गावो गावच्या दबंग वर्चस्ववादी गावगुंडानो ! दलित उपेक्षित वंचितांसह धनगर आता मार खाणार नाही !

( आता जागृत मल्हारशक्ति सर्व शोषित समाजांच्या साथीने लोकशाही मार्गाने या दबंग वर्चस्ववादी वृत्तीच् राज्यात थडग बांधणार )
~~~~~~~~~~~~~~
गावो गावी दलित शोषित उपेक्षित वंचित वर्गावर अत्याचार करणारे हात कोणाचे आहेत ? 
हे मांडवगण फ़राटा येथील घटनेवरून पुन्हा सिध्द झाल आहे .
हे गावो गावचे टगे मराठा विरुध्द धनगर असा जातीय रंग अशा घटनेला देण्यात यशस्वी होतात हे भारतीय लोकशाहीच दुर्दैव !
मांडवगणचा लढा हां कोणा एका जातीवर्गाविरुध्द नसून वर्चस्ववादी गावगुंडांविरुध्द आहे . मराठा विरुध्द धनगर असा रंग देणारे यात्रा कमिटीतील टग्याविरुध्द पोलीसी केस दाखल झालीच पाहिजे ही प्रमुख मागणी आहे .
पण सर्वसमावेशक मराठा समाज या गावगुंडाना आता साथ देणार नाही हे पहावे लागेल .
मी लहानपणा पासून मांडवगणप्रमाणे धनगर समाजाला कायद्याच्या कचाट्यात आडकवणेच्या असंख्य घटना ऐकत मोठा झालो आहे .असे दुसऱ्या कडून धनगराला सापळ्यात आडकवून स्वत: त्याला सोडवतात मग हा पैलवान आयुष्यभर सोडवणारे गावगुंडाला देव मानत राहतो .
याच निष्ठावान धनगर पैलवानांचे जिवावर हे राजकारण खेळतात हे सत्य या निमित्ताने धनगर समाजाला कळायला हवे 
या सापळ्यात आता धनगर आड़कणार नाही याच प्रबोधन कराव लागेल .अन्यथा तारीख पे तारीख या चक्रात त्याच आडकण वा आडकवणारेच सोडवुन व्हाईस नसलेले व्हाईस चेअरमन सारखे परीटघड़ीतील सालगड़ी बनवत राहतील .
आजोबानी सांगिलेली कथा मांडवगणला तंतोतंत लागू पड़ते म्हणून मुद्दाम मांडतो आहे .
गावचा धनगर सुखा समाधानात आपल्या मस्तीत जगत होता . तर गावच्या पाटलाला धनगराला मस्ती आलीय त्याच माझ्यामूळ काहीच आडत नाही हे पाहुन खुप दुःख होत
पाटलाने गावचे रामोशी बांधवाला धनगराची कडब्याची गंजी पेटवायला सांगितली .
रामोश्याने गंजी पेटवली हे कळताच वर्षभर जनावर कशी जगणार ? या विचारात या सरळमार्गी भोळ्या धनगराने रागाच्या भरात रामोश्याचे कुराडीने पाय तोडले .( वास्तविक रामोशी हां पाटलाने भाड्याने घेतलेला हात होता . त्याला मारून काय फायदा ? त्या मागच डोक नेहमीच वाड़यात सुरक्षित राहील आहे . आता कुठे बारामती संघर्षापासून मूळ ठिकाणी घाव घालण सुरु झाल आहे )
वरील भांडण कायदेशीर ससेमीरा नको म्हणून हे भांडण मिटवायला परत या पातळयंत्री पाटलाच्या वाड्यावर आल मग काय विळा व भोपळापण या कपटी पाटलाच्या हातात आला होता . पाटलानीच या प्रकरणातुन वाचवले म्हणून या दुष्ट पाटलालांच आपला देव तो भोळा धनगर आयुष्यभर मानत राहिला .
आसच नेहमी हे गावो गावचे गावगुंड भोळ्या भाबड़या दलित शोषित वंचित उपेक्षित वर्गाला पोलीसी कोर्ट क्ज्ज्यत आडकवत आपल् गावावरच वर्चस्व आजअखेर हे गावगुंड सत्ता बदलली तरी टिकवून आहेत हेच मांडवगण मधील अन्याय आत्याचाराचे घटनेवरून पुन्हा सिध्द झाले आहे
माँडवगण घटना निट समजून घेऊ या >>>>>
~~~~~~~~~~~~~~~
यात्रा कमिटीतील गावगुंडांवर देखील सर्व कलमात सह आरोपी करुन पोलीसी गुन्हे दाखल झालेच पाहिजेत !
~~~~~~~~~~~~~~~~
" मांडवगण फराटा " 
येथील वाघेश्वराची यात्रा त्या निमित्ताने कुस्तीची दंगल (आखाडा वा मैदान) भरवण्यात आल होत .कुस्ती समालोचक धनगर भूषण शंकरराव पुजारी यांचे मते महाराष्ट्रात 60 ते 65 % पैलवान हे धनगर समाजाचेच आहेत . अनेक वेळा पंच कुस्तीचे दोन्ही पैलवान व कुस्ती समालोचक हे सर्व धनगर असा अनोखा योगायोग येतो .
राज्यभरातील सर्व मैदानात 50 % कुस्तीमधील किमान एक पैलवान तरी धनगर असतोच ही सत्य परिस्थिति आहे .
कुस्ती हा धनगर समाजाचा परंपरागत खेळ आहे .याच कुस्तीतल्या जिगरबाजपनामुळे मल्हारराव होळकर यांचे नेतृत्वाखाली पुणे सातारा कोल्हापुर या तीन जिल्ह्यापुरत मर्यादित राहिलेल हिंदवी स्वराज्य पहिला बाजीराव याचे साथीने 86 जिल्ह्यापर्यंत धनगर समाजाने वाढवल हा देखील सत्य इतिहास आहे .
मांडवगण हे गाव 7 ते 8000 मतदान आसलेल गावात केवळ 200 ते 300 धनगर मतदार होईल इतकी अल्प लोकसंख्या गावापासून दिड किलोमीटरवरील 1500 मतदान आसलेला याच गावचा वार्ड क्र 2 ( गणपती मळा ) मध्ये आहे 
उर्वरित संपूर्ण गाव मराठा 80 % मराठा समाजाचा आहे . या गावातील विशिष्ट वर्चस्ववादी वृत्तिचे मदनराव फराटे ,गोविंद फराटे व संभाजी फराटे यांचे पुढाकराने यात्रा कमिटी बनली असून राज्यभर धनगर पैलवान्
कुस्तीमध्ये सतत जिंकत असतो याचा हेवा असूया व आता राजकीय कुरघोड़ीत धनगर समाजाने साथ न दिलेमुळे याच हेवा आसुयेचे रूपांतर द्वेष व मत्सरात यांचे मनात झालेने ही घटना घडवली गेली आहे असे दिसते . 
या पुढाऱ्यानी गावातीलच वार्ड 2 मधील वस्तिवरील 
राज्यस्तरावर खेळणारा धनगर पैलवान तात्याबा कोळपे याची मैदानातील शेवटची कुस्ती पूर्वनियोजित योजनेप्रमाणे रोखणेचे षडयंत्र रचले .
व पोलिसांचे मदतीने हे मैदान आंतिम पुकारलेली कुस्ती होउच द्यायची नाही या पूर्वनियोजित कटाप्रमाणे " हर हर महादेव " चा गजर करत ऊधळवले गेले .
गावातील भोळ्या भाबड़या सरळमार्गी धनगर लोकांना हां वरील यात्रा कमिटीमधील दबंगांचा कुटील डाव न ओळखता आलेमुळे ही गावातील अल्पसंख्य मागास ज्येष्ठ मंडळी जाब यात्रा कमिटीला विचारायला गेलेचे निमित्त साधुन मुद्दाम वाद विकोपाला जाईल असी जातिवाचक विधान केली गेली .
परिणामी यात्रा कमिटी व हे 10 ते 12 धनगर यांचेतील हुज्जत सुरु आसताना पूर्वनियोजित कटाप्रमाणे हाणामारी सुरु झाली या झटापटित मध्ये आलेले लडकत पोलिस याना डोकीस मार लागला . हा मार यात्रा कमिटी की धनगर या पैकी कुणाचा लागला हे कळत नाही तरी पोलिसानी एकतर्फी अल्पसंख्या धनगर समाजावर कारवाई करून गुन्हे दाखल केले आहेत .वास्तविक दोन्ही पक्षांवर गुन्हे दाखल व्हायलाच हवेत .
त्यामुळे तिथे मैदानात संख्येने अत्यल्प असलेले कोळपे पैलवान यांचे समर्थकामुळेच हां प्रसंग घडला हां राग मनात ठेऊन यात्रे कमिटीतील दबंगानी जी नाव दिली ती सर्व जेवत्या ताटावरून पकडून झोड़पत घेऊन गेले . एकाच समाजातील 60 .लोकांची यादी घेऊन पोलिस फिरत होते दहशत एवढी होती की पुरुष माणस जी आखाड्यात नव्हती ती देखील या यादीत घातली .ही यादी फक्त धनगर लोकच कसे ?
या मध्ये यात्रेला आलेले पाहुणे दोन्ही पाय नसलेला आपंग इतकेच काय 
पुण्यात पोलिस दलात कामावर असलेला कॉन्सटेबल संदीप येळे याच देखील नाव त्याची नोकरी जावी दुष्ट बुद्धिने घातल गेल आहे .तो तेंव्हा पुण्यात 19 फेब्रु शिवजयंती बदोबस्तात होता 
ही सर्व नाव पोलिसाना कोणी दिली ? यामागे जातीयवादी सड़की मनोवृत्ति दिसते 
अटक केलेले सर्व 15 व्यक्तीना प्रचंड पोलिसी मारहाण झाली आहे . उर्वरित 60 लोक आटकपूर्वसाठी फिरत आहेत . किती हा या वर्चस्ववादी लोकांचा दबंगपणा ? . 
या मंडळीनी जी जबरदस्तीने गावात निषेध सभा घेतली त्यामध्ये धनगर समाजावर बहिष्कार घालणेची भाषा केली गेल्याचे समजते .यातून या प्रकरणास मराठा विरुध्द धनगर असा रंग देण्याचा प्रयत्न वरील समाज विघातक वर्चस्ववादी लोक करत आहेत .
या गावातील गावगुंडानी निषेध सभेच्या नावाखाली धनगर समाजावर राजकीय व् सामाजिक बहिष्कार घालण्याचे ठराव केले आहेत .हे घटनाविरोधी कृत्य पोलिस उघड्या डोळ्यांनी पहात कसे राहिले ? 
. या गावात 80 % मराठा समाज व ही 2 ते 3 % धनगर बांधव् गुण्यागोविंदांने नादत आहेत .मात्र गावच्या सत्ता केंद्रावर बसलेले हे टगे संपूर्ण मराठा समाजाला वेठीस धरून हे दुष्ट माणुसकिला काळीमा फासन्याचे काम करत आहेत .तेंव्हा या यात्रा कमिटीमधील दबंग टग्यांवर ते या वादातील एक पक्ष आहेत या समन्यायाने धनगर समाजावर लावलेली सर्व कलमे लावून पोलिस केस झालीच पाहिजे .
तेंव्हाच पोलिसी कारवाई निपक्षपाती आहे असे म्हणता येईल . यात राज्य सरकारने लक्ष घालावे .
धनगर समाजाने देखील संपूर्ण राज्यभर दलित समाजावर जसे अत्याचार होतात तसे अन्याय ही गावोगावची गावगुंड करतील त्याला राज्यातील सर्व समाजाने मराठा विरुध्द धनगर असे रूप देण्याचा त्यांचा भविष्यातील प्रयत्न लोकशाही मार्गाने उध्वस्त केले पाहिजेत 
प्रथम राज्यात धनगर समाजाची संपूर्ण उपेक्षा होती ,आता नियमाःप्रमाणे संघर्ष आवस्था आली आहे .याचाच अर्थ आता आपली चळवळ योग्य दिशेवर आहे .या पुढिल आवस्था म्हणजे आपला राज्याचे निर्णय प्रक्रियेतिल स्विकार आवस्था ही आता आपल्या संघटित मल्हार शक्तिवर् नक्की गाठू यात तीळमात्र शंका नाही .
विजय ग.गावडे महासचिव भारतीय धनगर परिषद 
7588167034

https://www.facebook.com/vinaykumar.madane/posts/617754475023638

Comments

Popular posts from this blog

धनगर समाजातील आडनावे-

List of Hatkar clans

About 108 clans(108 कुळ/कुल) of Dhangars and 22 sub castes (22 पोट जाती).