धनगर राजा पंढरीचा
धनगर राजा पंढरीचा.
महाराष्ट्राचे आद्य वसाहतकारांचा
आद्य राजा धनगर पांडुरंग विठ्ठल (पुण्डरीक विठ्ठल). राजधानी पंढरपूर (पुंड्रपूर).
तो महाराष्ट्राचा आद्य राजा
होता. त्यामुळेच सबंध महाराष्ट्राचे आराध्यदैवत बनला. तो सबंध महाराष्ट्राला देवतेपेक्षा
कमी नाही.महाराष्ट्राची आद्य राजधानी पंढरपूर हे माझे गाव असल्याचा मला अभिमान वाटतो.
महाराष्ट्राचे आद्य वसाहतकार
पशुपालक धनगर आहेत. विट्ठल हा त्यांच्यापैकीच आद्य राजा आज श्री विट्ठलाच्या रुपात
पुजला जातो. विट्ठल हा गोपालक पौंड्र धनगर समाजातून उदयास आला.
म्हणजेच श्री विट्ठल आणि खंडेराय,
जी आजच्याही महाराष्ट्राची आराध्ये आहेत ती मुळच्या धनगर समाजातील महापुरुषांची दैवतीकरणे
आहेत हे उघड आहे. आजही धनगरांना खंडेराय हा किती पुज्य आहे हे वेगळे सांगायची गरज नाही.
खरे तर ते त्याच्या रुपात आपल्या अलौकिक सामर्थ्याच्या पुर्वजाचीच पुजा करत आहेत.
धनगरांचा गौरवशाली इतिहास:
निर्मिती ही बहुपेडी असते.
संपत्ती, सत्ता, संस्क्रुती, कला, वास्तु अणि साहित्यातुन ती परिस्फुट होत असते. महाराष्ट्रातील
आद्य वसाहतकार हे पशुपालक होते हे मे आधीच्या लेखांत स्पष्ट केले आहे. सावळदा संस्क्रुतीचे
सर्वात पुरातन अवशेष आता तापी नदीच्या खो-यात सापडले आहेत आणि त्यांचा काळ हा इसपु
३००० इतका मागे जातो. या प्रदेशात सापडलेल्या अवशेशांवरुन या संस्क्रुतीचे निर्माते
अहिर पशुपालक होते असे स्पष्ट होते. या प्रदेशातील भाषेला अहिराणी म्हणतात यावरुन यांची
प्राचीनता लक्षात यावी. पशुपालन, मासेमारी, व काही प्रमानात शेती हा त्यांचा महत्वाचा
व्यवसाय होता हे आता स्पष्ट झाले आहे.
थोडक्यात हे लोक आजच्या धनगर
समाजाचे पुरातन पुर्वज होत असे म्हणायला प्रत्यवाय नाही. यामागोमाग पुंड्र, औंड्र हे
पशुपालक समाज अन्य प्रदेशांप्रमाणे महाराष्ट्रातही पसरले. अहिर धनगरांनी खानदेश व्यापला
तसा पौंड्र धनगरांनी दक्षीण महाराष्ट्र व्यापला. पुंड्रपुर (आजचे पंढरपुर) ही त्यांची
राजधानी होती. विट्ठल हा त्यांच्यापैकीच आद्य राजा आज श्री विट्ठलाच्या रुपात पुजला
जातो. (पहा-विट्ठलाचा नवा शोध -संजय सोनवणी.)
म्हणजेच श्री विट्ठल आणि खंडेराय,
जी आजच्याही महाराष्ट्राची आराध्ये आहेत ती मुळच्या धनगर समाजातील महापुरुषांची दैवतीकरणे
आहेत हे उघड आहे. आजही धनगरांना खंडेराय हा किती पुज्य आहे हे वेगळे सांगायची गरज नाही.
खरे तर ते त्याच्या रुपात आपल्या अलौकिक सामर्थ्याच्या पुर्वजाचीच पुजा करत आहेत.
सुरुवातीला निम-भटके जीवन
जगणारा हा समाज स्थिर होत गेला. नगरे वसवली जावू लागली. इस्पु २३० च्या दरम्यान औन्ड्र
धनगरांतील सादवाहन घराण्याने महाराष्ट्रात स्वतंत्र सत्ता स्थापन केली.
सादवाहन (सातवाहन) हे मुळचे
औंड्र वंशीय अहिरांपैकीच आहेत हे आता नवीन संशोधनानुसार स्पष्ट झाले आहे. सातपुडा पर्वताच्या परिसरात त्यांचा उगम झाला हे
त्यांच्या मुलनामावरुन सिद्ध होते. सादवाहन हे नेहमीच महाराष्ट्री प्राक्रुताचे समर्थक
होते...इतके कि त्यांच्या जवळपास ४५० वर्षांच्या कारकिर्दीतील एकही लेख संस्क्रुतात
नाही. स्वतंत्र राज्यस्थापनेपुर्वी हे चंद्रगुप्त मौर्याचे सामंत होते. चंद्रगुप्त
मौर्य हा मोरीय या पशुपालक समाजातुनच पुढे येत सम्राट बनला होता हा इतिहास आता स्पष्ट
झाला आहे. यावरुन दोन्ही समाजांचे पुरातन नाते स्पष्ट होते.
एवढेच नव्हे तर हाल सादवाहनाने
गाथा सप्तसही च्या रुपात एक अलौकिक वाड्मयीन ठेवा आपल्यासाठी निर्माण केला होता हे
कसे विसरता येईल? सादवाहनांनी विदेशी व्यापार वाढवला होता. त्यांचे नौकाशास्त्र एवढे
प्रगत होते कि मेगास्थानिसनेही त्याचा आदरपुर्वक उल्लेख केला आहे.
पुढे वाकाटक, कदंब, यादव,
भोज हे महाराष्ट्रातील राज्यकर्तेही याच विस्त्रुत समाजातुन उदयाला आले. याचे कारण
म्हणजे, हा पशुपालक समाज तत्कालीन अर्थव्यवस्थेत सर्वात महत्वाचा आणि मोठा घटक होता.
हा समाज पराक्रमी तर होताच पण निर्मितीक्षमही होता. महाराष्ट्रातील आद्य संस्क्रुतीची
पाळेमुळे रोवुन हा समाज थांबला नाही तर त्यात तो व्रुद्धी करत राहीला. सादवाहनकालीन
लेणी आजही त्या निर्मितीक्षमतेची उदाहरने आहेत...जी धनगर समाजाला आजही आपल्या पुर्वजांबद्दल
अभिमान देत राहतील. याच समाजातुन व्यवसायाधिष्ठीत कौशल्य असनारे घटक विकसीत झाले. त्याबद्दल
पुढे लिहिणारच असल्याने येथे फक्त पुरातन व्यवसायाशी नाळ जुळवुन आजही राहिले त्यांच्या
इतिहासाबद्दल बोलायचे आहे.
याबद्दल विस्ताराने एक ग्रंथच
लिहावा लागेल. येथे थोडक्यात सांगायचे म्हणजे आज सामाजिक द्रुष्ट्या अवनतीला पोहोचलेला,
नव्या युगात जीवनसंघर्षात व्यस्त झालेल्या या समाजाला आपले मुळ स्वरुप कळायला हवे यासाठी
हा प्रपंच. जवळपास ८व्या शतकापर्यंत या समाजाने राजकीय व आर्थिक द्रुष्ट्या महाराष्ट्राला
वैभव प्राप्त करुन दिले. महाराष्ट्रातील लोककला/नाट्य/संगीताचे मुळ जनक हेच. यांचे
मौखिक साहित्य/दंतकथा आजही अंधारात आहेत. आपले पुर्ववैभव आणि निर्मितीची क्षमता विसरत
गेली आहे कि काय?
प्रत्येक समाजाला उन्नती आणि
अवनतीचे चक्र उपभोगावे लागते हे खरेच आहे. एक झापड येते आणि नाविण्याची हौस संपते.
आहे तेच कसे सांभाळायचे, बदलांशी कसे जुळवून घ्यायचे हे प्रश्नचिन्ह उभे रहाते. एखादे
मल्हारराव, यशवंतराव वा लोकमाता अहिल्याबाई येतात...निर्मितीला चालना देतात...पण त्यातुन
बोध मिळतोच असे होत नाही. काही लोक शिवरायांपारही काही इतिहास होता याकडे का वळत नाहीत
याचे उत्तर खुप साधे आहे कारण त्यापलीकडे त्या समाजघटकाचा विशेष असा मुळात इतिहासच
नाही. ते धनगरी सत्तांचे सरंजामदारीपद उपभोगत गेले आणि नंतर मुस्लिमांचे सरदार बनले
हे एक वास्तव आहे. आणि ज्यांचा इतिहास आहे ते मात्र आजच्या सत्तेच्या राजकारणात प्यादे
बनवले जात आहेत. जीवनाच्या अस्तित्वाचा जीवघेणा संघर्ष त्यांना करावा लागत आहे. एवढेच
नव्हे तर आपल्याच उप-घटकांत...मग ते अहिर असोत कि अन्य कोणी...ऐक्य साधले जात नाहीय.
मला एकच सांगायचे आहे...बाबांनो
तुमचे पुर्वज येथील आद्य वसाहतकार आहेत. त्यांनीच येथील संस्क्रुतीची सुरुवात केली.
त्यांनीच अवाढव्य राजसत्ता स्थापन केल्या. ज्यांचे जीवंत पुरावे आजही विश्वाला चकित
करत आहेत अशा वास्तु निर्माण केल्या. तुमच्या पुरातन वारशांचे अपहरण झाले आहे...होत
आहे...आणि तरीही तुम्ही गप्प आहात. असे होतेय याचे एकमेव कारण म्हनजे तुम्ही तुमची
अस्मिता विसरला आहात. इतिहास ध्यानी ठेवलाच नाही.
त्याअगोदर हा प्रदेश संपूर्ण
प्रदेश दंडकारण्याने व्यापलेला होता. हट्टी, गुर्जर,अहिर, यादव, गवळी, पुंड्र आणि औंड्र/आन्ध्र
धनगरांनाच पहिल्यांदा मरहट्टा म्हटले गेले. महाराष्ट्राचे मूळ नाव 'मरहट्ट' असून तिथे
हट्टी किंवा हाट लोकांची वस्ती हट्टी होती. शं. ब जोशी यांच्या मते यांच्या मते
"महाराष्ट्र या देशाचे मूळ नाव मरहट्ट असे होते. ते नाव कानडी आहे." मर हा
कानडी शब्द असून त्याचा अर्थ झाड असा आहे.आणि हट्ट म्हणजेच लढाऊ मेषपालक आणि गोपालक
जनसमूह. पुंडे, उंडे ही आडनावे या द्रुष्टीने तपसता येतील. दंडकारण्यातील या झाडी मंडळासच
पुढे मरहठ असे नाव मिळाले असा भावार्थ. (मर= झाड, हट्टी= प्रदेश). कानडीतील नाचिरजिय,
मंगराजनिघंटु वगैरे जुन्या शब्दकोशात 'हट्टीकार' म्हणजे गवळी असा अर्थ दिलेला आहे.
2)तेव्हा झाडीत राहणारे हट्टी
पशुपालक हे मरहट्टे लोक होत आणि त्यांच्यावरून त्यांच्या भाषेला नाव हे स्पष्ट आहे.जोशी
यांनी हट्टी- हटक जनांचा ईश्वर तो हाटकेश्वर असा समास सोडविला आहे.मरहट्टाच्या नावाची
ओळख ज्यात स्पष्ट दिसते अशा मऱ्हाटी > मराठी या नावने ते ओळखले जाऊ लागले.
मला एकच सांगायचे आहे...बाबांनो
तुमचे पुर्वज येथील आद्य वसाहतकार आहेत. त्यांनीच येथील संस्क्रुतीची सुरुवात केली.
त्यांनीच अवाढव्य राजसत्ता स्थापन केल्या. ज्यांचे जीवंत पुरावे आजही विश्वाला चकित
करत आहेत अशा वास्तु निर्माण केल्या. तुमच्या पुरातन वारशांचे अपहरण झाले आहे...होत
आहे...आणि तरीही तुम्ही गप्प आहात. असे होतेय याचे एकमेव कारण म्हनजे तुम्ही तुमची
अस्मिता विसरला आहात. इतिहास ध्यानी ठेवलाच नाही.
Comments
Post a Comment