आज सहा जानेवारी. १७९९ मद्ध्ये महाराजा यशवंवंतराव होळकरांनी याच दिवशी राज्याभिषेक करुन घेत स्वातंत्र्य घोषित केले. सर्वंना या राज्याभिषेकदिनाच्या शुभेच्छा. थोडक्यात पार्श्वभुमी खाली दिली आहे.



खानदेशच्या भुमीवरुन हा स्वातंत्र लढा सुरु झाला. यशवंतरावांचे हे सैन्य कमी असले तरी जो वर्ग यात सामील झाला होता तो मुळातच लढवैय्या होता. प्रसंगी न्रुशंस आणि वेगवान हल्ले करण्याची क्षमता त्यांच्यात होती. प्रामुख्याने भिल्ल, पेंढारी, अफगान यांच्याबरोबरच अन्य सरदारही सामील झाले. यात झुंझार नाईक गोवर्धन नाईक, वजीर हुसेन, शहामत खान, गफुरखान, राणा भाऊ सिंघ, अभय हरमत सिन्हा, शामराव महाडिक, फतेहखान, हरमत छेला, जिवाजी यशवंत, भवानीशंकर खत्री (बक्षी), फतेहसिंग माने . सामील होते. विठोजी होलकरही आपल्या कनिष्ठ बंधुंना येवुन मिळाले. पुढे मिरखानही सामील झाला. (हाच पुढे अमिरखान नाव घेत टोंकचा नबाब बनला...यशवंतरावांचा विश्वासघात करुन इंग्रजांना मिळाला त्याचे हे बक्षीस...)
एवढ्या विनंत्या करुनही बाजीराव ऐकत नाही हे पाहिल्यावर यशवंतरावांच्या लष्करी हालचाली सुरु झाल्या. याच काळात माळव्यात दुष्काळही पडला होता. निसर्गाचा कोप आणि यशवंतरावांचा प्रकोप यामुळे परिस्थिती वाईट बनली खरी पण यशवंतरावांसमोर कोनताही मार्ग उरलेला नव्हता. त्यांनी होलकरी प्रांतांवर स्वा-या सुरु केल्या, धनिकांकडुन खंडण्या वसुल करायला सुरुवात केली. विठोजी होळकर पेशव्याच्या प्रांतात घुसु लागले. पेशव्याची धास्ती वाढु लागली. आणि यशवंतरावांची किर्ती वाढु लागली.
अशात धारचे राजे आनंदराव पवार यांनी त्यांच्याच एका मंत्र्याने केलेल्या बंडाला चिरडण्यासाठी यशवंतरावांची मदत मागीतली. यशवंतरावांनी ते बंड यशस्वीपणे संपवले. त्यांच्या मित्रांत भर पडली धनही मिळाले. 
जोवर महेश्वर मुक्त होणार नव्हते तोवर मात्र यशवंतरावांना चैन पडनार नव्हती. 
आता यशवंतरावांकडे सैन्य होते किती? तर फक्त २००० घोडदळ आणि ५००० पायदळ. 
या जोरावर एवढ्या बलाढ्य शक्तींशी झुंजने तसे अशक्यप्रायच होते.
इंदोरच्या दक्षिणेला चिवालिएर डंडरनेकच्या नेत्रुत्वाखालील बलाढ्य कवायती देशी फौज रक्षणासाठी शिंदेंनी तयार ठेवलेली होतीच. त्यामुळे त्याला हरवुन सहजी महेश्वर जिंकता येणार नाही याचा कयास या सेनानीला होताच. (तेंव्हा होलकरांची राजधानी महेश्वर येथे होती.)
मग यशवंतरावांनी ज्या वेगळ्याच आणि अत्यंत गतीमान हालचाली केल्या त्याला इतिहासात तोड नाही. 
अत्यंत पुर्वेला असलेले निमवाडवर त्यांनी वेगस्वान हालचाली करुन हल्ला केला. लागोपाठ हांडिया आणि भिकनगावावरही हल्ले चढवले. यासाठी यशवंतरावांना दोनदा नर्मदा ओलांडावी लागली. या विजयांमुळे सैन्याचे धैर्य वाढले होते. धनही जमा झाले होते. आता यशवंतराव डंडरनेकच्या फौजेचा सामना करायला सिद्ध झाले. 
भिकनगाववरुन त्यांनी लगोलग कास्रोद गाठले. तेथे डंडरनेकच्या नजिब आणि तेलिंगा या दोन बटालियन होत्या. त्यांच्यावर यशवंतराव सड्या सैन्यानिशी तुटुन पडले. यशवंतराव एवढ्या वेगाने आपल्यावर येवुन कोसळेल याची कसलीही कल्पना नसणा-या या दोन्ही बटालियन्सचा अल्पावधीत धुव्वा उडाला. तोफा तेथेच टाकुन ते सैनिक पळत सुटले. 
हीच गती शत्रुला नेहमीच चकित करणारी ठरली. एका अर्थाने शिवाजी महाराजांच्या गतीशीच आणि नितीशीच येथे तुलना होवू शकते. 
हा विजय मिळाला तो डिसेंबर १७९८ च्या अखेरीस. 
या विजयामुळे महेश्वरला असलेला डंडरनेक घाबरुन जो पळाला तो सरळ इंदोरला जावुन बसला.
स्वराज्याची घोषणा...यशवंतरावांचा राज्याभिषेक
इंग्रजांचा धोका सर्वात आधी लक्षात घेवुन १८०३ पासुन इंग्रजांशी सर्वकश लढा पुकारत एकूण अथरा युद्धे करत जिंकत त्यांना नामोहरम करणारे...ब्रितिष पार्लमेंटला भारताबाबतची धोरणे बदलायला भाग पाडणारे महाराजा यशवंतराव होलकर हे शिवरायांनंतर जानेवारी १८९९ रोजी राज्याभिषेक करुन घेणारे एकमेव भरतीय महाराजा. त्यांच्या या राज्याभिषेकाची थोडक्यात माहिती येथे देत आहे.
यशवंतराव होळकर हे भारतीय इतिहासात होवून गेलेले एक झंझावाती व्यक्तिमत्व. दुस-या बाजीरावाने दौलतराव शिंद्यांनी इंदोरच्या गादीवर हक्क असलेल्या मल्हारराव होळकर (दुसरे) यांची पुण्यात हत्या केली. होळकरी संस्थान जप्त केले प्रचंड सैन्य ठेवून आपला अंमल बसवला. यशवंतरावांनी दौलतराव शिंद्यांच्या डंडरनेक या सेनानीशी अव्याहत युद्धे करून आपले पैत्रुक राज्य स्वबळावर जिंकले खरे, पण पेशवे त्याला मान्यता देणे कदापि शक्य नव्हते. शेवटपर्यंत दिलीही नाही. त्यामुळे राज्याभिषेकाखेरीज अन्य मराठा मंडळातील सरदार त्यांना बरोबरीचे मानणे शक्य नव्हते. तीच बाब मुस्लिम राजवटींबाबत घडणार होती. यावर एकच पर्याय होता तो म्हणजे राज्याभिषेक.
शिवाजीमहाराजांनी ज्या कारणांसाठी राज्याभिषेक करुन घेतला तशीच बव्हंशी कारणे या राज्याभिषेकामागेही होती. त्यांनीही स्वबळावर स्वराज्य निर्माण केले होते. यशवंतरावांनीही आपले स्वराज्य स्वबळावरच निर्माण केले हा योगायोग नव्हे. परिस्थित्या जरी गेल्या दिडेकशे वर्षांत बदलल्या असल्या तरी प्रव्रुत्ती त्याच होत्या. तसेच विश्वासघातकी, दगाबाज आणि स्वार्थी लोक होते. इंग्रज, फ्रेंच वर डोके काढु लागले होते. दौलराव शिंदे कोणत्याही क्षणी येउन कोसळण्याची शक्यता होती. आपण सार्वभौम राजे झालो नाहीत तर इंग्रज फ्रेंचांविरुद्धच्या युद्धात एतेद्देशीय संस्थानिक सामील होनार नाहीत याची जाण त्यांना आली होती म्हणुन यशवंतरावांनी अभिषिक्त राजा होण्याचा निर्णय घेतला.
जानेवारी १७९९ च्या पहिल्या आठवड्यातच राज्याभिषेकाच्या सा-या तया-या, विधी पुर्ण करत यशवंतराव होळकर सहा जानेवारी १७९९ रोजी महेश्वर येथे अभिषिक्त राजे बनले. स्वता:चे राजचिन्हही त्यांनी घोषित केले. स्वतंत्र नाणी पाडायला सुरुवात केली.

Comments

Popular posts from this blog

धनगर समाजातील आडनावे-

About 108 clans(108 कुळ/कुल) of Dhangars and 22 sub castes (22 पोट जाती).

List of Hatkar clans