठी धनगर समाजाला प्रोत्साहीत केल .शरीर संपदा हीच खरी संपत्ती माननारा बहुजन समाज शिक्षण हे वाघिनीचे दूध आहे ते पिल्यावर प्रत्येक ज्ञानी सजग धनगर आपल संकुचित राजकारण समजलेमुळे गुरगुरल्याशिवाय राहणार नाही हे ओळखून पैलवानकी पेशाला आसनारा त्यांचा कल महत्व आणखी वाढवल .
हीच गावो गावची पैलवान मंडळी साखर कारखाने मार्केट कमिटी ,जिल्हा बैंक ,पंचायत समिति ,जिल्हा परिषद या मध्ये परिट घड़ीतील 
चाय बिस्कुटावरील सालगडी बनवले .हे धनगर पेलवान गड़ी व्हाईस नसलेले दुय्यम दर्जाचे प्यादी म्हणूनच वापरली . फ़ार कमी मंडळी नाईलाजाने चेअरमन वा सभापती केली .
पण कारभार मात्र या परिट घड़ीतील चाय बिस्कुटावरील सालगड्यांचे मुकादम पवार मंडळीनी सर्व परमंपरागत पद्धतीनेच वाडा वा बंगल्यावरुनच चालवला हे सत्य आहे .
गावातील चार रस्त्याच उदघाटन मोठया समारंभात वरील पैकी एखादे कोकरे ,गावडे ,देवकते वा वाघमोडे सुळ यांचे हस्ते होई .वृत्तपत्रात फोटो बातमीस मोठी प्रसिद्धि मिळे पण त्या चार रस्ते पैकी एकही रस्ता देवकते कोकरे गावडे वा वाघमोडे यांनी सुचवलेला नसे मग काय कामाची ती शोभेची पद ?
असा सवाल आपल्या न्याय हककासाठी जागृत झालेला आजचा तरुण वर्ग आता विचारू लागला आहे 
जो पर्यंत ख़रया अर्थाने निर्णय प्रक्रियेत स्थान मिळत नाही तो पर्यंत या बेगड़ी लोकशाहित वंचित उपेक्षित वर्गाला स्वतंत्र मिळाले अस म्हणता येणारच नाही .
या निमित्तानी जाचक जगताप काकड़े तावरे मग़र या जुन्या वतनदार प्रस्थापित वर्गाने आता सन्मानाने सत्तेत निर्णय प्रक्रियेत बरोबरीने या उपेक्षित वर्गाला सहभाग देऊन
सर्व विकसित समाजाबरोबर या राजकीय मागास वर्गाला सामाजिक न्याय द्यावा यातच उद्याच्या उज्वल समाजाचे हित सामावले आहे पवारांसारखे केवळ व्हाईस चेअरमन न ठेवता आता बरोबरीने चेअरमन पद देखील द्यावे .धनगर समाज अत्यंत इमानी समाज आहे तो आज आपल्या सोबत आला आहे त्याला सन्मानाने जोडावे ही आजच्या काळाची मागणी आहे . त्याला सर्व क्षेत्रात समान हक्काची वागणूक मिळावी .
पवारसाहेब आलेल्या सहा जागापुढे करून चेअरमन पदासाठी धनगर उमेदवार देऊन मोठ राजकारण खेळण्याची शक्यता आहे .संभावित मत फुटू नयेत याचीही काळजी चंदरअण्णा व रंजनकाकानी घ्यावी ही कळकळीची विनंती 
पुढील सर्व सत्ता संघर्षात आपण सर्व समावेशक भूमिका घ्याल ही अपेक्षा 
आता धनगर मार खाणार नाही संपूर्ण परिवर्तन हमारा नारा है ।
माळी + धनगर + वंजारी तसेच अदिवासी ,कोळी , मातंग रामोशी या पिवळ्या झेंड्याखालील बांधव अन्नदाता गरीब राजकीय उपेक्षित मराठा व दलित शोषित वर्गाची राजकीय हक्काबाबत देशात पायमल्ली होत आहे .
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यानी या शोषित वंचित वर्गाला राज्यकर्ती वा शासनकर्ती जमात व्हा हां जो संदेश दिला आहे तो आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्व दिनी काही अंशी साकार होत आहे .
महात्मा गांधीनी यांचे झोपडीत राहणारा भंगी बांधव या देशाचा स्वाभिमानी पंतप्रधान होईल हे स्वप्न यावाटेवरूनच साकार होईल 
या कामी राज्यात धनगर समाजालाच आपल्या मौर्य क्रांतीच्या मार्गाने पुढाकार घ्यावा लागेल व या मध्ये धनगर समाज आपली ईश्वर दत्त भूमिका यशस्वी पणे पार पाडेल् असेच आज दिसते आहे 
विजय ग.गावडे महासचिव ,
भारतीय धनगर परिषद 
7588167034

Comments

Popular posts from this blog

धनगर समाजातील आडनावे-

About 108 clans(108 कुळ/कुल) of Dhangars and 22 sub castes (22 पोट जाती).

List of Hatkar clans