शकसत्ता

शकसत्ता : ख्रिस्तपूर्व पहिल्या शतकापासून ख्रिस्तोत्तर चौथ्या शतकापर्यंत गुजरात, काठेवाड, माळवा, राजपुताना, महाराष्ट्र इ. भूप्रदेशांवर राज्य करणारा वंश. मध्य आशियात चीनच्या उत्तरेस आणि सायबीरियाच्या दक्षिणेस उत्तुंग पर्वतांनी वेष्टिलेला मंगोलियाचा प्रदेश आहे,तसेच काळा समुद्र आणि कश्यप सागर(Caspian Sea) यांच्या मधला प्रदेश(यूरेशियाचे पठार) तो शक, यूए-ची(Kushan), हूण इ. भटक्या वंशांचा मूळ प्रदेश होय. तेथून त्यांनी दक्षिणेकडे स्वाऱ्या करून इराण, अफगाणिस्तान आणि भारत या देशांवरआक्रमण केले आणि तेथे आपली राज्ये स्थापिली. या लोकांपैकी शक हे अत्यंत प्राचीन होत. अँकिमेनिडी/ अजमीढ़ ( सम्राट ⇨ डरायस(Dara-1) (इ.स.पू. ५५८ - इ.स.पू. ४८६) याच्या कोरीव लेखांत शकांचा सर्वप्रथम उल्लेख आढळतो. त्याच्या मांडलिकांमध्ये (१) होमवर्ग, (२) टोकाचे शिरस्त्राण घालणारे- तिग्रखौदा आणि (३) समुद्रपारीण-तरदरया-अशा तीन शक लोकांचा अंतर्भाव होता; पण त्यानंतर कित्येक शतके इराणी साम्राज्य व नंतर ग्रीक सत्ता प्रबळ असल्यामुळे त्यांच्या कारवायांना पायबंद बसला होता; पण बॅक्ट्रिया (विद्यमान बाल्ख) प्रदेशातील ग्रीक सत्ता दुर्बल झाल्याबरोबर शकांनी तेथे आक्रमण केले आणि नंतर भारत, ड्रांगियाना (शकस्थान) व त्यालगतच्या प्रदेशात आपला शिरकाव करून तेथे राज्ये स्थापिली. ऑक्सस नदीच्या उत्तरेच्या सॉग्डिआना (बूखारा) प्रदेशातून दक्षिणेकडे आक्रमण करण्याचे कारण त्या प्रदेशावर मंगोलियातून आलेली यूए-ची लोकांची टोळधाड हे असावे.

Comments

Popular posts from this blog

धनगर समाजातील आडनावे-

List of Hatkar clans

About 108 clans(108 कुळ/कुल) of Dhangars and 22 sub castes (22 पोट जाती).