* अरट्ट,आरट्टा,रट्ट,महरट्ट संबंधित माहिती
अरट्ट हे मुळ सुमेरियन आणि सिंधु संस्कृतितील अहीर आणि कोळी लोक. हे वैदिक परंपरेने शुद्र मानले गेलेले अवैदिक समाज असून मुळचे पशुपालक होत.विश्वामित्राच्या शापामुळे ते शूद्र(निषाद ) झाले आणि दक्षीणेत येवुन राज्ये वसवली असे ऐतरेय ब्राह्मणावरुन दिसते. नाग महिलांशी लग्न करु लागल्याने नागवंशी झाले.महाभारतानुसार पौंड्र, औंड्रादिनी बंगाल, आंध्र, ओडिसा (आंध्र व ओडीसा ही औंड्र या शब्दांचे अपभ्रंश आहेत.) येथे सत्ता स्थापन केल्या. हे वैदिक परंपरेने शुद्र मानले गेलेले अवैदिक समाज असून मुळचे पशुपालक होत.पुंड्रपुर (आजचे पंढरपुर) ही त्यांची राजधानी होती. विट्ठल हा त्यांच्यापैकीच आद्य राजा आज श्री विट्ठलाच्या रुपात पुजला जातो. (पहा-विट्ठलाचा नवा शोध -संजय सोनवणी.)
अभ्यासकांच्या मते अरट्ट हा प्राकृत शब्द वैदिक 'अ-राष्ट्र' म्हणजेच राजा,सरकार नसलेले राष्ट्र वरून तयार झाला असावा. अवेस्ता ग्रंथात 'अ-सारा' म्हणजेच राजा,सरकार नसलेले राष्ट्र. अरट्ट हे गणतांत्रिक राज्य असावे. आणि त्यांच्याबरोबर उल्लेख असलेले राज्य म्हणजे 'वाहिका' हे हिमवत जवळ असल्याचे उल्लेख आहेत. संशोधकांच्या मते अरट्ट आणि वाहिका या प्राचीन जनसमूहातून अनेक टोळी/जनसमूह तयार झाले ते म्हणजे- गांधार,प्रस्थाला,खासा,वसती,त्रिगर्त,पौरव,मालाव, यौधेय, सैंधव,सौवीर,यवन,कंभोज,शक. ह.ल. कोसरे यांच्या मते महाभारतातील वर्णनावरून अरट्ट जनसमूहाचे तीन शाखा/उपजनसमूह तयार झाले असावेत ते म्हणजे- टांक,वाहिका आणि जर्तिका.
* महाभारत ग्रंथामध्ये कर्णपर्वात (८/३०) 'आरट्टा' नामक प्रदेशचे उल्लेख आढळतात.
१) आरट्टा नाम ते थेशा नष्टधर्मान न तान वरजेत
वरात्यानां थासमीयानां विथेहानाम अयज्वनाम (८/३०/३६)
२) पुत्र संकरिणॊ जाल्माः सर्वान नक्षीर भॊजनाः
आरट्टा नाम बाह्लीका वर्जनीया विपश्चिता (८/३०/४०)
३) पञ्च नथ्यॊ वहन्त्य एता यत्र निःसृत्य पर्वतात
आरट्टा नाम बाह्लीका न तेष्व आर्यॊ थव्यहं वसेत (८/३०/४३)
४) आरट्टा नाम ते थेशा बाह्लीका नाम ते जनाः
वसाति सिन्धुसौवीरा इति परायॊ विकुत्सिताः (८/३०/४७)
५) सती पुरा हृता का चिथ आरट्टा किल थस्युभिः
अधर्मतश चॊपयाता सा तान अभ्यशपत ततः ((८/३०/५८)
* तसेच, द्रोणपर्वात 'आर्त' नामक उत्तर-पश्चिम भागातील एका जनसमूहाचा उल्लेख आढळतो. विचेतसॊ हतॊत्साहाः कश्मलाभिहतौजसः आर्तस्वरेण महता पुत्रं ते पर्यवारयन (७/१६५/६९)
* विष्णू पुराणामध्ये (४/१७) 'अरट्ट' नामक प्रदेशाचा उल्लेख आढळतो. ज्यावर ऋग्वेदात उल्लेख असलेल्या 'द्रुह्य' नामक लोकांनी राज्य निर्माण केले होते. हा भाग गांधार जवळील असावा असे दिसून येते.
* बौद्धायण श्रौतसूत्रमधील उल्लेख-
प्राणायु: प्रवव्राज तस्यैते कुरुपांचाल: काशिविदेहा इत्येतदायवं प्रवाजं |
प्रत्यडःमावसुस्तस्यैते गान्धाराय स्पर्वसो अरट्टा इत्येतदामावसवम ||
( बौद्धायण श्रौतसूत्रम (१८ | ४४ आणि ४५ )
- यानुसार अरट्टा म्हणजे पर्शियाचा आसपासचा भाग असावा असे वाटते.
* सुमेरियन साहित्यामधील पुराणकथांमध्ये 'आरट्टा' नामक प्रदेशाचे उल्लेख आढळतात. तेथील प्रथम राजा उरूक होता. उरूक नावाचा प्रदेश आणि राजा मेसोपोटोमिया भागात असल्याचे शिलालेखीय उल्लेख आहेत. त्यांची एक देवता 'इनाना' हि या प्रदेशातील होती त्यामुळे हे स्थान अत्यंत पवित्र मानण्यात येत असे. त्याचबरोबर त्यांचा ईश्कुर नामक देवता हा 'शेतकऱ्यांचा देव' मण्यात असे. पाश्चात्य अभ्यासकांच्या मते शिलालेखात उल्लेख असलेला 'शुरूप्पक' प्रदेश म्हणजेच आरट्टा असावा. त्यांच्यात राजाला/देवता 'दुमूझिद मेंढपाळ', 'दुमूझिद कोळी' असे पण उल्लेख आढळतात. (मेंढपाळ आणि कोळी हे मी मराठी अर्थाने लिहिलेले शब्द आहेत). पाश्चात्य संशोधक शाशा लेस्सीन यांच्या मते आरट्टा म्हणजेच सिंधू नदीच्यापरिसरातील (हरप्पा) असावे. ज्या ठिकाणी उत्तम शेती आणि पशुपालन होत असावे. इनाना देवीने 'दुमूझिद' हा मेंढपाळचा प्रमुखाला आरट्टामधील राजा म्हणून नेमले होते.
*इ.स. पूर्व १५०० मध्ये अस्तित्वात असलेल्या हट्टी लोकांच्या हिटाइट साम्राज्यात जे शिलालेख सापडले त्यामध्ये ''Maarath,Marathus' असे शब्द सापडले आहेत. as Amatha (Amathus), Kenath (Kunaitha), Maarath ??.
* सप्तसिंधूच्या परिसरातील राठी/रट्ट/रथ जनसमुहासंबंधी माहिती- राठ जनसमूहाचे लोक हे भारतातील राजस्थान आणि पाकिस्तान भागातील सिंध,पंजाब भागात वास्तव्यास आहेत. सध्या हे सर्व मुस्लिम असून यांना राजपूत असे देखील म्हटले जाते, कारण त्यांच्यात आजसुद्धा अतिप्राचीन लढाऊ कुळांची नावे आहेत. त्यांच्यात आजसुद्धा प्राचीन काळातील परंपरा जपल्या जातात. राठ लोक सध्याच्या चोलीस्तान म्हणजेच रोही जिथे सप्तसिंधूचा परिसर आहे. हरका नदीच्या किनारी यांची मोठी वस्ती आहे. यांचा परंपरागत व्यवसाय हा मेषपालन, गोपालन असून शेती देखील देखील करतात. ते वर्षातील ३ ते ९ महिने भटके जीवन जगतात.
संशोधकांच्या मते राठ हे नाव त्यांना राठी नामक गाई पाळत असल्यामुळे पडले आहे.ज्यांना सध्या झेबू असे म्हणतात. यांच्यात परिहार (प्रहार), जोहीया आणि बोहार नावाचे उपसमूह आहेत. तेथील लोककथानुसार प्रहार हे मुळचे परिहार टोळ्यांचे लोक आहेत. तर जोहीया आणि बोहार हे स्वतःचे मूळ भट्टी या टोळीत असल्याचे सांगतात. प्रहारमध्ये परिहार,कोटोवार,दहिया,शेख, लाड आणि कोरिया हि कुळे आहेत. तसेच काहीच्या मते हे मुळचे हरियाणातील पाचहाडा (पाछडा) जनसमूहातील आहेत. हे लोक निम-भटके असून मुळचे घग्गर नदीकाठच्या परिसरात राहतात.
* डॉ. वासुदेवशरण अग्रवाल यांनी भारत या नावाविषयी दोन व्युत्पत्ती दिल्या आहेत : पहिल्या व्युत्पत्तीनुसार ऋग्वेदकाळात आर्याची 'भा रत' नावाची एक पराक्रमी शाखा होती. त्या शाखेने बिपाशा (सांप्रतची बिआस) व शतद्रु (सतलज) नद्या पार करून ज्या प्रदेशात आगमन केले व वसती केली, त्या प्रदेशाला ‘भरत जनपद’ असे म्हटले जाऊ लागले. या जनपदातल्या प्रजेला भारतीय प्रजा भारतीय म्हणून ओळखले जाई. या भरतजनांच्या आधारावर देशाच्या एका विशिष्ट भूभागाला भारत म्हटले जाऊ लागले. दुसऱ्या व्युत्पत्तीनुसार ऋग्वेदात यज्ञाग्नीला भारत असे म्हटले आहे. भारतजनांनी या भूमीवर प्रथम यज्ञाग्नी प्रज्वलित केला म्हणून या देशाला भारत हे नाव प्राप्त झाले असावे. शतपथ ब्राह्मणात व महाभारतातही अग्नीला भरत असे म्हटलेले आहे. ऋग्वेद काळात अग्नीचे वाहन हे 'मेंढा' असून आजही सप्तसिंधू च्या परिसरात रट्टा नामक पशुपालक जनसमूहाचे लोक वस्त्या करून राहत आहेत.
* राष्ट्रकूट हा शब्द राष्ट्रिक उर्फ रठ्ठ यांचा कूट म्हणजे संघ या अथानें उत्पन्न झाला असावा. कारण महाराष्ट्रांत या रठ्ठांची लहान लहान राज्यें पूर्वीपासून होतीं, तींच पुढें एकत्र होऊन एक मोठें राज्य झालें असावें. यांच्याबद्दल पुष्कळशी माहिती फ्लीट यानें प्रसिद्ध केली आहे. डॉ. बजेंस, डॉ. बुल्हर, डॉ. भांडारकर व रा. शं. पा पंडित यांनीहि या घराण्याबद्दल बरीच माहिती प्रसिद्ध केली आहे. राष्ट्रकूट हे प्रथम उत्तरेकडून आले व त्यांनी सातव्या शतकाच्या उत्तरेकडून आले व त्यांनी सातव्या शतकाच्या उत्तरार्धांत मुंबई इलाख्यांतील हल्लींच्या कानडा जिल्ह्यावर त्यावेळी राज्य करीत असलेल्या प्राचीन चालुक्य घराण्याचा पराभव करून आपली सत्ता स्थापन केली.
* महाराष्ट्रात प्रचलित असलेली मध्यकालीन भारतीय आर्य (म. भा. आ.) भाषा. ही भाषा ‘महरट्ट’ या लोकसमूहाची असल्यामुळे या भाषेस ‘महरट्टी’ (संस्कृतीकरण : महाराष्ट्री किंवा माहाराष्ट्री) व या लोकांनी वसाहत केलेल्या प्रदेशास ‘महाराष्ट्र’ अशी संज्ञा मिळाली. “”मानव्य, हैहय, भोज, यादव, नल, कदंब, मौर्य, चालुक्य इत्यादी शेकडो गोत्रांचे रट्ट दंडकारण्यात वसत्यर्थ शिरले. शहाण्णव कुळींच्या रट्टांवरून व महारट्टांवरून सबंध देशाला महरट्टांचा देश ऊर्फ महाराष्ट्र ही संज्ञा पडली. मराठ्यांचा इतिहास म्हणजे या शहाण्णव कुळींच्या कर्तृत्वाचा दंडकारण्यातील प्रवेशाच्या आदीपासून आतापर्यंतचा इतिहास.” अर्थात या रट्टांबरोबर “”निरनिराळ्या दीडशे प्रकारचे लोक दंडकारण्यात भारतवर्षाच्या नाना प्रदेशांतून शिरले. परंतु या सर्व लोकांचे पुढारपण रट्ट व महारट्ट यांजकडे असे. – हे लोक यद्यपि भिन्नप्रांतीय, भिन्नजातीय व भिन्नवृत्तीय होते. तत्रापि, रट्टांचे तेज सर्वांवर पडून त्या सर्वांना कालांतराने महाराष्ट्रीय ऊर्फ मऱ्हाटा ही संज्ञा प्राप्त झाली.”
* अशोकाच्या शिलालेखात दक्षिणेतील रट्ट लोकांनाच रास्टिक असे म्हटले असून त्याचेच संस्कृत रूप ‘राष्ट्रिक’ झाले, असे रा. गो. भांडारकर यांनी आपल्या अर्ली हिस्टरी ऑफ द डेक्कन या दख्खनच्या प्राचीन इतिहासविषयक ग्रंथात म्हटले आहे. अशोकाच्या शिलालेखात एके ठिकाणी ‘महाभोज’ असा उल्लेख आहे. जसे भोज लोक स्वतःला महाभोज म्हणवून घेत, तसेच या प्रदेशात रहाणाऱ्या राष्ट्रिकांनी स्वतःला महाराष्ट्रिक किंवा ‘महारट्ट’ असे म्हणवून घेतले आणि ते ज्या देशात रहात, त्या देशाला महारट्ट व संस्कृतमध्ये महाराष्ट्र असे नाव पडले. वि. का. राजवाडे हे आपल्या महाराष्ट्राचा वसाहतकाल या प्रबंधात महाराष्ट्र शब्दाची व्युत्पत्ती रट्ट शब्दावरून झाल्याचे सुचवितात. मात्र रट्ट लोकांविषयी ते कोण, कोठले, त्यांचा वर्ण, जाती यांबद्दल कसलीच माहिती मिळत नाही. रट्ट या शब्दाचे संस्कृत रूप राष्ट्रिक म्हणजे राष्ट्रात अधिकाराचे काम करणारा मनुष्य. वर्णाने क्षत्रिय व पिढीजात पेशाने देशाधिकारी असा या राष्ट्रिकांचा किंवा रट्टांचा दर्जा असे. देसाई−देशमुखांच्याहून थोर अधिकाऱ्याला शे-दीडशे वर्षांपूर्वी सरदेसाई−सरदेशमुख असे म्हणत. तसेच हजार-बाराशे वर्षापूर्वी राष्ट्रिकाहून उच्च दर्जाच्या अधिकाऱ्यांना महाराष्ट्रिक किंवा महारट्ट म्हणत. मोठा किंवा महत्तर प्रांत (मोठे राष्ट्र) म्हणजे महाराष्ट्र. या महत्तर राष्ट्रावरील (प्रांतावरील) जो अधिकारी तो महाराष्ट्रिक. महाराष्ट्रिकचा अपभ्रंश महारट्ट व महारट्टचा अपभ्रंश मऱ्हाट. अशा प्रकारे राजवाडे यांनी रट्ट, महारट्ट, राष्ट्रिक व महाराष्ट्रिक यांपासून महाराष्ट्र आणि मराठे असा संदर्भ दर्शविला आहे.
* बौद्धग्रंथ महावंस्ते यात सापडतो. हा ग्रंथ पाचव्या शतकातील असून त्यात मोगलीपुत्त तिष्य याने ‘थेर’ म्हणजे श्रेष्ठ धर्मोपदेशकांना ज्या निरनिराळ्या देशांत धर्मप्रचारासाठी धाडले होते. ‘महारट्ट’ प्रदेशाचा उल्लेख आहे. डॉ. भांडारकरांच्या मते महाराष्ट्राचे नामकरण राष्ट्रीक किंवा रट्ट नावाच्या लोकांवरून झाले असून या मतास थोडेफार ऐतिहासिक प्रमाण मिळते ही गोष्ट खरी आहे. नाणेघाट, भाजे, कार्ले व कान्हेरी येथील शिलालेखात ‘महारठिनी’ व ‘महारठी’ अशी अनुक्रमे स्त्री-पुरुषवाचक विशेषणे आढळतात. नाणेघाट शिलालेख (म्प्. ऐंघ्, ५.५९) क्र. ६ यात ‘महारठिगणकहिरी’ असा स्पष्ट उल्लेख आहे. भाजे व घेडसे येथील लेखातही अनुक्रमे ‘महारठिस कोसकीपुतस विण्हुदतस’ व ‘महामोय बालिकाय महादेविय महारठिनिय’ असे उल्लेख आढळतात. २ वरील सर्व उल्लेख देश व लोक यांचे वाचक आहेत, यात संशय नाही. प्रश्न त्यातील ‘महारठि’ या शब्दाच्या अर्थाविषयी आहे. तो शब्द जाती किंवा लोकवाचक असावा ही उपपत्ती व्यवस्थित बसते; परंतु महारठि हा महारथी या शब्दाचा अपभ्रंश असल्यास मात्र अनवस्था संभवते.
* कर्नाटकातील 'रट्ट' एक प्राचीन राजघराणे. या घराण्याचा रट्टगुडी किंवा रट्टगुड्लू असाही उल्लेख करतात. या घराण्याचा संस्थापक पृथ्वीराम. या घराण्याचा अंमल इ. स. ८५० ते १२५० दरम्यान कलदारि-बेळगावच्या परिसरातल्या कुंडी नामक प्रदेशावर होता. प्रथम त्यांची राजधानी सुगंधवर्ती (सौंदत्ती-बेळगाव जिल्हा) येथे असून नंतर वेळुग्राम (विद्यमान बेळगाव) येथे होती. प्रारंभी ते राष्ट्रकूटांचे मांडलिक (इ. स. ८७५–९७३) असून नंतर त्यांनी कल्याणीच्या चालुक्यांचे मांडलिकत्व (इ. स. ९७३–११७०) अंगीकारले. बाराव्या शतकाच्या अखेरीस ते स्वतंत्र झाले. रट्टांचा इतिहास प्रामुख्याने त्यांच्या कोरीव लेखांवरून ज्ञात होतो. हे कोरीव लेख बेळगाव जिल्ह्यातील वटनल, सोगळ, मुत्वाड, नेसर्गी, कलहोळे व खानापूर तसेच कोल्हापूर संस्थानातील रायबाग या ठिकाणी शेकडोंनी मिळाले आहेत; तथापि या घराण्याची संपूर्ण विश्वासनीय वंशावळ व राजांचे काल अद्यापि ज्ञात झालेले नाहीत.
* या सर्व माहितीवरून मला असे वाटते कि, अतिप्राचीन टोळी/कुटुंबे यांचे संघ तयार होऊन जसे हट्टी/हाटक/हाटकर, पाला/पाली, अभिरा/अहिर, गुर्जर/गुज्जर, पख्त/पश्तुन. कुरु/कुरुबा यांच्याप्रमाणेच अरट्ट/रट्ट/महरट्ट अश्याप्रकारे नावांमध्ये बदल होत गेला असावा.
जगामध्ये सर्वच ठिकाणी पशुपालन हा व्यवसाय मनुष्यच्या प्रथमावस्थेत केला जात असे, अश्या टोळ्या/संघांना वेग-वेगळी नावे होती, त्यावरूनच त्यांचे वेगळेपण दिसून येत असावे. जसे हट्टी आणि रट्ट हे दोघेही अतिप्राचीन काळी पशुपालक असल्याचे पुरावे मिळतात. रट्ट नामक जनसमूहाविषयी अजूनही बरेच संशोधन व्हायला हवे. जसे हट्टी(आर्य) लोकांचे हाटक/हिटाइट साम्राज्य तसेच रट्टी लोकांचे आरट्ट साम्राज्य निर्माण झाले असावे.
माहिती सौजन्य- 1) The Ancient Geography of India, 1871, p 215,
2) Alexander Cunningham; Evolution of Heroic Tradition in ancient Panjab, 1971, p 53,
3) Dr Buddha Prakash; The Age of Imperial Unity, History and Culture of Indian People, p 49,
3) Dr R. C. Majumdar, Dr A. D. Pusalkar; Hindu Civilization, 1923, p 289,
4) Dr Radhakumud Mookerji; The Generalship of Alexander the Great, 2004, p 255, 5) J. F. C. Fuller; The Cambridge Ancient History, 1923, p 406, John Bagnell Bury, Stanley Arthur Cook, Frank Ezra Adcock, Martin Percival Charlesworth, Norman Hepburn Baynes, Charles Theodore Seltman).
6) मराठी विश्वकोश
7) महाराष्ट्रीय ज्ञानकोश
8) Dr Naval Viyogi: Nagas – The Ancient Rulers of India
9) Dr Pema Ram:Rajasthan Ke Jaton Ka Itihas
10) (Essay 36 INANNA RULES THE THIRD (INDUS) REGION & URUK IN SUMER
from ENKI SPEAKS: Messages From Enki: Humanity's Father by Sasha Lessin, Ph. D.)
11) डॉ. सदानंद मोरे( सौ .साप्ताहिक सकाळ )

कीती ओढून ताणून इतीहास तयार करत आहात. महारठ्ठ या शब्दाशी धनगरांचा दूर दूर संबंध नाही. उगाच जोडु नका आमच्याशी संबंध 😒
ReplyDelete