पुंड्र, औंड्र हे पशुपालक समाज अन्य प्रदेशांप्रमाणे महाराष्ट्रातही पसरले.

पुंड्र, औंड्र हे पशुपालक समाज अन्य प्रदेशांप्रमाणे महाराष्ट्रातही पसरले. अहिर धनगरांनी खानदेश व्यापला तसा पौंड्र धनगरांनी दक्षीण महाराष्ट्र व्यापला. पुंड्रपुर (आजचे पंढरपुर) ही त्यांची राजधानी होती. विट्ठल हा त्यांच्यापैकीच आद्य राजा आज श्री विट्ठलाच्या रुपात पुजला जातो. (पहा-विट्ठलाचा नवा शोध -संजय सोनवणी.)
पुंडरिक हा शब्द पौंड्रिक या शब्दाचे सुलभीकरण आहे हे उघड आहे. त्यामुळे मुळ "पौंड्र" कोण होते या प्रश्नाचा शोध घेणे आवश्यक होते. आणि पौंड्र या एकेकाळच्या पशुपालक, शुद्र समाजाचे मुळ सापडते ते इसपु. आठव्या शतकातील ऐतरेय ब्राह्मण व महाभारतात. विश्वामित्राच्या 100 मुलांपैकी मधुच्छंदापेक्षा लहान पौंड्र, औंड्र, शबर, मुतीब ई. ५० मुलांनी विश्वामित्राने दिलेल्या शापामुळे दक्षीणेत येवुन राज्ये वसवली असे ऐतरेय ब्राह्मणावरुन दिसते. विश्वामित्राच्या शापामुळे ते शूद्र झाले असेही ऐतरेय ब्राह्मण सांगते. महाभारतानुसार पौंड्र, औंड्रादिनी बंगाल, आंध्र, ओडिसा (आंध्र व ओडीसा ही औंड्र या शब्दांचे अपभ्रंश आहेत.) येथे सत्ता स्थापन केल्या. हे वैदिक परंपरेने शुद्र मानले गेलेले अवैदिक समाज असून मुळचे पशुपालक होत. पौंड्रांनी दक्षीण भारतातही आपल्या वसाहती केल्या याचे पुरावे आता स्पष्ट होत आहेत. महाभारत युद्धात पौंड्र हे दुर्योधनाच्या बाजुने लढले होते.
थोडक्यात हे लोक आजच्या धनगर समाजाचे पुरातन पुर्वज होत असे म्हणायला प्रत्यवाय नाही.
सुरुवातीला निम-भटके जीवन जगणारा हा समाज स्थिर होत गेला. नगरे वसवली जावू लागली. इस्पु २३० च्या दरम्यान औन्ड्र धनगरांतील सादवाहन घराण्याने महाराष्ट्रात स्वतंत्र सत्ता स्थापन केली.

https://www.facebook.com/vinaykumar.madane/posts/618533888279030?pnref=story

Comments

Popular posts from this blog

धनगर समाजातील आडनावे-

List of Hatkar clans

About 108 clans(108 कुळ/कुल) of Dhangars and 22 sub castes (22 पोट जाती).