धनगर औंड्र वंश का इतिहास: महाराष्ट्राचे वैभवशाली सातवाहन साम्राज्य






पुंड्र वंश की वंशावली
राजा/ऋषि विश्वामित्रा-कौशिक- नागा पुण्डरीक/ पुंडलिक राजा/ऋषि- पुंड्र/ औंड्र धनगर- राजा विट्ठल -गवली धनगर-हट्टी हटकर और गुर्जर- खखरात (क्षहरात), शिंदे और सुळे- शालिवाहन- पुंडीर- परिहार/ गुर्जर प्रतिहार वंश-गुर्जर सम्राट मिहिर भोज- छत्रपति शिवाजी.
पुण्डरीक (पुंडलिक) गोत्र के नागवंशी शक- सुळ, खरात और शिंदे माउंट आबू, राजस्थान के अग्निकुंड के बाद अग्निवंशी परिहार कहलायेंI
पुंडरिक हा शब्द पौंड्रिक या शब्दाचे सुलभीकरण आहे हे उघड आहे. त्यामुळे मुळ "पौंड्र" कोण होते या प्रश्नाचा शोध घेणे आवश्यक होते. आणि पौंड्र या एकेकाळच्या पशुपालक, शुद्र समाजाचे मुळ सापडते ते इसपु. आठव्या शतकातील ऐतरेय ब्राह्मण महाभारतात. विश्वामित्राच्या 100 मुलांपैकी मधुच्छंदापेक्षा लहान पौंड्र, औंड्र, शबर, मुतीब . ५० मुलांनी विश्वामित्राने दिलेल्या शापामुळे दक्षीणेत येवुन राज्ये वसवली असे ऐतरेय ब्राह्मणावरुन दिसते. विश्वामित्राच्या शापामुळे ते शूद्र झाले असेही ऐतरेय ब्राह्मण सांगते. महाभारतानुसार पौंड्र, औंड्रादिनी बंगाल, आंध्र, ओडिसा (आंध्र ओडीसा ही औंड्र या शब्दांचे अपभ्रंश आहेत.) येथे सत्ता स्थापन केल्या. हे वैदिक परंपरेने शुद्र मानले गेलेले अवैदिक समाज असून मुळचे पशुपालक होत. पौंड्रांनी दक्षीण भारतातही आपल्या वसाहती केल्या याचे पुरावे आता स्पष्ट होत आहेत. महाभारत युद्धात पौंड्र हे दुर्योधनाच्या बाजुने लढले होते.
पुंड्र, औंड्र हे पशुपालक समाज अन्य प्रदेशांप्रमाणे महाराष्ट्रातही पसरले. अहिर धनगरांनी खानदेश व्यापला तसा पौंड्र धनगरांनी दक्षीण महाराष्ट्र व्यापला. पुंड्रपुर (आजचे पंढरपुर) ही त्यांची राजधानी होती. विट्ठल हा त्यांच्यापैकीच आद्य राजा आज श्री विट्ठलाच्या रुपात पुजला जातो. (पहा-विट्ठलाचा नवा शोध -संजय सोनवणी.)
म्हणजेच श्री विट्ठल आणि खंडेराय, जी आजच्याही महाराष्ट्राची आराध्ये आहेत ती मुळच्या धनगर समाजातील महापुरुषांची दैवतीकरणे आहेत हे उघड आहे. आजही धनगरांना खंडेराय हा किती पुज्य आहे हे वेगळे सांगायची गरज नाही. खरे तर ते त्याच्या रुपात आपल्या अलौकिक सामर्थ्याच्या पुर्वजाचीच पुजा करत आहेत.
सुरुवातीला निम-भटके जीवन जगणारा हा समाज स्थिर होत गेला. नगरे वसवली जावू लागली. इस्पु २३० च्या दरम्यान औन्ड्र धनगरांतील सादवाहन घराण्याने महाराष्ट्रात स्वतंत्र सत्ता स्थापन केली.
सादवाहन (सातवाहन) हे मुळचे औंड्र वंशीय अहिरांपैकीच आहेत हे आता नवीन संशोधनानुसार स्पष्ट झाले आहे. सातपुडा पर्वताच्या परिसरात त्यांचा उगम झाला हे त्यांच्या मुलनामावरुन सिद्ध होते. सादवाहन हे नेहमीच महाराष्ट्री प्राक्रुताचे समर्थक होते...इतके कि त्यांच्या जवळपास ४५० वर्षांच्या कारकिर्दीतील एकही लेख संस्क्रुतात नाही. स्वतंत्र राज्यस्थापनेपुर्वी हे चंद्रगुप्त मौर्याचे सामंत होते. चंद्रगुप्त मौर्य हा मोरीय या पशुपालक समाजातुनच पुढे येत सम्राट बनला होता हा इतिहास आता स्पष्ट झाला आहे. यावरुन दोन्ही समाजांचे पुरातन नाते स्पष्ट होते.
एवढेच नव्हे तर हाल सादवाहनाने गाथा सप्तसही च्या रुपात एक अलौकिक वाड्मयीन ठेवा आपल्यासाठी निर्माण केला होता हे कसे विसरता येईल? सादवाहनांनी विदेशी व्यापार वाढवला होता. त्यांचे नौकाशास्त्र एवढे प्रगत होते कि मेगास्थानिसनेही त्याचा आदरपुर्वक उल्लेख केला आहे.
पुढे वाकाटक, कदंब, यादव, भोज हे महाराष्ट्रातील राज्यकर्तेही याच विस्त्रुत समाजातुन उदयाला आले. याचे कारण म्हणजे, हा पशुपालक समाज तत्कालीन अर्थव्यवस्थेत सर्वात महत्वाचा आणि मोठा घटक होता. हा समाज पराक्रमी तर होताच पण निर्मितीक्षमही होता. महाराष्ट्रातील आद्य संस्क्रुतीची पाळेमुळे रोवुन हा समाज थांबला नाही तर त्यात तो व्रुद्धी करत राहीला. सादवाहनकालीन लेणी आजही त्या निर्मितीक्षमतेची उदाहरने आहेत...जी धनगर समाजाला आजही आपल्या पुर्वजांबद्दल अभिमान देत राहतील. याच समाजातुन व्यवसायाधिष्ठीत कौशल्य असनारे घटक विकसीत झाले. त्याबद्दल पुढे लिहिणारच असल्याने येथे फक्त पुरातन व्यवसायाशी नाळ जुळवुन आजही राहिले त्यांच्या इतिहासाबद्दल बोलायचे आहे.














Comments

Popular posts from this blog

धनगर समाजातील आडनावे-

About 108 clans(108 कुळ/कुल) of Dhangars and 22 sub castes (22 पोट जाती).

List of Hatkar clans