* सध्या अनेक अभ्यासक, संशोधक 'धनगर' म्हणजे नक्की कोण लोक आहेत? या विषयी वर्तमानपत्रे, टी.व्ही.,पुस्तके, मुलाखती मधून माहिती सांगत आहेत. समाजातील अभ्यासक म्हणून माझ मत आहे कि, 'धनगर' या विषयी जरी पूर्वी अनेक लोकांनी संशोधन केले असेल तरीही आतापर्यंत परिपूर्ण आणि सखोल असे काहीही संशोधन 'धनगर' समाजावर झालेले नाही. मी इथे प्रस्तुत करीत असलेली माहिती हि सुद्धा संपूर्ण माहितीच्या % पण नाही. कारण अजून बराच अभ्यास बाकी आहे.

*
पशुपालनचा व्यवसाय सबंध जगातील मानव जातीची प्राथमिक अवस्था मानला जातो. याच पशुपालन अवस्थेत लिपी, भाषांचा उगम झालेला आढळून येतो आणि अनेक जमातींचे, प्रदेशांचे आणि इतर अनेक गोष्टींचे नामकरण हि झाल्याचे पुरावे मिळतात. पशुपालक जमातींना आदिम जाती टोळ्या, वन्यजमाती गिरिजन अशी वेगवेगळी नावे आहेत. त्यांपैकीधनगरहे नाव राष्ट्रीय परिभाषेत अधिक प्रचलित आहे


* माझ्या अभ्यासानुसार 'धनगर' हा जनसमूह अतिप्राचीन काळापासून चालत आलेल्या पशुपालक जमातींच्या समूहाचा एक संघ आहे. जसे 'भारत' देश हा अनेक राज्यांचा संघ आहे तसाच 'धनगर' हा अनेक जमातींचा संघ आहे असे म्हणता येईल. या सर्व पशुपालक जमातींमध्ये मूळ एकाच कुळ/टोळीचे लोक पसरलेले आहेत. वर्णव्यवस्था हि यातीलच काही लोकांनी मिळून कालांतराने निर्माण केलेली समाजव्यवस्था होय. पण काही लोक पूर्वीपासून आजही मूळ पशुपालन व्यवसायाला चिकटून आहेत. कोणावरही अवलंबून राहता स्वावलंबी.. म्हणजेच सर्व प्रकारचे व्यवसाय या समाजातील लोक पूर्वीपासून करीत आले आहेत. संपूर्ण भारतात 'धनगर' या नावाने जरी पशुपालक लोकांची ओळख असली तरी त्यातील अनेक जमाती आणि त्यांच्या जाती/पोटजातींची संख्या प्रचंड आहे. आणि विशेष म्हणजे त्यातील प्रत्येकाची स्वतःची ओळख, इतिहास आणि संस्कृती आहे. या सर्वाला सर्वसमावेशकपणे 'धनगर' असेच म्हटलं जाते.

*
या भागात आपण धनगर या शब्दाच्या व्युत्पत्ती विषयी उपलब्ध माहिती जाणून घेऊ. 'धनगर' या नावाची व्युत्पत्ती प्रदेश,जनसमूह,शस्त्र-अस्त्र, पशु-प्राणी, देवनाम/ ग्रंथनाम, धान्यनामे या सर्वांशी संबंधित असण्याची शक्यता आहे.

) देश-प्रदेशानामावरून व्युत्पत्ती-
*
संशोधक श्यामसिंग शशी यांच्या मते दंडक या संस्कृत शब्दापासून सुद्धा 'धनगर' या शब्दाची व्युत्पत्ती असू शकते. कन्नड भाषेत दन आणि कुरी हे शब्द पशुपालकांशी संबंधित आहेत. रा.ची. ढेरे यांच्या मते 'धनगर' हा शब्द मूळ दक्षिणेतील आहे, तो 'दनगार' या शब्दातून निघाला आहे. कानडी भाषेत धन म्हणजे गुरेढोरे असे मानले जाते. त्यामुळे 'दनगार-दनकुर-धनगर' असे शब्द प्रचलित झाल्याचे संभवते. 'दंडक' नांवाचा कोंकणपट्टीत प्राचीन कालीं एक देश होता. सहदेवानें पश्चिम किनार्याचे जे देश जिंकले त्यांत शूर्पारक, दंडक आणि करहाटक या तीन देशांची नांवे आहेत. दंडक म्हणजे सध्याचें दंडकारण्य नव्हे तर शूर्पारकाच्या दक्षिणचें जें कोंकण ते हा सध्या डंडाराजापुरी किंवा दंडाराजापुरी ह्या शब्दांत राहिला आहे. दंडक या संस्कृत शब्दाचें दंडअ हे महाराष्ट्रीय रुप असून डंडअ हे शौरसेनी रुप आहे; आणि या दोहोंची डंडा आणि दंडा हीं गुजराथी मराठी रुपें विद्यमान आहेत. दंडा किंवा डंडा हा शब्द कोंकणांतील सह्याद्रि पर्वतावरील मूळच्या लोकांचा असून त्याचा अर्थ डोंगराचा उतरता लांब फांटा असा आहे. दांड, डांड, डांग, डंग, डुंग, डोंगर, डोंगरी वगैरे शब्द अद्यापहि प्रचलित आहेत. दंडाराजापुर प्रांतांतून घांटाने वर चढलें म्हणजे करहाटक प्रांत लागतो.

*
छोटा नागपूर, पश्चिम बंगाल,आसाम,बिहार या भागातील कुरुख' म्हणजेच 'उंराव/ओरोन' लोकांचे मूळ गुजराथ आणि कोकण असल्याचे अनेक संशोधकांचे म्हणणे आहे. त्यांच्यात सुद्धा धनगर नामक जमात वाचक शब्द प्रचलित आहेच. संस्कृतमध्ये 'धांग' या शब्दाचा अर्थ 'पर्वत किंवा डोंगराळ भाग' असा होतो. 'डाल्टन' या संशोधकाच्या मते पूर्वेतील 'कुरुख' म्हणजेच 'उंराव/ओरोन' जमातीचे लोक हे पर्वतीय परदेशात राहायला गेल्यामुळे त्यांना 'धनगर' असे म्हटले जात असावे. 'रसेल आणि हिरालाल' यांच्या मते, उत्तरेतील गडरिया म्हणजेच मेषपालक जमातीच्या लोकांमध्ये एक 'ढेंगर/धेंगर' नामक पोटजात आहे तिचे मूळ महाराष्ट्रातील 'धनगर' समाजात आहे. 'त्यांना धांगड/धांगर' असेहि म्हटले जाते. महाराष्ट्रातील पर्वतीय आणि सह्याद्रीच्या कडेकपारीत राहणारी एक जमात म्हणजे 'डांगे' कदाचित हा शब्द (डांग/धांग) यावरून आला असावा.

*
संशोधक श्याम येडेकर यांच्या मते धनगर हा शब्द 'गांधार' या शब्दाशी संबंधित असावा. 'गंधर = धंगर' अश्या प्रकारे शब्दांमध्ये बदल झाला असावा. कारण ऋग्वेदात गांधार प्रदेशातील मेंढीच्या लोकरीचे स्तुत्य वर्णन केले गेले आहे. तसेच,प्राचीन काळात या भागात मेषपालनाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केला जात असल्याचे पुरावे मिळतात.

*
संशोधक वीरेंद्र कुमार श्रीवास्तव यांच्या मते धनगर हा शब्द 'ढवळ' या महाराष्ट्रातील ग्रामनामाशी संबंधित असावा. तसेच, या भागातील अजपाल,गोपाल, रंधवाल/राणाधवल आणि धनपाल चार राजांचा उल्लेख त्यांनी केले आहेत. त्यानंतर त्यांनी तेथील लोकांचा 'लोखंडे धनगरा' असा उल्लेख लिहिला आहे.

) प्राणी/पशुनामावरून व्युत्पत्ती-
*
विल्सनच्या मते 'धनगर' हा शब्द ऋग्वैदिक काळात प्रसिद्ध असलेले 'धेनु' नामक गोनाम यावरून आला आहे. धेना,धेनु म्हणजे दुभती गाय या अर्थानें हा शब्द ॠग्वेद मागाहून झालेले ग्रंथ यामध्यें आलेला आहे. हा शब्द अनेक वेळां आलेला असून तिच्या दूध देण्यासंबंधानें तो विशेष येतो. अनेक-वचनीं या शब्दाचा अर्थ दुधाचे घोट असा होईल. दोन ठिकाणीं रथ याचा अर्थ 'घोडी' असा करतो; दुसरें एके ठिकाणीं 'वायूच्या रथांचे घोडे' असा करतो. उलटपक्षीं, बेनफे एके ठिकाणीं सायण निरुक्तावरील दुर्गाचार्याची टीका यांनां अनुसरुन याचा अर्थ ओठ असा करतो. गेल्डनरेचे मतें या शब्दाचे अर्थ 'ओठ,' 'वाणी,' 'गाय,' 'आडवता,' 'ओढा' किंवा 'प्रवाह' असे होतात. तिची बैलाशींहि (वृषभ,पुमांस्, अनडुह्) तुलना केलेली आहे. या शब्दाचा अनेक वचनीं अर्थ दुधाचे घोट असा आहे. या शब्दापासून बनलेला शब्द म्हणजे धेनुका हा होय त्याचा अर्थ नुसता 'स्त्री,' असा आहे. तसेच, वैदिक काळात गाईला २४ ते २५ प्रकारची आणखी नावे आहेत. ती पुढीलप्रमाणे-अष्टकर्णी,उस्त्र, उस्त्रा,उस्त्रिक,उस्त्रिय,गृष्टि,गो,गौर,त्र्यवि,दुघा,धेना,धेनु,पृषती,मर्यक,वत्स,वशा,वन्हि,वाह,वृषभ,सूददोह,तुर्यवाट् (पु.) तुर्यवाही (स्त्री.),त्रिवत्स त्रिवत्सा,दित्यवाट् (पु.) दित्योहि (स्त्री),निरष्ट,पंचावि,पष्ठवाह्.,महानिरष्ट.

*
गुरांची निपज हा वैदिक वेळचा मुख्य धंदा होता. गुरांमध्यें सर्वांत अधिक लक्ष बैलाकडे असे. घोड्यालाहि बरेंच महत्त्व असे. घोडे रथाला जुंपून योद्धे लढावयास जात साधारण लोकांत घोड्यांच्या रथांच्या शर्यती होत असून त्या जिंकणा-यांची वाहवा होई. देवांनां आळविण्याकरितां रचलेल्या सूक्तांत बैल, गाई, घोडे यांची पुन्हां पुन्हां मागणी केलेली आढळते. मूळच्या रहिवासी लोकांत निरनिराळ्या तटांत जीं भांडणें होत तीं सर्व बैलगाईंच्यासाठीं असत यावरूनलढाईला मूळचा शब्दगोधनाची इच्छाअसा योजिला आहे. गोधन हें अतिश्रेष्ठ धन अशी याची अतिशयोक्तिपूर्ण स्तुति केलेली आहे. * वासराकडे धांवत जाणार्या गाईंचें हंबरणें म्हणजे मधुरगान होय असें प्राचीन लोक मानीत. आपलें वासरूं समोर दिसलें असतां जशी गाय आनंदानें हंबरते तसे इंद्रदेवतेच्या अग्रभागीं ऋषी हे आनंदानें गीत गातात असें एका कवीनें वर्णन केलें आहे. देवांनां बैलांची देवतांनां गाईंची उपमा दिलेली आहे. गाईचें दूध हा खाण्याच्या पदार्थांतला मुख्य पदार्थ मानला जात असें एवढेंच नव्हे, तर दूध तूप हे पदार्थ देवांनां द्यावयाच्या हविर्भागांतहि प्रामुख्येंकरून असत. पिण्याकडे विशेषतः धारोष्ण दुधाचा उपयोग करण्यांत येई, कच्चीगायपक्कें (पक्व)” दूध कसें देते याचें वैदिक काळांतील कवीनां आश्चर्य वाटे, एका जर्मन बालगीतांत आलेल्या कल्पनेप्रमाणें (“गाय तांबडी आणि दूध कसें पांढरें?”) वैदिक काळांतले कवीसुद्धां इंद्रानें काळ्या किंवा तांबड्या गायींच्या ठिकाणी पांढरें दूध ठेवलें या चमत्काराबद्दल त्याची स्तुति करीत.

*
सिंधू भाषेप्रमाणे धणु म्हणजे (धन् =धावडवणे)= धन (गो)धन+रु अक्षरांच्या उलटापालटीने धन(गो)रु= धनगर धनारू म्हणजेच गुराखी). संपूर्ण भारतातील 'धनगर' जनसमूहात अनेक जमाती या गोपालन व्यवसाय मोठ्या प्रमाणावर करतात त्यामुळे हि व्युत्पत्ती पटण्यासारखी आहे. (या जमातींची यादी मी पुढील भागांमध्ये देईन.)

) शस्त्र-अस्त्रनामावरून व्युत्पत्ती-
*
एक पारंपरिक अस्त्रविद्या 'धनुर्वेद' म्हणून प्रचलित आहे. ऋग्वेदात धनू धनुर्धरांना महत्त्व दिले आहे. भारतीय पुराणात धनुष्याचे शार्ङ् (शिंगाचे) वांश (वेळूचे) असे दोन प्रकार सांगितले आहेत. पुढे मात्र शास्त्रीय ज्ञानात जसजशी प्रगती झाली आणि शिंग, गोंद चामडे . नवनवीन कच्चा माल, हत्यारे साधने प्रचारात आली. अतिप्राचीन काळी धनुर्विद्येत अक्कड, हिटाइट ॅसिरिया ही राष्ट्रे अग्रेसर होती. या सर्व राष्ट्रांमध्ये पशुपालक जनसमूहाचे वर्चस्व असल्याचे अस्सल पुरावे उपलब्ध आहेत संयुक्त धनुष्याचा संघटित रीत्या धनुर्धरांचा युद्धात उपयोग करण्यास तेथेच सुरुवात झाली. त्यामुळे धनगर आणि धनुर्धर हा दोन शब्दांचा घनिष्ट संबंध असावा असे माझे मत आहे.

*
धनगर समाजातील हटकर,बरगे आणि पाल या दोन्ही जमातींचा संबंध सुद्धा प्राचीन काळातील शस्त्रांशी तंतोतंत जुळतो त्याचा उल्लेख पुढील भागांमध्ये येईलच.

) जनसमूहनामावरून व्युत्पत्ती-
*
महाभारत ग्रंथात विदेशी जनसमूहांच्या यादीमध्ये 'धेनुक' नामक जनसमूहाचा उल्लेख आहे. "'मारुता: धेनुकाश्चैव तंगणा: परतंगणा:" (महाभारत, भीष्मपर्व ५०,५१). धेनुक जनसमूहाच्या योध्यांनी महाभारतात पांडवांच्या बाजूने युध्द लढले होते. यांचे स्थान सध्याच्या खोटन नदीकिनारी असावे असे अभ्यासकांचे मत आहे.

) देवनाम/ ग्रंथनामावरून व्युत्पत्ती-
*
वेदांत वेद हा एकच शब्द नाहीं तरवेदआणिवेदस्असे दोन शब्द आहेत. वेद शब्द पुल्लिंगी आहे वेदस् शब्द नपुसंकलिंगी आहे. वेद आणि वेदस् हे दोन्ही शब्द विद् धातूपासून झाले आहेत. या दोनहि शब्दांचे प्रयोग सामान्यतः सर्व वेदांत आले आहेत. ‘वेदसशब्दांचे अर्थधनज्ञानअसे बरेच ठिकाणीं आले आहेत. सायणाचार्यानीं कांहीं ठिकाणीं धन असा अर्थ घेतला आहे. कांहीं ठिकाणीं ज्ञान असा अर्थ घेतला आहे. यास्काचार्यांनीं मात्रधननामानि’ (निध २।१०) या शब्दमालिकेंतचवेदस्शब्दाचा उल्लेखमघं, रेक्णः, रिक्थं वेदःअशा तर्हेनें केला आहे.‘वेदस्शब्दाचाधनया अर्थानें प्रयोग पुष्कळ स्थळीं येत असल्यामुळें सर्व उतारे देण्याची आवश्यकता नाहीं. तथापि कांहीं स्थलांचा निर्देश करितों. (क्र. १०.२७, १०;८४, ;९९, ..४५, १५;८१, ..८९, ;१०३, ..१५, ;१९, ..५३, १४.., १२. अथर्व. .३१, ..२०, ;.२९, .२०.५७, .) अथर्ववेदांतील स्थलांचाहि निर्देश वर आला आहे. परंतु महत्त्वाची गोष्ट ही आहे कीं, ‘वेदस्शब्दाचाज्ञानया अर्थानें शुक्लयजुर्वेदांत स्पष्ट उल्लेख आलेला आहे. तो मंत्र असा-‘पूषा नो यथा वेदसामसद्वधे रक्षिता पायुः अदब्धः स्वस्तये’ (शुक्ल . सं. २५.१८) हाच मंत्र ऋग्वेदामध्यें .८९, या ठिकाणीं येतो; तेथें भाष्यकार सायणाचार्य यांनींवेदस्या पदाचा अर्थधनअसा केला आहे.

*
मूळ अर्थधनअसा असून नंतरचा अर्थज्ञानअसा रूपकामुळें होणें किंवाज्ञानहा मूळचा अर्थ असून रूपकामुळेंधनअसा अर्थ शिरणें या दोनहि क्रिया शक्य आहेत. ‘वेदस्शब्दाचा ज्ञान हा अर्थ घेण्याचें कारणजातवेदस्शब्दावरील यास्काचार्यांची निरूक्ति असावी असें वाटतें. ‘विद्म्हणजे जाणणें किंवा ज्ञान असणें अशा अर्थाचीं वाक्यें अनेक आहेत आणि वेद, विदत्र, विद्मत्, वित्त इत्यादि अनेक रूपें दोन्ही अर्थांशीं जुळविण्याजोगीं आहेत. यावरून एवढें मात्र निश्चितपणें म्हणतां येईल कीं, दोन्ही अर्थ फार जुने आहेत. ‘विद्धातूचा जाणणें या अर्थानेंच उपयोग ज्यांत आहे असे उतारे अधिक आहेत. वेद याचा पहिला अर्थ ज्ञान करतां धन केला तरविद्धातूच्या अनेक अर्थावरून निघालेला निर्णय त्यास पोषक होत नाहीं.

*
वैदिक काळात पशुपालनाला अनन्य साधारण महत्व होते, तसेच वेद ग्रंथांची रचना करणारे सर्वच व्यक्ती हे पशुपालक असल्याचे उल्लेख हि आहेत. त्यामुळे धन/धेनु या शब्दाला वैदिक काळात महत्व प्राप्त झाले असल्याचे संभवते.

*
धन्वंतरि देवता - आयुर्वेदाचा प्रवर्तक एक देव आणि त्या देवाचा मानावी अवतार काशीराज धन्वंतरी होय. शल्यतंत्र म्हणजे रोग बरे करणाऱ्या शस्त्रक्रियेची प्रक्रिया ज्या आयुर्वेदात सांगितली आहे, त्या आयुर्वेदाचा मुख्य उपदेशक. काशीच्या प्राचीन पुराणकालीन राजवंशातील हा आयुर्वेदाचा आचार्य असलेला धन्वंतरी राजा होय. हरिवंश, विष्णुपुराण, अग्निपुराण, वायुपुराण, भागवत इत्यादिकांप्रमाणे भगवान विष्णूच्या अंशापासून निर्माण झालेला धन्वंतरी हा देव काशीच्या राजवंशात वाराणसी येथे मनुष्यरूपाने अवतरला. त्यानेच आयुर्वेद प्रवृत्त केला. असे म्हटले आहे. हरिवंशात ही वंशपरंपरा अशी सांगितली आहे.() काश, () दीर्घतपा, () धन्व, () धन्वंतरी, () केतूमान, () भीमरथ () दिवोदास. काही पुराणांत दिवोदासालाही धन्वंतरी म्हटले आहे.

*
धन्वंतरीच्या आयुर्वेदाचे आठ भाग पुढीलप्रमाणे आहेत : () काय (शरीरविज्ञान), () बाल (बालवैद्यक), () ग्रह (भूतपिशाचादिकांपासून झालेल्या पीडांचे वैद्यक), () ऊर्ध्वांग (शिरोभागात तेथील इंद्रियांत होणाऱ्या विकारांचे वैद्यक) () शल्य (शस्त्राघाताची चिकfत्सा) () द्वंष्ट्रा (विषचिकित्सा), () जरा (आरोग्य वाढविणारे रसायन), () वृष (वाजीकरण). धन्वंतरीच्या नावावर आणखी दहाबारा ग्रंथ संस्कृतमध्ये उपलब्ध आहेत; परंतु त्यांच्या प्राचीनतेबद्दल निश्चितपणे काही सांगता येत नाही. धनगर समाजात अश्या काही जमाती आहेत, ज्यांची नावे हि ग्रंथात वर्णिलेल्या वेग-वेगळ्या देवतांशी संबंधित आहेत. तसेच, अश्या जमातीचा आयुर्वेदाविषयी आणि जंगलातील वनस्पतीविषयी सखोल अभ्यास आहे.

) धान्यनामावरून व्युत्पत्ती-
*
धान हे आशियाखंडातील मुख्य पिक मानण्यात येते. ज्यातून तांदूळ काढला जातो. धान्य हा शब्द नपुंसकलिंगी असून तो 'धाना' शब्दापासून झालेला आहें. ह्याचा अर्थ मराठीत प्रसिद्धच आहें. हा शब्द ऋग्वेद उत्तरकालीन ग्रंथ ह्यांत आलेला आहें. बृहदारण्यकोपनिषदांत दहा प्रकारचीं (जमीन नांगरून काढलेंली) धान्यें (ग्राम्याणि) आहेतं. तें दहा प्रकार म्हणजे तांदूळ, यव (व्रीहियवा:) तिल,उडीद,(तिलमाषा:),अणु, प्रियंगव, मका (गोधूमा: ), मसूर(मसुरा:), खल्व खालकुल असें होत. ऐतरेय शतपथ ब्राह्मणं ह्यांत घोडयाला धान्याद म्हणजे धान्य खाणारा असें म्हटलें आहें. ऋग्वेदामध्यें माणसांना धान्य करणारें ( धान्यकृत् ) असें म्हटलें आहें. धान्य साठवण्याच्या आगारांचा संरक्षक म्हणजे धनगर असा याचा अर्थ होऊ शकतो.

अश्याप्रकारे 'धनगर' या नावाची व्युत्पत्ती प्रदेश,जनसमूह,शस्त्र-अस्त्र, पशु-प्राणी, देवनाम/ ग्रंथनाम, धान्यनाम या सर्वांशी संबंधित असण्याची शक्यता आहे. यापैकी कुठल्याही एकाच गोष्टीवरून हा शब्द आला असेल हे निश्चित कोणीच सांगू शकणार नाही असे मला वाटते. कारण पशुपालक जनसमूहांचा संपूर्ण जगात इतका मोठा पसारा आहे कि, अनेक ठिकाणी त्यांच्या जमातींची नावे वेग-वेगळ्या गोष्टींवरून रूढ झाली आहेत. धनगर समाजांतर्गत असणाऱ्या जमातींविषयी माहिती पुढील भागात देईन.

माहिती सौजन्य- ) मराठी विश्वकोश
) महाराष्ट्रीय ज्ञानकोश

Comments

Popular posts from this blog

धनगर समाजातील आडनावे-

List of Hatkar clans

About 108 clans(108 कुळ/कुल) of Dhangars and 22 sub castes (22 पोट जाती).