सातवाहनांचे मुळ
निर्मिती ही बहुपेडी असते. संपत्ती, सत्ता, संस्क्रुती, कला, वास्तु अणि साहित्यातुन ती परिस्फुट होत असते. महाराष्ट्रातील आद्य वसाहतकार हे पशुपालक होते हे मे आधीच्या लेखांत स्पष्ट केले आहे. सावळदा संस्क्रुतीचे सर्वात पुरातन अवशेष आता तापी नदीच्या खो-यात सापडले आहेत आणि त्यांचा काळ हा इसपु ३००० इतका मागे जातो. या प्रदेशात सापडलेल्या अवशेशांवरुन या संस्क्रुतीचे निर्माते अहिर पशुपालक होते असे स्पष्ट होते. या प्रदेशातील भाषेला अहिराणी म्हणतात यावरुन यांची प्राचीनता लक्षात यावी. पशुपालन, मासेमारी, व काही प्रमानात शेती हा त्यांचा महत्वाचा व्यवसाय होता हे आता स्पष्ट झाले आहे.
थोडक्यात हे लोक आजच्या धनगर समाजाचे पुरातन पुर्वज होत असे म्हणायला प्रत्यवाय नाही. यामागोमाग पुंड्र, औंड्र हे पशुपालक समाज अन्य प्रदेशांप्रमाणे महाराष्ट्रातही पसरले. अहिर धनगरांनी खानदेश व्यापला तसा पौंड्र धनगरांनी दक्षीण महाराष्ट्र व्यापला. पुंड्रपुर (आजचे पंढरपुर) ही त्यांची राजधानी होती. विट्ठल हा त्यांच्यापैकीच आद्य राजा आज श्री विट्ठलाच्या रुपात पुजला जातो. (पहा-विट्ठलाचा नवा शोध -संजय सोनवणी.)
सुरुवातीला निम-भटके जीवन जगणारा हा समाज स्थिर होत गेला. नगरे वसवली जावू लागली. इस्पु २३० च्या दरम्यान औन्ड्र धनगरांतील सादवाहन घराण्याने महाराष्ट्रात स्वतंत्र सत्ता स्थापन केली.
सादवाहन (सातवाहन) हे मुळचे औंड्र वंशीय अहिरांपैकीच आहेत हे आता नवीन संशोधनानुसार स्पश्ट झाले आहे. सातपुडा पर्वताच्या परिसरात त्यांचा उगम झाला हे त्यांच्या मुलनामावरुन सिद्ध होते. उदा. प्राक्रुतात सातपुडा हा छात-छवत या नावाने ओळखला जात होता. सातवाहनांची मुल प्राक्रुत नावे छातवाहन...छातकरनी अशी आहेत. आद्य सम्राट सिमुखाचे खरे प्राक्रुत नाव छिमुक असे आहे. प्राक्रुत शब्दांचे संस्क्रुतीकरण करण्याच्या नादात मुळ अर्थ हरवण्याचा प्रकार घडला आहे. (पहा: महाराष्ट्र ग्याझेटीयर...प्राचीन काळ-१) थोदक्यात आजच्या सातपुड्याच्या, म्हणजेच खानदेशच्या भुमीतुन हा राजवंश पुढे आला. सातपुडा परिसरातुन आले म्हणुन सातवाहन...याचा संस्क्रुत अर्थ नाही कारण तो प्राक्रुत भाशेतील आहे, पण अनेक विद्वान हा शब्द संस्क्रुतातुन आला असावा असे समजुन अर्थ काढत बसले म्हणुन मोठी फसगत झाली आहे.

Comments
Post a Comment