बी के ही असी आग होती जिचा वणवा पसरत असतानाच त्यावर कोणीतरी पाणी ओतले




💥
उत्तरार्ध💥
या सर्व परिस्थित बी के लोक प्रसिद्दीच्या शिखरावर होते त्याचा फ़ायदा सत्ताधारी आणि विरोधी दोन्ही पक्षातील लोक घेऊ पहात होते सहामहिन्याची भटकान्तिच अट काढ़ा म्हणून विरोधकांनी विधान भवनावर भव्य मोर्चा काढला हा मोर्चा सम्राट हॉटेल चर्चगेट येथे अडविन्यात आला अत्यल्प तयारी असूनही मोर्च्यात दोन लाख धनगर सहभागी झाले याचा धसका सत्ताधार्यानि घेतला आणि त्यानी त्यांच्याकडील धनगर पुढाऱ्याना हां वाघ पकडून कांग्रेसच्या सर्कसित आणावा म्हणून विडा मंडला भले भले धनगर वीर कामाला लागले आणि त्यातच पंढरपुराच्या मेळाव्याचा घाट घातला आणि त्यातच या क्रांतिविराचा घात झाला .महादेव जानकराच्या बाबतीत असे अनेक प्रयोग झाले पण हां पठठ्या सर्वाना पुरुन उरला ते बी के ला जमल नाही आणि बी के ची शिकार पंढरपुरात झाली स्टेजवरुन परस्पर बी के गायब झाले ते पुन्हा कधीच कुणाला दिसले नाहीत
मला 1998 साली एके दिवसी रात्री बारां वाजता लोकल मधे भेटले इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या तेवढ्यात ठाणे स्टेशन आले बी के नी चालु गाडीतून उडी टाकली हे अनपेक्षित होत मला बी के सी खुप बोलायच होत पंढरपुर मेळाव्या नंतर काय झाले? या मधल्या काळात तुम्ही कुठे होता? तुम्ही समाजा समोर का येत नाही? हे आणि असे अनेक प्रश्नांची उत्तरे मला हवी होती म्हणून मीही गाड़ी खाली उतरली त्या आधीच बी के लोकांच्या गर्दीत हरवले होते मी बराच लांब पर्यन्त त्यांचा पीछा केला पण ते भटेले नाही मी हताशपणे परत फिरलो मागची लोकल पकडून घरी गेलो रात्रभर झोप लागली नाही 
सर्वच गूढ़ रहस्यमय वाटत होत
अश्या रितिन चंद्रभागेच्या महापुरात एका खड़कावर आदळून यशवंत सेनेच जहाज फुटल जहाजाचा कप्तान हरवला होता सर्व सामान्य धनगर हताश झाला होता पण काही ना ती पर्वणी वाटत होती 
दहा लक्ष्य धनगर पंढरपुरी जमीविला।
आनंद मोठा झाला आम्हा धनगरास दोन बोट स्वर्ग राहिला।
तिथुनच गेले कैक आपल्या मुलखाला।
नेतागीरी करण्याची धुंदी चढलि डोसक्याला।
नेत्यान वाट दिली राजे फंद फितुरीला।
दुहिच्या दरी मधे धनगर सारा लोटला।
नाही पायी कुणाच्या पाय पास राहिला।
गल्ली बोळा मधे नवी सेना संघ जन्मला।
नाक्या नाक्यावरि रोज नवा सेनापति आला।
फुटलेल्या जहाजाच्या फळया एकत्र करुन त्याची डाग डुजी करुन नव जहाज तयार करुन एकच जहाज कअरायला हव होत एखादा धुरंधर कप्तान शोधायला हवा होता पण आस वागतिल ते धनगर कसले सतरा कारभारी ही तर आपली ओलखच आहे तसेच घडले ज्याच्या हाती जी फळी आली ती फळी घेऊन तो गावाकड़े पळाला आणि त्या फलकुटावर यशवंत सेना नाव लिहून स्वतःला सेनापति म्हणू लागला अशा एकूण 52 यशवंत सेना तयार झाल्या 
त्यातील एक महादेव जानकरांची त्यानी मोठ्या चकाटिने यशवंत सेना टिकविलि वाढविलि त्यातूनच रासपचा जन्म झाला महादेव जानकरांचा हां प्रवास अत्यंत थकक करणारा आहे बी के चा खरा वारस कोण तर महादेव जानकराकडेच बोट जाते बी के ची यशवंत सेना ही महादेव जानकरांची यशंवत सेना आणि रासपचा मूळ पाया आहे याचे भान त्यानी ठेवले तर बी के चा आत्मा तृप्त होईल रासपच्या कार्यक्रमात बी के ची प्रतिमा तर ती कृतज्ञता ठरेल
आज या महानायकाचा स्मृति दिवस आहे आणि नेमकं त्याच वेळी त्याच्या वारसाला एमएलसी मिळाली केवढा मोठा योगायोग आणि आनंदाचा क्षण आहे
ठाण्यातील त्या प्रसंगा नंतर मी खुप वाट पाहिली बी के कुठे तरी भेटल म्हणून पण सर्व व्यर्थ एक दिवसी अचानक बातमी आली ती बी के च्या मृत्यूची अधिक चौकशी केल्यावर कळले की औषध पाण्या वीना या महानायकाचा करुन मृत्यु झाला सव्वा कोटि लोकांचे संसार फुलवीणाऱ्या या महात्म्याच्या अंत यात्रेला शंभर दीडसे लोक हजर असल्याचे ऐकून अतिशय दुःख झाले आपण खरच का एवढे निर्दयी निष्ठुर आणि कृतघ्न आहोत?
नाही बी के तेरी यादमे आज भी धनगर रोता है।
उरुजे आदमी खाकिसे अंजुम सहेमे जाते है।
टूटा हुआ सितारा कही कामिल बन जाय।
म्हणजे सामान्य लोकातून मातीतन निपजलेल्या मानसाकडे बघुन आकाशातील चकाकनारे अंजुम म्हणजे तारे म्हणजेच प्रस्थापित पुढारयांचा थरकाप झाला कारण त्याना भीति वाटत होती की निखलून पडलेला हां तारा चंद्र तर नाही होणार आणि म्हणून त्यानी बी के ला अभिमान्य सारख घेरून ठार केल 
अशा महानायकाला त्याच्या स्मृति दिनी कोटि कोटि अभिवादन
💥💫💥
बापू हटकर
9324271192 7710020069
कृपया या महानायकाच्या दुर्दैवी शोकान्तिकावरील हां माझा लेख सर्वत्र जाऊ ध्या बी ची आठवण ठेवा प्रत्येक कार्यक्रमात बी के ची तसवीर ठेवा
💥💫💥💫💥💫💥💫💥💫
अजुन एक विनंती समाजातील जेष्ठ साहित्यिक मा श्री गोविंदराव काळे सोलापूर आणि तरुण पत्रकार श्री रामभाऊ लांडे हे दोघे मिळून संयुक्त पणे बी के वर एक पुस्तक लिहू इच्छितात तर आपल्या कड़े बी के विषयी कोणत्याही स्वरूपातील माहिती उपलब्ध असेल ती त्याना पुरवावी ही विनंती
💥💫🙏💥🙏💫🙏💥


Comments

Popular posts from this blog

धनगर समाजातील आडनावे-

About 108 clans(108 कुळ/कुल) of Dhangars and 22 sub castes (22 पोट जाती).

List of Hatkar clans