आपल्या ' पानिपत असे घडले ' पुस्तकातील, पानिपत युद्ध प्रकरणाचा सारांश. लेख तसा जुनाच ( एक वर्षापूर्वीचा ) आहे. पण वर्ष नवीन आहे ना !

दि. १४ जानेवारी १७६१ रोजी मराठी व अफगाण सैन्यात पानिपत येथे घनघोर युद्ध झाले. या संग्रामात मराठी सैन्याचे दोन तरुण सेनापती, शेकडो अनुभवी व उमदे सरदार, हजारो रणशूर शिपाई मारले गेले. परंतु, पराभव पदरी पाडून घेताना देखील त्यांनी शत्रूला असा निर्णायक भीमटोला हाणला की, पुढे काही वर्षे हिंदुस्थानच्या राजकारणात अफगाण पक्षाने हस्तक्षेप करण्याचे धाडस केलं नाही.
पानिपत विषयावर आजपर्यंत अनेक -- अगदी देशी - परदेशी इतिहासकारांनी लेखन केलं आहे व करत आहेत. याच विषयावर आधारित सुमारे साडेपाच - पावणेसहाशे पृष्ठांचा ' पानिपत असे घडले ' हा माझा ग्रंथ दीड वर्षांपूर्वी प्रकाशित झाला आहे. परंतु, असे असले तरी या विषयाची मनावरील मोहिनी मात्र अजून कायम आहे. ' पानिपत असे घडले ' लिहिताना व त्या विषयावर आजवर चिंतन - मनन करत असताना लष्करी डावपेचांच्या दृष्टीकोनातून पाहता दि. १४ जानेवारी १७६१ रोजी पानिपतावर नेमके असे काय घडले कि, ज्याचा फटका मराठी पक्षाला बसला याचा शोध घेण्याचा मी प्रयत्न केला. त्यांपैकी मला जी उत्तरं गवसली ती येथे मी मांडत आहे. अर्थात, वाचक त्या सर्व मुद्द्यांशी सहमत होतील असे नाही, पण असहमतीतूनच नव्या संशोधनास आणि संशोधकांस प्रेरणा मिळतील याची मला पूर्णतः जाणीव आहे.


http://peshwekalinitihas.blogspot.in/2014/01/blog-post_13.html

Yashwantrao movie upcoming





Comments

Popular posts from this blog

धनगर समाजातील आडनावे-

List of Hatkar clans

About 108 clans(108 कुळ/कुल) of Dhangars and 22 sub castes (22 पोट जाती).