भारतातील आर्य आक्रमणाची समीक्षा होणे तितकेच गरजचे.


परकीय आक्रमण अगदी वाईट असे म्हणन्या अगदोर जिथे ज्या भूमी वर ते आक्रमण झाले तिथली परिस्थती अगदी योग्या म्हणणे खरे ठरणार काय ? त्या भूमीवर काय परिस्थती होती याचे अवलोकन सुद्धा झाले पाहिजे म्हणजे खर्या इतिहासाचा मागोवा घेणे सोविस्कर होइल. फक्त मातृ भूमीच्या प्रेमा खातीर मातृभूमित्तील दयनीय परिस्थती कडे डोळे झाक करून इतिहास शोधण्याचा प्रयत्न केला तर खर्या इतिहासाचा उलघडा होणार नाही.
आपलेच चांगलेच आणि दुसरे ते वांगलेच दुरदैवाने इतिहासाचा हाच दृष्टीकोन संपूर्ण भारतीयाच्या मनात रुजविण्याची सिक्स्थ ब्राह्मणी वेवस्थेच्या पाठीसाख्यांनी केल्यामुळे खर्या इतिहासाकडे डोळेझाक करण्याची मनोवृत्ती निर्माण झाली आहे.
मोघल, तुर्क, अरब भारत देश पादाक्रांत करू शकले याचे कारण अरबभूमीत कुठली क्रांती घडली आणि भारतात कुठली प्रतिक्रांती घडली यावर आधारित आहेच. अरबस्थानात पैगंबराच्या धार्मिक क्रांतीमुळे तेथील टोळ्यात वास्तव्य करणारे, टोळी युद्ध करणार्यामध्ये एकीची भावना विकसित झाली. याच्या अगदी उलट ते भारतात घडले, ब्राह्मणशक्ती वाढल्यामुळे चातुर्वर्ण वेवस्था, जातीचा उदय आणि दृढीकरण, समाजात उच्च निच्च भावना बळकट झाली त्याचा परिणाम मौर्य कालीन एकसंघ समाज तुकड्या तुकड्यात वाटला गेला व समूहशक्ती क्षीण झाली. हीच ब्राह्मणी चातुर्वर्ण वेवस्था भारताला पुन्हा विदेशी लोकांच्या गुलामीत नेण्यास कारणीभूत ठरली. ब्राह्मणवादाचे पाठीराखे लेखक ब्राह्मणी प्रचारतंत्र आजही खरे सत्याशी लोकाबिमुख होवू देत नाही, खोट्याची पुनरावृत्ती करून समाजमत भ्रमित करून देशाचे शाषक बनतात. वारंवार भारतीय मुसलमानांचे सबंध आणि संधर्भ परकीय अकरामंकारी मोघल, तुर्क, अरबांशी जोडून त्यांना खजील केल्या जाते व भारतीय हिंदू मुस्लीम वैमनस्य निर्माण केला जातो.
ज्या बाबिनवर चर्चा केली त्याचे उदाहरण त्यांच्याच ब्राह्मण पंडित जवाहरलाल नेहेरू यांच्या दिलेल्या संधर्भात मिळतो हाच संधर्भ त्यांच्याच पायावर दगड पडण्यास मदत करेल.
पंडित नेहेरूने आपल्या “ ग्लीम्पसेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री’’ या ग्रंथा मध्ये वस्तुनिष्ठ उदाहरण दिले आहे. ते म्हणतात “ मुस्लीम ( आक्रमणकारी) हे सुरवातीला जहाल व क्रूर प्रवृत्तीचे होते, तश्याच कडक प्रदेशातून ते आले होते, ते नवीन देशात आले (भारतात) तेव्हा ते शत्रूने वेढलेले, जे कोणत्याही क्षणी आक्रमण करू शकतात, बंड करू शकतात ही ही भीती नेहमीच क्रूरता व भयग्रस्तता निर्माण करते. त्या मुळे लोकांना नमविण्यासाठी कत्तल व्हायच्या. धर्मामुळे मुस्लीम हिंदूला मारतो अश्यातला प्रश्न नव्हता, प्रश्न होता तो परकीयांना जिंकण्याचा. पण अश्या प्रकारच्या क्रूरतेविषयी सांगतांना धर्माची बाब मध्ये आणली जाते, ते योग्य नव्हे.” “ मध्य आशियातून भारतात आलेले अक्रमनकरी हे त्यांच्या मातृभूमीत व इस्लाम धर्माचा स्वीकार करण्यापूर्वीही जहाल व निर्दयी होते. नवीन देश जिंकल्यानंतर त्यावर आपला ताबा ठेवण्यासाठी त्यांना फक्त एकच मार्ग माहित होता दहशत”.
दिलेल्या संधर्भानंतर इतिहासाची विवंचना करण्या पूर्वी हे दोन्ही बाजू लक्षात घ्यावयास हवे की अशी परिस्थती वारंवार भारतभूमी वर का निर्माण झाली. या देशात टोळीसदृश्य आर्य (आजचे ब्राह्मण) त्या नंतर हून, शक, यांनी याचा प्रकाराचा अवलंब केला आहे. मग परकीय मुसालामांची आक्रमना चा अर्थ या आक्रमणा पेक्षा वेगळा नव्हता. याच बाबीवर भारतातील आर्य आक्रमणाची समीक्षा होणे तितकेच गरजचे.

https://www.facebook.com/photo.php?fbid=281635008701047&set=a.133419793522570.1073741828.100005636490556&type=1&theater

Comments

Popular posts from this blog

धनगर समाजातील आडनावे-

List of Hatkar clans

About 108 clans(108 कुळ/कुल) of Dhangars and 22 sub castes (22 पोट जाती).